बीडच्या जेलमध्ये वाल्मिक कराडकडून मोबाईलचा वापर? खासदार बजरंग सोनावणे यांच्या आरोपाने राजकीय वर्तुळात खळबळ

बीडच्या जेलमध्ये वाल्मिक कराडकडून मोबाईलचा वापर होत असल्याचा आरोप खासदार बजरंग सोनवणे यांनी केला. यावेळी त्यांनी जेलमधील एक कथित कॉल रेकॉर्डिंग देखील ऐकवली.

बीडच्या जेलमध्ये वाल्मिक कराडकडून मोबाईलचा वापर? खासदार बजरंग सोनावणे यांच्या आरोपाने राजकीय वर्तुळात खळबळ
| Updated on: Oct 01, 2026 | 12:16 PM

संतोष देशमुख प्रकरणानंतर आता बीडमध्ये विलास घुले हत्या प्रकरणानेही खळबळ उडाली आहे. विलास घुले प्रकरणी नवनवीन माहिती समोर येत आहे. दोन गटात सुरू असलेलं भांडण सोडवण्यासाठी गेलेल्या विलास घुले नावाच्या तरुणाची हत्या करण्यात आली होती.  घटनेच्या काही महिन्यांनी आमदार धनंजय मुंडे यांनी विलास घुले याच्या कुटुंबीयांची भेट घेतली होती. आता या प्रकरणावरून खासदार बजरंग सोनवणे यांच्यावर गंभीर आरोप केले जात आहे. यानंतर बजरंग सोनवणे यांनी एका गंभीर आरोपाने खळबळ उडाली आहे. बीडमधील जेलमध्ये वाल्मिक कराडकडून मोबाईलचा वापर केला जातो, असा गंभीर आरोप खासदार सोनवणे यांनी केला आहे.

खासदार बजरंग सोनवणे यांनी म्हटलं की, ‘मला बदनाम करण्याचा कट रचला जातोय. माझ्या मुलाचं नाव त्यामध्ये घेण्याचा प्रयत्न केला गेला. या आरोपानंतर SIT , CID ने संपूर्ण चौकशी केली.  अगोदर माझं नाव येतंय असं सांगितलं, त्यानंतर माझ्या मुलाचं नाव येतंय म्हणून सांगितलं. पहिल्या फिर्यादीत FIR मध्ये माझ्या मुलाचं नाव नाही. मुलाचं नाव घेण्यासाठी कट रचला आणि मृतदेह पोलीस ठाण्यात ठेवण्यात आला, त्यानंतर हाऊसमध्ये आमदार बोलला. हा कट कसा रचला गेला, त्याची ऑडिओ आज महाराष्ट्राला ऐकवणार आहे. यामध्ये काही जणांनी जातीय दंगल घडवण्याचा प्रयत्न केला गेला.  येथील नगराध्यक्षा, नेते, गटनेते आणि इतर लोक माझ्यावर बोलले. त्यांनी खालचे आरोप केले. नवनाथ वाघमारेंसह 12 ते 13 लोकांवर मी 500 करोड रुपयांचा दावा टाकणार आहे’.

Loading...

‘पहिल्यांदा सांगितलं खासदारांनी मारायला सांगितलं, त्यानंतर म्हणाले सौरव सोनवणे पोलीस स्टेशनला आला. त्यानंतर म्हणाले सौरव सोनवणेने कट रचून मारले. त्यानंतर खोटी ॲट्रॉसिटी करायला लावली. पोलीस अधिकाऱ्यांना माझा खासदार म्हणून सवाल आहे. त्यामध्ये कुठले सर्टिफिकेट आहे ते दाखवावं. एसपी साहेब 10 वाजेपर्यंत म्हणतात सौरव सोनवणेचा यामध्ये संबंध नाही. 10 नंतर एसपींवर काय प्रेशर आलं की पुरवणी जबाबात नाव घेतलं? या वादातच मंगेश कदम नावाचा व्यक्ती जखमी झाला तो पोलीस स्टेशन मध्ये गेले तेथुन पोलिसांनी बाहेर काढले. त्यानंतर दवाखान्यात रमेश घुले आणि गुंडांनी जखमी मंगेश कदमला मारले त्याचे CCTV आहेत. त्यांच्यावर अजुन केस झाली नाही. तो झाला पाहिजे. सोनवणे यांनी धक्कादायक कॉल रेकॉर्डिंग ऐकवली. त्यात वाल्किम कराडच्या नावाचा देखील उल्लेख आहे. सोनवणे पुढे म्हणाले, ‘माझ्या मुलाला अडकवण्याचा कट रचला. मी पत्र देणार आहे. वाल्मिक कराड, रमेश घुले, सुग्रीव कराडवर गुन्हा दाखल झाला पाहिजे. जो जेलर आहे. जेलमधून कसा कट रचला जातोय. जेल प्रशासनावर पण गुन्हा दाखल झाला पाहिजे, असे त्यांनी पुढे सांगितले.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us