आम्हाला काय त्यांच्यासोबत लग्न करायचे आहे का… मनोज जरांगे पाटील यांचा संताप, थेट मंत्र्यांच्या..
मराठा समाजाचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी नुकताच मोठे आरोप केले. जवळच्या लोकांना त्रास दिला जात असल्याचा त्यांनी आरोप केले. दोषी नसतानाही माझ्या जवळच्या लोकांना त्रास दिला जात आहे. तरीही मी मागे हटणार नाही.

मनोज जरांगे पाटील यांनी 15 सप्टेंबर रोजी मुंबईकडे निघणार असल्याचे म्हटले. मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणाचा आज 15 वा दिवस आहे. यावेळी बोलताना जरांगे यांनी म्हटले की, 15 सप्टेंबरला मुंबईला निघतोय. गरीब मराठ्यांची कदर सरकारला नाही. लोकशाही मार्गाने शांततेत उपोषण सुरू होईल. बळीराजा संकटात होता. मात्र कालपासून पाऊस सुरू झाला त्यामुळे आनंदी आहोत. शेतीची कामे संपलीत आणि पाऊस आला त्यामुळे आनंद होईल. पाऊल आहे आणि शेती काम नाही त्यामुळे मराठे मुंबईत येणार आहे. सरकारला नास्केपणा लागला आहे. कुठे चाैकश्या करत कुठे काही करा. त्यामुळे आंदोलन थांबत नाही. तुम्ही माझ्या जवळच्या सहकाऱ्यांना त्रास देता, ते कोणाला कळत नाही का? ते पण चाैकशी शनिवार, रविवारी. बाईच्या आडून काम केले जात आहे.
बावनकुळे बाईच्या पदराच्या आड लपून काम करत आहे. शनिवारी आणि रविवारीही अधिकारी काम करत आहेत. गोरगरीबांचे लोक तहसीलदार कार्यालयात गेले की, अधिकारी काम करत नाहीत, ते अधिकारी आता शनिवार रविवार काम करत आहेत. मी फक्त प्रसाद लाड यांच्यामुळे बावनकुळेला सुट्टी दिली होती. पण आता नाही. आंदोलनाच्या काळातच का?
बावनकुळे सर्वकाही करत आहे. नाराजी व्यक्त करण्याची काय गरज आहे, सर्व दिसत आहे. मराठ्यांबद्दल किती व्देश आहे. गरीब जातीचे आंदोलन सुरू आहे. बाईच्या आडून कसा त्रास दिला जात आहे हे दिसत आहे. आता रात्रदिवस काम करावे लागणार आहे. बावनकुळे कितीही बोलले तरीही काही फरक पडत नाही. आंदोलन थांबत नसते.
जवळचेही लोक म्हणतात की, आम्ही कुठेही दोषी नाहीत. ते दोषी नसतानाही जेलमध्ये जाण्यास तयार आहेत. कोणती शिरवाळ भाषा आहे? तुम्ही गोरगरीबांचे प्रश्न सोडू शकत नाहीत, प्रत्येक प्रत्येकाला त्रास देत आहात. एखादा पत्रकार चांगली बातमी लावत आहे तर त्यालाही त्रास दिला जात आहे? तीन वर्ष शिंदेंना चांगले बोलत होतो, तेव्हा चांगली भाषा होती का? आम्ही कुठेही थांबणार नाहीत. मंत्र्यांसोबत चांगले संबंध ठेवा म्हणतात, त्यांच्यासोबत काय लग्न करायचे आहे का? असेही जरांगे पाटील यांनी म्हटले.