जेव्हा संभाजीराजे, धैर्यशील माने, संजय मंडलिक, सतेज पाटील एकत्र जावडेकरांची भेट घेतात…

पंचगंगा नदीच्या प्रदूषणामध्ये लक्षणीय वाढ होत आहे. या पार्श्वभूमीवर कोल्हापूरच्या लोकप्रतिनिधींनी पर्यावरणमंत्री प्रकाश जावडेकर यांची भेट घेतली (Sambhajiraje Chhatrapati Prakash Javadekar)

जेव्हा संभाजीराजे, धैर्यशील माने, संजय मंडलिक, सतेज पाटील एकत्र जावडेकरांची भेट घेतात...
कोल्हापूरच्या लोकप्रतिनिधींची जावडेकरांशी भेट
Follow us
| Updated on: Mar 17, 2021 | 11:17 AM

कोल्हापूर : कोल्हापूरच्या पंचगंगा नदीच्या प्रदूषणमुक्तीवरुन स्थानिक वारंवार नाराजी व्यक्त करत असतात. आता कोल्हापूर जिल्ह्यातील लोकप्रतिनिधींनीच दिल्लीत साकडे घातले आहे. भाजप, शिवसेना आणि काँग्रेस या तीन वेगवेगळ्या पक्षातील नेत्यांनी केंद्राकडे धाव घेतली. भाजपचे राज्यसभा खासदार संभाजीराजे छत्रपती, शिवसेना खासदार संजय मंडलिक, शिवसेना खासदार धैर्यशील माने यांच्यासह कोल्हापूरचे पालकमंत्री आणि काँग्रेस नेते सतेज पाटील यांनी केंद्रीय पर्यावरण मंत्री प्रकाश जावडेकर यांची भेट घेतली. (MP Sambhajiraje Chhatrapati Dhairyasheel Mane Sanjay Mandlik Satej Patil meets Minister Prakash Javadekar)

प्रकाश जावडेकर यांच्या दिल्लीतील निवासस्थानी बैठक झाली. पंचगंगा नदीच्या प्रदूषणमुक्तीसाठी राज्य सरकार करत असलेल्या उपाययोजनांना केंद्राकडून सहकार्य करण्याची विनंती या भेटीत करण्यात आली. त्यावर आवश्यक ते सहकार्य करण्याची ग्वाही प्रकाश जावडेकर यांनी दिली.

(MP Sambhajiraje Chhatrapati Dhairyasheel Mane Sanjay Mandlik Satej Patil meets Minister Prakash Javadekar)

मुख्यमंत्र्यांकडून कठोर कारवाईचे निर्देश

कोल्हापूर जिल्ह्याची जीवनवाहिनी म्हणून ओळखली जाणारी पंचगंगा नदी प्रदूषणामुळे काळवंडली आहे. गेल्या काही दिवसांपासून पंचगंगा नदी प्रदूषित झाल्याच्या अनेक बातम्या समोर आल्या होत्या. पंचगंगा नदी प्रदूषणाची मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी गंभीर दखल घेतली आहे. पंचगंगेच्या प्रदुषणासाठी कारणीभूत असणाऱ्या, सांडपाण्यावर योग्य प्रक्रिया न करता ते पंचगंगेत सोडणाऱ्या, नदी प्रदूषण नियंत्रणासंदर्भातील नियमांचे उल्लंघन करणाऱ्या उद्योगांवर कारवाई करण्यात यावी. त्यांना थेट टाळे लावण्यात यावे आणि त्यांनी नियमांची पूर्तता केल्यानंतरच टाळे उघडण्यात यावे, अशा सक्त सूचना मुख्यमंत्र्यांनी जानेवारी महिन्यात दिल्या होत्या.

पंचगंगेच्या ढासळलेल्या बुरुजात झोपून ‘क्रिएटिव्ह’ आंदोलन

पंचगंगा घाटावरील पडलेल्या बुरुजात झोपून कोल्हापूरकरांनी अनोखे आंदोलन केले होते. गेल्या सहा महिन्यांपासून पंचगंगा घाटावरील बुरुज कोसळला आहे. मात्र लोकप्रतिनिधींनी दुर्लक्ष केल्याचा ठपका ठेवत कोल्हापूरकर आक्रमक झाले. आमदार, खासदार यांच्यासह सर्व लोकप्रतिनिधी आणि अधिकाऱ्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देणार नसल्याचं होर्डिंग त्यांनी हाती धरलं होतं.

संबंधित बातम्या :

मुख्यमंत्र्यांकडून पंचगंगेतील प्रदूषणाची गंभीर दखल, जबाबदार कंपन्यांना टाळे ठोका, जिल्हाधिकाऱ्यांना निर्देश

कोल्हापुरात खासदार धैर्यशील मानेंसमोर आंदोलक महिलांच्या पंचगंगा नदीत उड्या

VIDEO | मंत्री-अधिकाऱ्यांना शुभेच्छा देणार नाही, पंचगंगेच्या ढासळलेल्या बुरुजात झोपून ‘क्रिएटिव्ह’ आंदोलन

(MP Sambhajiraje Chhatrapati Dhairyasheel Mane Sanjay Mandlik Satej Patil meets Minister Prakash Javadekar)

Non Stop LIVE Update
2017 ला कुठे बैठक झाली? हे सांगू शकतो, मुंडेंचा पवारांबाबत गौप्यस्फोट
2017 ला कुठे बैठक झाली? हे सांगू शकतो, मुंडेंचा पवारांबाबत गौप्यस्फोट.
मतदान करावं म्हणून न्हाव्याची भन्नाट ऑफर, बोटावरची शाई दाखवा आणि...
मतदान करावं म्हणून न्हाव्याची भन्नाट ऑफर, बोटावरची शाई दाखवा आणि....
बूथवर मतदारांच्या रांगा अन् मतदान बंद ठेऊन कर्मचारी करतायत जेवण
बूथवर मतदारांच्या रांगा अन् मतदान बंद ठेऊन कर्मचारी करतायत जेवण.
म्हातार लय खडूस, तिजोरीची किल्ली कंबरेला.., शरद पवारांवर कुणाचा निशाणा
म्हातार लय खडूस, तिजोरीची किल्ली कंबरेला.., शरद पवारांवर कुणाचा निशाणा.
मतदारच नाही, मतदान केंद्र पडली ओस; मतदारांचा मतदानावर का बहिष्कार?
मतदारच नाही, मतदान केंद्र पडली ओस; मतदारांचा मतदानावर का बहिष्कार?.
हे मोदीकृत भाजपाचे षडयंत्र, EVM वर शंका व्यक्त करत राऊतांचा गंभीर आरोप
हे मोदीकृत भाजपाचे षडयंत्र, EVM वर शंका व्यक्त करत राऊतांचा गंभीर आरोप.
राणा दाम्पत्याची बुलेटस्वारी, किती मतांनी विजय? नवनीत राणा म्हणाल्या..
राणा दाम्पत्याची बुलेटस्वारी, किती मतांनी विजय? नवनीत राणा म्हणाल्या...
दुसऱ्या टप्प्यात अनोख्या मतदाराची चर्चा, थेट माकड कडेवर घेऊन केल मतदान
दुसऱ्या टप्प्यात अनोख्या मतदाराची चर्चा, थेट माकड कडेवर घेऊन केल मतदान.
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?.
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल.