मराठवाडाही देशाचाच भाग, आता केंद्रानेच मदत करावी, संजय राऊतांची थेट मागणी

मराठवाड्यात मुसळधार पावसामुळे झालेल्या पुराने मोठे नुकसान झाले आहे. खासदार संजय राऊत यांनी केंद्र आणि राज्य सरकारांकडे तातडीने मदत करण्याची मागणी केली आहे.

मराठवाडाही देशाचाच भाग, आता केंद्रानेच मदत करावी, संजय राऊतांची थेट मागणी
| Updated on: Sep 23, 2025 | 3:17 PM

सध्या मराठवाड्यात मुसळधार पाऊस कोसळत आहे. मराठवाड्यातील मुसळधार पाऊस आणि पुरामुळे मोठे नुकसान झाले आहे. यामुळे अनेक ठिकाणी हाहाकार माजला आहे. यामुळे मराठवाड्यात ओला दुष्काळ जाहीर करा अशी मागणी केली जात आहे. त्यातच आता शिवसेना खासदार संजय राऊत यांनी मराठवाड्यातील पूरस्थितीबद्दल चिंता व्यक्त केली आहे. मराठवाड्यात मुसळधार पाऊस आणि पुराने मोठे नुकसान झाले आहे. यामुळे केंद्र आणि राज्य सरकारांनी तातडीने मदत करावी अशी मागणी संजय राऊतांनी केली आहे.

मराठवाड्यात मुसळधार पाऊस आणि पुराने मोठे नुकसान झाले असून अनेक ठिकाणी हाहाकार माजला आहे. यामुळे, मराठवाड्यात ओला दुष्काळ जाहीर करण्याची वेळ आली आहे, असे खासदार संजय राऊत यांनी म्हटले आहे. पूर आणि पावसामुळे जनता संकटात असताना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि त्यांचे सहकारी मुंबई आणि ठाण्यात राजकीय कार्यक्रम, मेट्रो-मोनोरेलचे उद्घाटन आणि भाषणांमध्ये व्यस्त आहेत. त्यांनी सरकार आणि मुख्यमंत्र्यांनी यातून बाहेर पडून मराठवाड्याकडे लक्ष देण्याची गरज आहे, असे संजय राऊत म्हणाले.

या संकटकाळात केंद्र सरकारने मराठवाड्याला मदत करावी अशी अपेक्षा आहे. मराठवाडा हा देशाचाच एक भाग आहे, असे समजून केंद्र सरकारने मोठी मदत द्यावी. याबद्दल बोलताना संजय राऊत यांनी पंजाबमधील पूरस्थितीचा दाखला दिला. केंद्र सरकारने मराठवाडा हा देशाचाच भाग आहे हे समजून खूप मोठी मदत करणं गरजेचं आहे. पंजाबला पूर आला आहे, पंजाब सुद्धा पुरात वाहून चालला आहे. पंजाब सारख्या राज्याला पंतप्रधानांनी अत्यंत तुटपुंजी मदत केली. गुजरातला जास्त मदत मिळते ही लोकभावना आहे. आम्ही सुद्धा याच देशाचे घटक आहोत आणि प्रधानमंत्री आमचे सुद्धा आहेत असं आम्ही मानतो, असेही संजय राऊतांनी म्हटले.

मदत करण्याची मुख्य जबाबदारी केंद्र सरकारची

“आम्ही सुद्धा याच देशाचे घटक आहोत आणि प्रधानमंत्री आमचे सुद्धा आहेत असे आम्ही मानतो. मराठवाड्याने निजामांविरुद्ध देशासाठी लढा दिला होता. त्यामुळे या भागाला अशाप्रकारे दुर्लक्षित करणे योग्य नाही. महाराष्ट्रावर ९ लाख कोटी रुपयांचे कर्ज आहे. त्यामुळे राज्य सरकार मराठवाड्याला किती मदत करू शकेल, याबद्दल शंका आहे. त्यामुळे मदत करण्याची मुख्य जबाबदारी केंद्र सरकारची आहे., असेही संजय राऊत म्हणाले.

मंत्रिमंडळाच्या बैठकीत तातडीने निर्णय घेतले पाहिजेत. पूरग्रस्त भागात गुरे-ढोरे, शेती आणि घरे वाहून गेली आहेत. शेतकऱ्यांच्या निवाऱ्याची आणि जनावरांच्या चाऱ्या-पाण्याची सोय करणे आवश्यक आहे. तसेच, वाहून गेलेल्या शाळांचीही व्यवस्था करणे गरजेचे आहे. या परिस्थितीत राजकारण न करता सर्वपक्षीय लोकप्रतिनिधींनी एकत्र येऊन निर्णय घ्यावा, अशी मागणी संजय राऊत यांनी केली.