2 वर्षे होऊनही निधीचं आश्वासन पाळलं नाही, मनसेकडून नगरमधील खड्डेमय रस्त्याला सुजय विखेंचं नाव

मनसेने अहमदनगरमधील खराब रस्त्याला थेट भाजप खासदार सुजय विखे यांचं नाव देऊन निषेध आंदोलन केलं आहे (MNS give name of Sujay Vikhe to road having potholes).

2 वर्षे होऊनही निधीचं आश्वासन पाळलं नाही, मनसेकडून नगरमधील खड्डेमय रस्त्याला सुजय विखेंचं नाव
Follow us
| Updated on: Oct 06, 2020 | 3:52 PM

अहमदनगर : खराब रस्त्यांच्या मुद्द्यावर अहमदनगरमध्ये मनसे आक्रमक झालेली दिसत आहे. मनसेने याविरोधात निषेध म्हणून आंदोलन करुन खड्डेमय रस्त्याला थेट भाजप खासदार सुजय विखे यांचं नाव दिलं आहे. नगरमधील काटवन खंडोबा रस्त्याची अवस्था अत्यंत दयनीय झालेली आहे. मात्र, त्याकडे तेथील लोकप्रतिनिधी खासदार डॉ. सुजय विखे यांचं दुर्लक्ष झाल्याचा आरोप मनसेने केला आहे (MNS give name of Sujay Vikhe to road having potholes in Ahmednagar).

शिवसेनेतील गटबाजीमुळे देखील काटवन रस्त्याचं काम रखडल्याचा आरोप मनसेचे जिल्हा सचिव नितीन भुतारे यांनी केलाय. याबाबत लोकप्रतिनिधी खासदार सुजय विखे यांच्याकडे वारंवार मागणी करुनही काटवन खंडोबा रोडची दुरुस्ती होत नाही. या खराब झालेल्या रस्त्याच्या परिस्थितीला खासदार सुजय विखे हेही जबाबदार आहेत. त्यामुळेच या रस्त्याला खासदार सुजय विखे मार्ग असे नाव दिल्याचं मनसेनं सांगितलं आहे.

2 वर्षांपासून या रोडला निधी देणार असे पत्र खासदार सुजय विखे यांनी महानगरपालिका आयुक्तांकडे दिले. परंतु आजपर्यंत खासदार सुजय विखे यांनी कुठलाही निधी या रोडसाठी दिलेला नाही. उलट दलित वस्ती निधीतून हा रोड दुरुस्त होणार होता, तर शिवसेना नगरसेवकांनी हे काम उपायुक्तांवर दबाव आणून बंध पाडलं, असा आरोप मनसे जिल्हाध्यक्ष सचिन डफळ यांनी केलाय.

मनसेच्या वतीने वारंवार मागणी करुनही काटवन खंडोबा रोडची दुरुस्ती झाली नाही. त्यामुळे मनसेने रस्त्याच्या खराब झालेल्या परिस्थितीला खासदार सुजय विखे हेच जबाबदार असल्याचा आरोप केला. तसेच याचा निषेध म्हणून रस्त्याला खासदार सुजय विखे मार्ग असं नामकरण करण्यात आलं. निधी न मिळाल्याने अखेर दलित वस्ती निधीतून हा रोड दुरुस्ती होणार होता. त्या कामाची मंजुरी 31 ऑक्टोबर 2018 रोजी देण्यात आली होती. परंतु स्थनिक शिवसेना नगरसेवकांनी हे काम उपायुक्तांवर दबाव आणून 9 सप्टेंबर 2019 रोजी पत्र देऊन बंद पाडलं.

शिवसेनेच्या 4 नगरसेवकांच्या अंतर्गत गटबाजीमुळे या रस्त्याचं काम थांबल्याचा आरोप मनसेने केला आहे. यामुळे या भगातील नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे, असंही मनसेनं म्हटलं. हा रस्ता खासदार निधीतून करावा किंवा दलित वस्ती निधीतून करावा हा महानगरपालिकेचा प्रश्न आहे.

महानगर पालिका आयुक्तांनी काटवन खंडोबा रोडचे काम ताबडतोब मार्गी लावावे. अन्यथा मनसेच्या वतीने नविन टिळक रोड ते नेप्ती नाका चौकापर्यंतच्या रोडवर रास्ता रोको आंदोलन करण्यात येईल, असा इशारा नितीन भुतारे यांनी दिला आहे. या आंदोलनात मनसेचे जिल्हाध्यक्ष्य सचिन डफळ, मनोज राऊत, गजेंद्र राशिनकर, अॅड अनिता दिगे, विनोद काकडे, दिपक दांगट, पोपट पाथरे, अशोक दातरंगे, तुषार हिरवे, गणेश शिंदे, अमोल बोरुडे, आकाश कोल्हाळ, अनिकेत जाधव, अंबादास गोटीपामुल आदी कार्यकर्ते सहभागी झाले होते.

हेही वाचा :

कर्जबाजारी झालो तरी चालेल, पण स्व:खर्चाने खड्डे बुजवल्याशिवाय राहणार नाही, केडीएमसीतील अपक्ष नगरसेवकाचा निर्धार

खड्डेमय रस्त्यांनी बार्शीकर हैराण, थेट राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाकडून दखल

ठेकेदार कंपनी ब्लॅकलिस्ट, अधिकाऱ्यांवरही कारवाई, रस्त्यावरील खड्ड्यांप्रकरणी वसई-विरार आयुक्तांची थेट कारवाई

MNS give name of Sujay Vikhe to road having potholes in Ahmednagar

Non Stop LIVE Update
2017 ला कुठे बैठक झाली? हे सांगू शकतो, मुंडेंचा पवारांबाबत गौप्यस्फोट
2017 ला कुठे बैठक झाली? हे सांगू शकतो, मुंडेंचा पवारांबाबत गौप्यस्फोट.
मतदान करावं म्हणून न्हाव्याची भन्नाट ऑफर, बोटावरची शाई दाखवा आणि...
मतदान करावं म्हणून न्हाव्याची भन्नाट ऑफर, बोटावरची शाई दाखवा आणि....
बूथवर मतदारांच्या रांगा अन् मतदान बंद ठेऊन कर्मचारी करतायत जेवण
बूथवर मतदारांच्या रांगा अन् मतदान बंद ठेऊन कर्मचारी करतायत जेवण.
म्हातार लय खडूस, तिजोरीची किल्ली कंबरेला.., शरद पवारांवर कुणाचा निशाणा
म्हातार लय खडूस, तिजोरीची किल्ली कंबरेला.., शरद पवारांवर कुणाचा निशाणा.
मतदारच नाही, मतदान केंद्र पडली ओस; मतदारांचा मतदानावर का बहिष्कार?
मतदारच नाही, मतदान केंद्र पडली ओस; मतदारांचा मतदानावर का बहिष्कार?.
हे मोदीकृत भाजपाचे षडयंत्र, EVM वर शंका व्यक्त करत राऊतांचा गंभीर आरोप
हे मोदीकृत भाजपाचे षडयंत्र, EVM वर शंका व्यक्त करत राऊतांचा गंभीर आरोप.
राणा दाम्पत्याची बुलेटस्वारी, किती मतांनी विजय? नवनीत राणा म्हणाल्या..
राणा दाम्पत्याची बुलेटस्वारी, किती मतांनी विजय? नवनीत राणा म्हणाल्या...
दुसऱ्या टप्प्यात अनोख्या मतदाराची चर्चा, थेट माकड कडेवर घेऊन केल मतदान
दुसऱ्या टप्प्यात अनोख्या मतदाराची चर्चा, थेट माकड कडेवर घेऊन केल मतदान.
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?.
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल.