पीडित कुटुंबियांची रोहित पवार यांच्याकडून भेट, थेट म्हटले, अध्यक्ष नसल्यातरीही अधिकारी..

पुण्यातील भोर तालुक्यात धक्कादायक घटना घडली. या घटनेने एकच खळबळ उडाली. नरसापूर येथे साडेतीन वर्षाच्या चिमुरडीवर अत्याचार करण्यात आला. या घटनेनंतर लोक आक्रमक झाले. मुख्यमंत्र्यांनी आश्वासन दिल्यानंतर कुटुंबियांनी चिमुलकीवर अत्याचार केला.

पीडित कुटुंबियांची रोहित पवार यांच्याकडून भेट, थेट म्हटले, अध्यक्ष नसल्यातरीही अधिकारी..
Rohit pawar
| Updated on: May 03, 2026 | 12:09 PM

पुण्यातील भोर तालुक्यातील नरसापूर येथे साडेतीन वर्षाच्या चिमुरडीवर अत्याचार करण्यात आला. या अत्याचारानंतर थेट त्या लेकराची हत्या करण्यात आली. ग्रामस्थांनी आरोपीला फाशी द्यावी, त्याला ताब्यात द्यावे या मागणीसाठी बेंगळुरू-पुणे महामार्ग रोखून धरला होता. राज्याच्या उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी पीडित कुटुंबियांची भेट घेतली. विरोध राजकारण करत असल्याचा आरोप सत्ताधाऱ्यांकडून करण्यात आली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कुटुंबियांना आश्वासन दिल्यानंतर कुटुंबियांनी चिमुलकीवर अंत्यसंस्कार केले. यादरम्यान पीडित मुलीच्या वडिलांनी राजकीय लोकांना न भेटण्याची भूमिका घेतली आहे. राजकीय लोकांनी भेटीस येऊ नये, असे त्यांनी म्हटले. नुकताच रोहित पवार पीडित कुटुंबियांना भेटण्यासाठी गेले. यावेळी माध्यमासोबत बोलताना रोहित पवार यांनी मोठे विधान केले.

आमदार रोहित पवार यांनी बोलताना म्हटले की, या प्रकरणात जी पाऊले उचचली पाहिजे, ती उचलली जात नाहीत. राज्य महिला आयोगाकडून पाठपुरवठा झाला नाही. बालहक्क समितीकडून योग्य दखल घेण्यात आली नाही. एक चांगला वकील या प्रकरणात देण्यात यावा. जी वकील संघटना आहे भोर तालुक्यातील त्यांचे मी आभार व्यक्त करतो. अशी एक चर्चा आहे की, जो आरोपी आहे, त्याचे कोणीही वकील पत्र घेणार नाही, अशी भूमिका त्यांनी मांडली.

त्यामुळे सामाजिक कार्यकर्ते, नेते, जनता सर्वजण या कुटुंबासोबत भक्कमपणे उभे आहेत. काल त्या चिमुललीला न्याय मिळाला म्हणून लोक काम करत होते. पीएम होत असताना काल तिथे बराचवेळ लागला. ठीक आहे काही प्रक्रिया असतात, त्यामुळे वेळ लागला असावा. खटल्यात सरकारने चांगले वकील द्यावेत.

काल सुनेत्रा काकी आल्या होत्या. त्यांनीही या कुटुंबियांचे सीएमसोबत बोलणे करून दिले. मुख्यमंत्र्यांनी शब्द दिला आहे, जे येथील सामाजिक कार्यकर्त्यांनी बोलून दाखवला. महिला आयोगाच्या अध्यक्षा नसल्यातरीही अधिकारी आहेत, असेही सांगताना रोहित पवार दिसले. या प्रकरणातील आरोपीवर यापूर्वी दोन गुन्हे दाखल असल्याचीही माहिती मिळत आहे. मात्र, या घटनेने एकच मोठी खळबळ उडालीये.

Follow Us