MPSC आंदोलनस्थळी येताच विरोधात विद्यार्थ्यांच्या घोषणा, मागण्या पूर्ण होताच ओमराजे निंबाळकर यांनी थेट म्हटले..
Omraje Nimbalkar On MPSC Protest Pune : एमपीएससीच्या विद्यार्थ्यांना मोठे यश मिळाले. रोहित पवार या आंदोलनात विद्यार्थ्यांसोबत उभे होते. त्यातच विद्यार्थ्यांना मोठे यश मिळाले. खासदार ओमराजे निंबाळकर विद्यार्थ्यांची भेट घेण्यासाठी पुण्यातील आंदोलनात पोहोचले होते. मात्र, त्यांना विद्यार्थ्यांच्या रोषाचा सामना करावा लागला.

पुण्यातील एमपीएससीच्या आंदोलनाला यश आले. अकरा दिवसांपासून एमपीएससीचे विद्यार्थी पुण्यात आंदोलन करत होते. आमदार रोहित पवार विद्यार्थ्यांच्या समर्थनार्थ मैदानात उतरले आणि विद्यार्थ्यांसोबत आंदोलन करत होते. एमपीएससीच्या अध्यक्षांचा राजीनामा घ्यावा, अशी मागणी विद्यार्थ्यांची होती. एमपीएससीच्या पेपरफुटी प्रकरणात विद्यार्थी आंदोलन करत होते. या आंदोलनाला राजकीय वळण लागण्याचा दावा केला जात होता. यासोबतच हायकोर्टात काही पुणेकरांनी या आंदोलनाविरोधात धाव घेतली. एमपीएससीच्या अध्यक्षांचा राजीनामा झाल्याशिवाय मागे हटणार नसल्याची भूमिका विद्यार्थ्यांची होती. एमपीएससीच्या विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला भेट देण्यासाठी खासदार ओमराजे निंबाळकर पोहोचले होते. मात्र, त्यांना विद्यार्थ्यांच्या रोषाला सामोरे जावे लागले. काही विद्यार्थ्यांनी थेट घोषणाबाजी केली.
एमपीएससीच्या विद्यार्थ्यांनी आंदोलन स्थगित केल्यानंतर खासदार ओमराजे निंबाळकर यांनी मोठी प्रतिक्रिया दिली. ओमराजे निंबाळकर यांनी एक्सवर पोस्ट शेअर केली. एमपीएससी परीक्षांमधील कथित गैरप्रकारांच्या चौकशीसाठी उच्चस्तरीय चौकशी आयोग आणि चौकशी पूर्ण होईपर्यंत अध्यक्ष विवेक भीमनवार यांनी रजेवर जाण्याचा घेतलेला निर्णय घेतला. ही विद्यार्थ्यांच्या विश्वासाच्या दृष्टीने महत्त्वाची पावले आहेत, अशी प्रतिक्रिया खासदार ओमराजे निंबाळकर यांनी दिली.
तसेच विद्यार्थ्यांच्या मागण्यांची दखल घेऊन शासनाने स्वीकारलेल्या सकारात्मक भूमिकेचे स्वागत करतो. आपल्या हक्कांसाठी ठामपणे उभ्या राहिलेल्या सर्व विद्यार्थ्यांच्या जिद्दीचे आणि एकजुटीचे मनःपूर्वक अभिनंदन.. कष्टाने अभ्यास करणाऱ्या प्रत्येक विद्यार्थ्याला पारदर्शक परीक्षा प्रक्रिया आणि गुणवत्तेनुसार संधी मिळाली पाहिजे. शासनाचा घटक म्हणून विद्यार्थीहिताच्या निर्णयांची प्रभावी अंमलबजावणी व्हावी, हीच माझी भूमिका आहे, असं ओमराजे निंबाळकरांनी सांगितले.
आता ओमराजे निंबाळकर यांची हीच पोस्ट सोशल मीडियावर तूफान व्हायरल होत आहे. ओमराजे निंबाळकर ज्यावेळी विद्यार्थ्यांच्या भेटीला पोहोचले होते, त्यावेळी त्यांना विद्यार्थ्यांच्या रोषाला सामोरे जावे लागले होते. विद्यार्थ्यांनी त्यांच्याविरोधात घोषणाबाजी केली. ज्याचे व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाली. त्यातच आता विद्यार्थ्यांच्या यशानंतर ओमराजे निंबाळकर यांनी पोस्ट शेअर करत विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले. लोक या पोस्टवर मोठ्या प्रमाणात कमेंट करत आहेत.