AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मोठी बातमी! उपोषणापूर्वीच मनोज जरांगे पाटलांनी आर्धी लढाई जिंकली? विखे पाटलांचं मोठं आश्वासन, वेगवान घडामोडी

मनोज जरांगे पाटील यांनी पुन्हा एकदा आमरण उपोषणाची घोषणा केली आहे. ते 30 मे पासून उपोषणाला सुरुवात करणार आहेत. या पार्श्वभूमीवर आज सरकारचं शिष्टमंडळ जरांगे पाटील यांची भेट घेणार आहे.

मोठी बातमी! उपोषणापूर्वीच मनोज जरांगे पाटलांनी आर्धी लढाई जिंकली? विखे पाटलांचं मोठं आश्वासन, वेगवान घडामोडी
Radhakrishna Vikhe PatilImage Credit source: टीव्ही 9 मराठी
| Updated on: May 29, 2026 | 3:07 PM
Share

मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी पुन्हा एकदा आंदोलनाची हाक दिली आहे. ते मराठा आरक्षणासंदर्भातील आपल्या विविध मागण्यांसाठी उद्यापासून पुन्हा एकदा आंतरवाली सराटीमध्ये आमरण उपोषणाला सुरुवात करणार आहेत. या सर्व पार्श्वभूमीवर आता घडामोडींना वेग आला आहे. आज सरकारचं शिष्टमंडळ मनोज जरांगे पाटील यांची भेट घेणार आहे. या शिष्टमंडळामध्ये मंत्री राधाकृष्ण विखे पाटील आणि भाजप नेते प्रसाद लाड यांचा समावेश आहे. दरम्यान राधाकृष्ण विखे पाटील हे छत्रपती संभाजीनगरमध्ये दाखल झाले आहेत. ते इथे विभागीय आयुक्त कार्यालयात अधिकाऱ्यांची बैठक घेणार आहेत, या बैठकीनंतर ते आंतरवाली सराटीकडे रवाना होणार आहेत.

दरम्यान मनोज जरांगे पाटील यांच्या भेटीपूर्वी बोलताना राधाकृष्ण विखे पाटील यांनी मोठं विधान केलं आहे.  चर्चेला शिष्टमंडळ येऊद्या पण मी उपोषणावर ठाम आहे, असं मनोज जरांगे पाटील यांनी म्हटलं आहे. त्यावर प्रतिक्रिया देताना राधाकृष्ण विखे पाटील यांनी मोठं विधान केलं आहे. ‘शेवटी तो पाटलांचा अधिकार आहे, उपोषणासंदर्भात त्यांनी जे मुद्दे उपस्थित केले आहेत, ते मला वाटतं आमच्या चर्चेनंतर त्यांचं समाधन होईल असा मला विश्वास आहे, असं विखे पाटील यांनी म्हटलं आहे.

काही ठिकाणी अधिकाऱ्यांबद्दल तक्रारी आहेत, की त्यांनी व्हॅलिडीटी असूनही दाखले दिले नाहीत. अशा पद्धतीच्या काही तक्रारी लोकांकडून करण्यात आल्या आहेत. आज आधी आम्ही त्याचा आढावा घेणार आहोत, आणि त्यानंतर आम्ही मनोज जरांगे पाटील यांची भेट घेणार आहोत, असं विखे पाटील यांनी म्हटलं आहे. दरम्यान या बैठकीनंतर विखे पाटील आणि प्रसाद लाड हे आंतरवाली सराटीकडे रवाना होणार आहेत.

लाड यांची प्रतिक्रिया 

मी गुरुवारची मनोज जरांगे पाटील यांची पत्रकार परिषद पाहिली. त्यांनी या पत्रकार परिषदेमधून मला देखील भावनिक आवाहन केलं. परंतु तुम्ही मला सांगितलं होतं की मी समितीच्या अध्यक्षांसोबत चर्चा करेल त्यांना घेऊन या. त्यानुसार कालचा एक दिवस सोडून आम्ही आज आलो आहोत. काल विखे पाटील कांद्याच्या प्रश्नासंदर्भात दिल्लीला होते. त्यामुळे काल रात्री ते मुंबईत आले आणि आज पहाटे आणि दोघेही मुंबईवरून निघालो. त्यामुळे आता मनोजदादा यांनी आम्ही केलेल्या आवाहानाचा विचार करायला पाहिजे. जरी भावनिक आवाहन असलं तरी बंधू म्हणूनच मी आवाहन केलं आहे. मराठा समाजाचा कार्यकर्ता म्हणूनच आवाहन केलं आहे, असं यावेळी लाड यांनी म्हटलं आहे.

Follow Us
सतीश चव्हाणांच्या प्रचारासाठी सुनेत्रा पवार मैदानात; बीडमध्ये राजकीय..
सतीश चव्हाणांच्या प्रचारासाठी सुनेत्रा पवार मैदानात; बीडमध्ये राजकीय हालचालींना वेग
मोठी बातमी! युट्युबर ध्रुव राठींच्या अडचणी वाढल्या; थेट वॉरंट जारी,
मोठी बातमी! युट्युबर ध्रुव राठींच्या अडचणी वाढल्या; थेट वॉरंट जारी, आता...
जामीनाच्या अटींचं उल्लंघन भोवलं! अभिजीत दिपके अटकेत, तर नेहा बोरा...
जामीनाच्या अटींचं उल्लंघन भोवलं! अभिजीत दिपके अटकेत, तर नेहा बोराची 12 तसांसनंतर सुटका
एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेत मोठे फेरबदल होणार? मंत्र्यांना डच्चू, तरुण..
एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेत मोठे फेरबदल होणार? मंत्र्यांना डच्चू, तरुण आमदारांना संधी
प्रदीप पुरणेकर प्रकरणात संजय राऊतांचा मोठा इशारा; दसऱ्यानंतर ठाण्यात..
प्रदीप पुरणेकर प्रकरणात संजय राऊतांचा मोठा इशारा; दसऱ्यानंतर ठाण्यात जाऊन उघड करणार नवी माहिती!
राजकीय घडामोडींना वेग! लातूर जिल्हा बँक निवडणुकीमध्ये महायुतीत फूट
राजकीय घडामोडींना वेग! लातूर जिल्हा बँक निवडणुकीमध्ये महायुतीत फूट
अमृता फडणवीसांनी गायलं गाणं, प्रवीण दरेकरांनी धरला ठेका; बोरिवलीतील...
अमृता फडणवीसांनी गायलं गाणं, प्रवीण दरेकरांनी धरला ठेका; बोरिवलीतील गरबा उत्सवात रंगत!
डॉनाल्ड ट्रम्प यांचा मोठा निर्णय, रशियन तेलाबाबत अमेरिकेची भूमिका...
डॉनाल्ड ट्रम्प यांचा मोठा निर्णय, रशियन तेलाबाबत अमेरिकेची भूमिका बदलली? आता भारतात...
प्रतापगडावर 367 मशालींचा झगमगाट! शिवरायांच्या शौर्याचा जागर, मशाल...
प्रतापगडावर 367 मशालींचा झगमगाट! शिवरायांच्या शौर्याचा जागर, मशाल महोत्सवाने किल्ला उजळला
मोठी बातमी! भाजपचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी अपोलो रुग्णालयात दाखल
मोठी बातमी! भाजपचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी अपोलो रुग्णालयात दाखल