
मंत्री पंकजा मुंडे यांचा बीड येथील सावरगाव येथे भगवान भक्तीगडावर भव्य असा दसरा मेळावा पार पडतोय. पंकजा मुंडे, प्रीतम मुंडे आणि धनंजय मुंडे एकाच मंचावर आलेत. पंकजा मुंडे यांच्या दसरा मेळाव्यात सहभागी होण्याच्या अगोदर धनंजय मुंडे यांनी भगवान गडावर जाऊन भगवान शास्त्रींची भेट घेत आर्शिवाद घेतले. पंकजा मुंडे यांनी दसरा मेळाव्यातील भाषणाला सुरूवात करण्याच्या अगोदर आशिर्वाद मंचावर घेऊन भाषणाला सुरूवात केली. पंकजा मुंडे म्हणाल्या की, माझ्या दसऱ्या मेळाव्याला राज्यभरातून लोक येतात. झाडावर टॉवर बसलेले लोक स्वत: आले आहेत. मी तुम्हाला आणलं का? तुम्ही स्वत: आला असाल तर तोंडं बंद करा. माझ्या दसऱ्या मेळाव्यात पूर्ण राज्यातून लोक येत आहेत. दरवर्षी येतात. पण मागच्या वर्षीपासून असं हलके वागणारे लोक का येत आहेत.
तुमची भगवान बाबांवर श्रद्धा आहे. असे धिंगाणा करणारे लोकं माझे असू शकत नाही. आज माझ्यासाठी… माझ्या भगवान बाबांसाठी आणि गोपीनाथ मुंडेंचा वारसा जगण्यासाठी आलेल्या प्रत्येक माणसाचं हृदयातून स्वागत करते. हा फाटक्या माणसाचा मेळावा आहे, असेही पंकजा मुंडे यांनी म्हटले. यादरम्यान पंकजा मुंडे यांनी शायरीतून आपल्या भावना व्यक्त करत म्हणाल्या की, विरासत में संघर्ष मिला है, तो जिद भी मिली है लडने की…
चाहे जो भी हो, दटकर आगे बढने की…बदलू मै क्यों मै विचारोंकी अटल चोटी हूँ…मै गोपीनाथ मुंडे की बेटी हूँ..असे पंकजा मुंडे यांनी म्हटले. यादरम्यान बोलताना पंकजा मुंडे यांनी म्हटले की, माझा भगवान गडावरील मेळावा काढून घेतला गेला. कोणाची सुपारी घेऊन आलात माहिती नाही, असेही पंकजा मुंडे यांनी म्हटले.
लोकांचं दुख पाहून वेदना झाल्या. मी शब्दात मांडू शकत नाही. मोदी आणि फडणवीस यांच्यावतीने शब्द देतो आम्ही शेतकऱ्यांच्या पाठी आहोत. पूर्ण मदत करणार आहोत. भगवान गडाचा दसरा हिरावून घेतला. आता हा मेळावाही तुम्ही हिरावून घेताय असं वाटतं. तुम्ही शुद्धीवर नाही. तुम्हाला शरम वाटली पाहिजे. तुम्ही माझी माणसं नाहीत. गोंधळ घालणाऱ्यांनी कितीही माझ्या नावाच्या घोषणा दिल्या तरी तुम्ही पवित्र होणार नाही. कारण अशी बेशिस्त मी यापूर्वी मेळाव्यात पाहिली नव्हती,असे पंकजा मुंडे यांनी म्हटले.
मी एका बौद्ध समाजातील माणसाच्या घरी गेले. तर माझा वंजारा समाजाचा माणूस राशन घेऊन गेला. कैकाडी समाजाच्या कुटुंबाला राशन दिलं. यातून जाती गळून पडत आहे. मला आनंद आहे की जाती गुंडाळून माणुसकीचा धागा जोडण्याचं काम आपण केलं. भगवान बाबा म्हणायचे एक एकर शेती विका पण शिका. मी तुम्हाला आवाहन करते की दोन घास कमी खा. पण स्वाभिमानाने राहा. कुणाचे तुकडे उचलू नका. खोटे धंदे करू नका. काही गरज नाही हे करायचे. चांगल्या माणसाचं चांगलं होतंय. भगवान बाबांचे आशीर्वाद सोबत आहे.