Disha Salian case : दिशा सालियान प्रकरणावर मंत्री छगन भुजबळ यांची पहिली मोठी प्रतिक्रिया, म्हणाले, सत्य..

Disha Salian case : दिशा सालियान प्रकरण तूफान चर्चेत आले. या प्रकरणात सातत्याने आदित्य ठाकरे यांच्यावर आरोप केली जात आहेत. दिशाचे वडिलांनी काल मातोश्रीवर जाऊन अब्रुनुकसानीची नोटीस दिली. त्यात आता या प्रकरणात छगन भुजबळ यांनी मोठी प्रतिक्रिया दिली.

Disha Salian case : दिशा सालियान प्रकरणावर मंत्री छगन भुजबळ यांची पहिली मोठी प्रतिक्रिया, म्हणाले, सत्य..
Disha Salian Aditya Thackeray Chhagan Bhujbal
| Updated on: Sep 20, 2026 | 1:03 PM

मंत्री छगन भुजबळ यांनी दिशा सालियान प्रकरणात मोठे भाष्य केले. दिशा सालियानचे वडील सतीश सालियान हे सातत्याने आदित्य ठाकरे यांच्यावर आरोप करताना दिसत आहेत. आता सीबीआयकडून या प्रकरणाचा तपास केला जात आहे. सीबीआयच्या जबाबात त्यांनी आदित्य ठाकरेंसह उद्धव ठाकरेंचे नाव घेतले. दिशा सालियान प्रकरणावर राज्यातील अनेक नेत्यांनी प्रतिक्रिया दिली. काहींकडून थेट आदित्य ठाकरे यांच्यावर आरोप केली जात आहेत. त्यातच आता यावर बोलताना छगन भुजबळ यांनी म्हटले की, हे प्रकरण न्यायप्रविष्ट आहे. चौकशी करणाऱ्या संस्था सत्य बाहेर आणतील. पुढे कुंभमेळाव्याच्या बैठकीवर बोलताना भुजबळांनी म्हटले की, त्यांच्या बैठकीला मला जाता आले नाही. अधिकारी येऊन मला सांगणार आहेत. त्यांनी जबाबदारी घेतली आहे, ते जबाबदारी पार पाडणार आहेत. सर्व काम वेळेत आणि चांगली होणार आहेत. जे ठरले आहे तसे झाले पाहिजे, वेळेत काम करावे असे वाटते.

राष्ट्रवादीच्या अधिवेशनवर बोलताना भुजबळांनी म्हटले की, तयारी सुरु आहे. पर्यटकाला मारहाण झाली. मी आताच माहिती घेतली. एसपीसोबत बोलतो. पर्यटकांकडून स्थानिकांच्या मोटारसायकलला धक्का लागला आणि त्यावरुन प्रकार वाढला. पर्यटन आपल्या जिल्ह्याला येतात. अनेक लोक इथे येतात. विसावा घेण्यासाठी लोक येतात. चुक झाली असेल शांततेत मार्ग काढला पाहिजे.

पर्यटक मोठी अर्थव्यवस्था आहे. एसपीनीही हे लक्षात घेतले पाहिजे, स्थानिक पोलीसांनी काळजी घेतली पाहिजे, पेट्रोलिंग झाले पाहिजे, पोलिसांनी जागरुक राहिले पाहिजे. गंगापुर रोडवरील झाडांच्या मुद्द्यावर बोलताना भुजबळ म्हणाले की,  मी पालिका आयुक्तांसोबत बोललो. पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतले आहे. संबंधित कंपनीला ब्लॅकलीस्ट केले आहे.  नागरिकांनीच आता रस्त्यावर आले पाहिजे. आता आपल्यालाच काम करावे लागेल, हे लोक असतात.

कुंभ जागा अधिग्रहणावर बोलताना भुजबळांनी म्हटले की, जर 38 हजार कोटी खर्च करणार आहेत. मागचे पैसे देणे आहे ते दिलेच पाहिजे. कोणावर अन्याय करता कामा नये. ही तयारी करतांना नाशिककरांच्या जिवावर उठणार नाही. नांदेडमधील दुष्काळाच्या मुद्द्यावर आयोजित बैठकीतील काजु बदामच्या मुद्द्यावर बोलताना छगन भुजबळ यांनी म्हटले की, कॅबिनेटमध्ये चर्चा झाली.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us