AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Maratha Reservation : हैदराबाद गॅझेट जीआर विरोधात याचिका दाखल, सरकारची भूमिका काय? फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया

मोठी बातमी समोर येत आहे, हैदराबाद गॅझेटच्या जीआरविरोधात हाय कोर्टात याचिका दाखल करण्यात आली आहे, यावर आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची पहिली प्रतिक्रिया समोर आली आहे.

Maratha Reservation : हैदराबाद गॅझेट जीआर विरोधात याचिका दाखल, सरकारची भूमिका काय? फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया
Image Credit source: tv9 marathi
| Updated on: Sep 11, 2025 | 9:00 PM
Share

मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनानंतर सरकारने राज्यात हैदराबाद गॅझेट लागू करण्यासंदर्भात जीआर काढला आहे. मात्र आता मोठी बातमी समोर येत आहे, ती म्हणजे या जीआरविरोधात  मुंबई उच्च न्यायालयात दोन याचिका दाखल करण्यात आल्या आहेत.   हैदराबाद गॅझेटियरच्या अंमलबजावणीला मान्यता देणाऱ्या राज्य सरकारच्या अधिसूचनेला  या याचिकांद्वारे आव्हान देण्यात आलं आहे.  शिव अखिल भारतीय वीरशैव युवक संघटना आणि व्यवसायाने वकील असलेले विनीत धोत्रे यांच्या वतीनं या दोन याचिका हाय कोर्टात दाखल करण्यात आल्या आहेत.

दरम्यान हैदराबाद गॅझेट लागू करण्यासंदर्भात जो जीआर काढण्यात आला होता, त्याविरोधात या याचिका दाखल करण्यात आल्यानं, यावर हाय कोर्ट आता काय निर्णय घेणार हे पहाणं महत्त्वाचं ठरणार आहे, या याचिकांवर सोमवारी सुनावणी होणार आहे. त्यावर आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची पहिली प्रतिक्रिया समोर आली आहे.

नेमकं काय म्हणाले फडणवीस?  

मराठा आरक्षणासंदर्भात हैदराबाद गॅझेट लागू करावं, अशी मागणी मनोज जरांगे पाटील यांनी केली होती, त्यानंतर राज्यात हैदराबाद गॅझेट लाकू करण्यासंदर्भात राज्य सरकारनं जीआर काढला आहे, मात्र आता या निर्णयला हाय कोर्टात आव्हान देण्यात आलं आहे. यावर फडणवीस यांची पहिली प्रतिक्रिया समोर आली आहे. जीआरविरोधात हायकोर्टात दोन याचिका दाखल करण्यात आल्या आहेत, कोर्टात योग्य भूमिका मांडू, सरसकट आरक्षण दिलेलं नाही, असं देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे.

विनीत धोत्रे यांची प्रतिक्रिया  

आमचा मराठा समाजाच्या आरक्षणाला विरोध नाही,  पण ज्या पद्धतीने हा शासन निर्णय काढण्यात आला आहे, त्याला मात्र विरोध आहे. त्यामुळे आम्ही कोर्टात याचिका दाखल केली आहे. मराठा समाजाला पहिलंच इडब्लूएस आणि एसईबीसी आरक्षण आहे, तरी देखील या शासन निर्णयांची गरज का होती? असा आमचा सवाल आहे. मी काही राजकीय टिप्पणी करणार नाही, पण हा निर्णय चुकीचा आहे. त्यामुळे कोर्टात याचिका दाखल केली असल्याचं धोत्रे यांनी म्हटलं आहे.

Follow Us
टायगर श्रॉफ प्रकरणातील सुनावणीला सुरुवात; पोलिसांनी मागितली....
Tiger Shroff : टायगर श्रॉफ प्रकरणातील सुनावणीला सुरुवात; पोलिसांनी मागितली 14 दिवसांची कोठडी
दसरा मेळावा की कॉमेडी सर्कस? नवनाथ बन यांची ठाकरे- राऊतांवर बोचरी टीका
Navnath Ban on Uddhav Thackeray : दसरा मेळावा की कॉमेडी सर्कस? नवनाथ बन यांची उद्धव ठाकरे-संजय राऊतांवर बोचरी टीका, पुढे म्हणाले...
उद्धव ठाकरे, एकनाथ शिंदे आणि मनोज जरांगे यांचे मेळावे म्हणजे...
Gunratna Sadavarte : उद्धव ठाकरे, एकनाथ शिंदे आणि मनोज जरांगे यांचे मेळावे म्हणजे...; गुणरत्न सदावर्तेंचा जोरदार हल्लाबोल
सुमन पाटलांची निवडणुकीतून माघार, पडद्यामागे नेमकं काय घडलं?
Sangli Bank Election : सुमन पाटलांची निवडणुकीतून माघार, सांगलीच्या राजकारणात चर्चांना उधाण; पडद्यामागे नेमकं काय घडलं?
मला कोपऱ्यात टाकलं, कोणी आयोजन केलंय? दसरा मेळाव्यात शिंदे आयोजकांवर..
Eknath Shinde : मला कोपऱ्यात टाकलं, कोणी आयोजन केलंय? दसरा मेळाव्यात एकनाथ शिंदे आयोजकांवर संतापले; नेमकं काय घडलं?
जिओच्या आयपीओला अवघ्या 100 मिनिटांत तुफान प्रतिसाद; गुंतवणूकदारांनी...
Jio IPO : जिओच्या आयपीओला अवघ्या 100 मिनिटांत तुफान प्रतिसाद; गुंतवणूकदारांनी काय लक्षात ठेवावं?
एमएच-सीईटी परीक्षा रद्द झाली की डिसेंबरमध्ये होणार? CET सेलने अफवांवर
MHT-CET Exam Update : एमएच-सीईटी परीक्षा रद्द झाली की डिसेंबरमध्ये होणार? CET सेलने अफवांवर दिलं मोठं स्पष्टीकरण
मोदी-अदानींवरील डॉक्युमेंटरी व्हायरल; साबिर भाटियासह 29 X अकाउंट...
PM Modi Documentry : मोदी-अदानींवरील डॉक्युमेंटरी व्हायरल; साबिर भाटिया यांच्यासह 29 X अकाउंटधारकांना थेट...
मुख्यमंत्री फडणवीस, शिंदे, सुनेत्रा पवार दिल्लीत; द्रौपदी मुर्मूंची...
Delhi : मुख्यमंत्री फडणवीस, शिंदे आणि सुनेत्रा पवार दिल्लीत; राष्ट्रपती द्रौपदी मुर्मूंची घेणार भेट, कारण काय?
प्रदीप पूर्णेकर प्रकरणात मोठी घडामोड; राजेंद्र शिंदे पाचव्यांदा....
Pradeep Purnekar Case : प्रदीप पूर्णेकर प्रकरणात मोठी घडामोड; राजेंद्र शिंदे पाचव्यांदा चौकशीसाठी हजर, तपासात काय उघड होणार?