सोलापुरातील 800 पेक्षा अधिक ग्राम पंचायत सदस्यांचं पद रद्द

| Updated on: Jul 05, 2019 | 4:52 PM

सोलापूर:  सोलापूर जिल्ह्यातील जवळपास 800 पेक्षा अधिक ग्राम पंचायत सदस्यांचं पद रद्द होणार आहे. यामध्ये अनेक सरपंच-उपसरपंचांचा समावेश आहे. 11 तालुक्यातील 800 पेक्षा जास्त सदस्यांचा यामध्ये समावेश आहे. उच्च न्यायालयाने निवडणूक निकालानंतर सहा महिन्यांच्या आत जातवैधता प्रमाणपत्र सादर करण्यास बजावलं होतं. हे प्रमाणपत्र सादर न केलेल्या उमेदवारांचे सदस्यत्व रद्द करावे, असे आदेश कोर्टाने दिले होते. […]

सोलापुरातील 800 पेक्षा अधिक ग्राम पंचायत सदस्यांचं पद रद्द
Follow us on

सोलापूर:  सोलापूर जिल्ह्यातील जवळपास 800 पेक्षा अधिक ग्राम पंचायत सदस्यांचं पद रद्द होणार आहे. यामध्ये अनेक सरपंच-उपसरपंचांचा समावेश आहे. 11 तालुक्यातील 800 पेक्षा जास्त सदस्यांचा यामध्ये समावेश आहे.

उच्च न्यायालयाने निवडणूक निकालानंतर सहा महिन्यांच्या आत जातवैधता प्रमाणपत्र सादर करण्यास बजावलं होतं. हे प्रमाणपत्र सादर न केलेल्या उमेदवारांचे सदस्यत्व रद्द करावे, असे आदेश कोर्टाने दिले होते. याला राज्य शासनाने सहा महिन्यांची मुदत वाढवून दिली. उच्च न्यायालयाचे आदेशानंतर आणि राज्य शासनाच्या मुदतीनंतर, ज्या सदस्यांनी जातवैधता प्रमाणपत्र सादर केले नाही, अशा सदस्यांचे सदस्यत्व रद्द करण्यात येणार आहे.

जात वैधता प्रमाणपत्र सादर करण्यास राज्य शासनाने उच्च न्यायालयाच्या आदेशानंतर सहा महिने मुदत वाढवून दिली होती. राज्य शासनाची मुदत 24 ऑक्टोबर रोजी संपली. त्यानंतरही जिल्ह्यातील 800 पेक्षा अधिक ग्राम पंचायत सदस्यांनी तहसील कार्यालयाकडे जातवैधता प्रमाणपत्र सादरच केले नाही.  त्यामुळे आता त्यांच्यावर कारवाईचा बडगा उचलला जाणार आहे.