मनोज जरांगे पाटील यांचा मोठा निर्णय, सर्व दाैरे, कार्यक्रम रद्द..
मराठा समाजाचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी मोठे आंदोलन पुकारले. त्यातच त्यांनी त्यांचे सर्व दाैरे आणि कार्यक्रम रद्द केली आहेत. ते बीडहून छत्रपती संभाजीनगरकडे रवाना झाले आहे. मनोज जरांगे पाटील यांच्या वडिलांची प्रकृती चिंताजनक असल्याने जरांगे यांनी सर्व दाैरे रद्द केल्याची माहिती मिळत आहे.

मराठा समाजाचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी मराठा आरक्षणाकरिता मोठे आंदोलन उभारले. मात्र, त्यांच्यावर आता गंभीर आरोप केली जात आहेत. त्यांच्या सरकाऱ्यांची एसआयटी चाैकशी होणार आहे. जरांगे यांच्या काही जवळच्या लोकांच्या संपत्तीत अचानक मोठी वाढ झाली. त्यातच त्यांच्या आंदोलनाच्या पहिल्या दिवसापासून त्यांच्यासोबत असलेले काही कार्यकर्ते त्यांच्यावर टीका करताना दिसले. सराटीमधील आंदोलनाचा स्टेज देखील काही दिवसांपूर्वीच काढला आहे. त्यातच आता मनोज जरांगे पाटील यांच्याबद्दल अत्यंत मोठी माहिती पुढे येत आहे. मनोज जरांगे पाटील यांचे सर्व कार्यक्रम, दाैरे रद्द करण्यात आली आहेत. त्यांचे काही कार्यक्रम होते, पण सर्व रद्द करण्यात आली. जरांगे सध्या बीडमध्ये आहेत.
मनोज जरांगे पाटील यांच्या वडिलांची प्रकृती चिंताजनक असल्याने जरांगे यांनी सर्व दाैरे रद्द केल्याची माहिती मिळत आहे. जरांगे पाटील यांच्या वडिलांवर छत्रपती संभाजीनगर येथील MGM रूग्णालयात उपचार सुरू आहेत. आज जरांगे पाटील बीड सह पुणे दौऱ्यावर होते, विविध ठिकाणी कार्यक्रम होणार होते. त्याचे आयोजन करण्यात आले होते.
मात्र, आता सर्व कार्यक्रम आणि दौरे रद्द करण्यात आले आहेत. रात्रीपासून त्यांच्या वडिलांची प्रकृती अधिक खालावल्याची माहिती मिळत आहे, त्यामुळे हे सर्व कार्यक्रम रद्द करण्यात आले आहेत. जरांगे बीडहून छत्रपती संभाजीनगरकडे रवाना होतील.
धाराशिव जिल्ह्यात चारा छावण्या सुरू करण्यास राज्य सरकारची मंजुरी. जानेवारी महिन्यात चारा छावण्या सुरू होण्याची शक्यता.जिल्ह्यातील 6 लाखांवर पशुधनाला मिळणार दिलासा. उपलब्ध चारा डिसेंबरपर्यंतच पुरणार असल्याचा पशुसंवर्धन विभागाचा अंदाज. चारा छावण्यांसाठी प्रशासनाकडून पूर्वतयारी सुरू, जिल्हाधिकारी कीर्ती किरण पुजार यांची माहिती. चाऱ्याच्या पुरवठ्यासाठी 2001 चे जुने दर लागू ठेवण्यासही मान्यता. चारा छावणीच्या मंजुरी बाबत आमदार राणा जगजीत सिंह पाटील यांची सोशल मीडिया वरती पोस्ट शेअर केली आहे.