भरत गोगावले यांनी तिथे जायला नको होते… गोगावले तटकरेंच्या भेटीने नाराजी, महेंद्र दळवी यांनी थेट..
आमदार महेंद्र दळवी यांनी नुकताच मोठे विधान केले. त्यांनी सुनील तटकरेंच्या घरी भरत गोगावले गणपतीसाठी गेल्याने नाराजी जाहीर केली. फक्त नाराजीच नाही तर सुनील तटकरे यांच्यावर जोरदार टीका केली.

आमदार महेंद्र दळवी यांनी भरत गोगावले सुनील तटकरेंच्या घरी गणपती दर्शनाला गेल्याने नाराजी जाहीर केली. महेंद्र दळवी यांनी म्हटले की, रायगड जिल्ह्याच्या राजकीय परिस्थितीनुसार भरत गोगावले यांनी जायला नको होते. सुनील तटकरे हे भरत गोगावले यांच्या घरी गणपती बघायला जातील का असं देखील सवाल महेंद्र दळवी यांनी उपस्थित केला आहे. राष्ट्रवादी पक्ष म्हणून नाही तर सुनील तटकरे यांच्या वरती आमची नाराजी हे निश्चित आहे. अनेकांना सुनील तटकरे यांनी रस्त्यावर आणून सोडण्याचं काम निश्चित केले आहे. तटकरे कुटुंबाविषयी आमची नाराजी नक्की आहे. नितीन गडकरी यांच्या विधानावर बोलताना दळवी यांनी म्हटले की, केंद्रीय मंत्री अशा पद्धतीचा वक्तव्य करत असतील तर या सर्व पद्धतीचा दोष तटकरेंवर निश्चित जातो.
आतापर्यंत वीस वर्षात जेवढे कॉन्टॅक्टर निघून गेले त्याच्या बापाचा बाप तटकरेच आहे निश्चित त्याच्यावरती आम्ही आरोप करतो. तटकरेंनी आतापर्यंत जिल्ह्यामध्ये गेल्या 20 वर्षात प्रोजेक्ट आणले ते अर्धवट आहेत तटकरेने एकाच कामात दहा दहा वेळा निधी टाकून सरकारी लूट करणे हा त्यांच्या कुटुंबीयांचा व्यवसाय आहे. अशा उद्भवलेला परिस्थितीमध्ये भरत गोगावले यांनी तटकरे यांच्या घरी गणपतीला दर्शनाला जाणे उचित नाही.
भरत गोगावले यांनी असं वक्तव्य करणं उचित नाहीये. कदाचित अनिकेत तटकरे आमच्यामुळे आमदार झाले तटकरे यांच्या कुटुंबामुळे भरत गोगावले पालकमंत्री झालेले नाहीत, पालकमंत्री होण्यासाठी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस एकनाथ शिंदे सुनेत्रा पवार यांच्या माध्यमातून त्यांना हे पद मिळाले आहे. तटकरे यांनी पालकमंत्री पद थांबवले होते…राजकीय गेम प्लॅन करणे तटकरेचं काम आहे.
ब्लॅकमेलिंग राजकारणामध्ये करण हे तटकरे फॅमिलीचा व्यवसाय निश्चित आहे. वरिष्ठांच्या आदेशाप्रमाणे आम्ही विधान परिषदेची सीट सोडले आणि राष्ट्रवादीला दिले. कोकणाची हक्काची सीट आम्ही दिली हे आम्हा कोकण वासियांचं दुर्दैव निश्चित आहे. यामध्ये देखील उदय सामंत यांची भूमिका महत्त्वाची होती त्यांचे देखील तटकरे विषयी प्रेम ऊतू आलं होतं. आज आम्ही त्या मतावर सहमत आहोत की अनिकेत तटकरे आमच्यामुळे विधान परिषदेचे आमदार झाले भरत गोगावले त्यांच्यामुळे पालकमंत्री झाले हा शोध मोहिमेचा विषय निश्चित आहे.