धर्मेंद्र प्रधान ऐवढ निर्लज्ज कसे? याचा अर्थ लाच कोळून प्यायलेत; मनसे नेत्याचा जोरदार हल्लाबोल
मनसे नेते संदीप देशपांडे यांनी विद्यार्थी आंदोलनावरून सरकारवर जोरदार टीका केली आहे. मुंबई पोलिसांच्या कारवाईवरूनही अनेक सवाल उपस्थित केले.

देशभरात कॉक्रोच जनता पार्टीचं आंदोलन होत आहे. या आंदोलनाचे पडसाद महाराष्ट्रातही उमटू लागले आहेत. महाराष्ट्रातही मोठ्या प्रमाणात आंदोलन होत आहे. परंतु पोलिसांकडून आंदोलनात सामील होणाऱ्या तरुणांची पोलिसांकडून धरपकड सुरू आहे. दादरच्या शिवाजी पार्कातही पोलिसांनी आंदोलकांची धरपकड केली. पोलिसांच्या कारवाईवरून मनसे नेते संदीप देशपांडे यांनी मोदी सरकार आणि राज्य सरकारवर जोरदार टीका केली आहे. थर्मेंद्र प्रधान ऐवढे निर्लज्ज कसे आहेत, ठाऊक नाही, अशी टीका देशपांडे यांनी केली.
मनसे नेते संदीप देशपांडे यांनी माध्यमांशी संवाद साधला. संदीप देशपांडे म्हणाले, ‘स्वतः पोलिसांनी उत्तर द्यायला हवे. देवेंद्र फडणवीस यांना मी ओळखतो. ते अमित शहा यांच्या सारखे असंवेदनशील नाही. मुंबई पोलीस संवेदनशील आहेत, पण असे का वागत आहेत, माहीत नाही. केंद्रातील शासनाने ठरवावे की लोकशाही आहे की नाही? लोकशाही संपली त्यांनी सांगावे. मग आमचे पर्याय उघडे होतील. सर्वोच्च न्यायालयात ऐकत नाही. जयदीप धनगड यांचा राजीनामा घेतला, तो का घेतला? तुमच्या अंगाशी आला म्हणून? धर्मेंद्र प्रधान देशाच्या अंगाशी आला आहे. धर्मेंद्र प्रधान एवढे निर्लज्ज कसे आहे काय माहीत, लाच कोळून प्यायले आहे, याचा अर्थ आता कळलं. नरेंद्र मोदी यांनी रस्त्यावर येऊन पाहावे’.
‘मोदींनी आता एकदा मोबाईलवर तरी बघावे. सार्वजनिक ठिकाणी कसली जमावबंदी. ही झेन जी मुलं खूप हुशार आहेत, ही मूल आय फोन 17 प्रो मॅक्स आहेत आणि पोलिस नोकिया आहेत. महाराष्ट्र पुरोगामी आहे. पाकिस्तान व्याप्त काश्मिरात आंदोलन होतात, तर तेव्हा आपण पोस्ट करतो ना? या मुलांची काय चूक आहे, असा सवाल त्यांनी केला.
सत्ताधाऱ्यांकडून इन्फ्लुएन्सर यांना पैशांचा आमिष दिलं जात असल्याचा आरोप होत आहे. यावर देशपांडे यांनी म्हटलं की, हे प्रकरण त्यांच्या हाताबाहेर गेले आहे. आधी कलाकार पैसे घ्यायचे’. मुख्यमंत्री फडणवीसांवर टीका करताना देशपांडे म्हणाले, ‘मुख्यमंत्र्यांना काही बोललं तर महाराष्ट्राचा अपमान होतो, पण ते आता विद्यार्थ्यांचा अपमान करत आहेत’.