AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Sanjay Raut-Raj Thackeray : मोठी बातमी, संजय राऊत अचानक राज ठाकरेंच्या शिवतीर्थावर, नेमकं काय घडतंय?

Sanjay Raut-Raj Thackeray : महाराष्ट्रात विधान परिषद निवडणुकीची धामधूम सुरु असतानाच अचानक खासदार संजय राऊत मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या भेटीसाठी त्यांच्या निवासस्थानी पोहोचले आहेत.

Sanjay Raut-Raj Thackeray : मोठी बातमी, संजय राऊत अचानक राज ठाकरेंच्या शिवतीर्थावर, नेमकं काय घडतंय?
Sanjay Raut-Raj Thackeray
| Updated on: Jun 05, 2026 | 12:44 PM
Share

महाराष्ट्रात विधान परिषद निवडणुकीची धामधूम सुरु असतानाच अचानक खासदार संजय राऊत मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या भेटीसाठी त्यांच्या निवासस्थानी पोहोचले आहेत. शिवतीर्थ या राज ठाकरेंच्या दादर शिवाजी पार्कमधील निवासस्थानी संजय राऊत दाखल झाले आहेत. संजय राऊत आणि राज ठाकरे यांच्या भेटीमागचं कारण काय? ते अजून स्पष्ट झालेलं नाही. सध्या महाराष्ट्रात स्थानिक स्वराज्य संस्थांमधील विधान परिषदेच्या 17 जागांच्या निवडणुकीची धामधूम सुरु आहे. महायुतीने 17 पैकी 6 जागा जिंकल्या आहेत. जळगाव, नाशिकमध्ये बंडखोरी झाल्याने पेच वाढला आहे. या निवडणुकीत महायुतीमध्येच सामना आहे. महाविकास आघाडी या स्पर्धेत कुठेही दिसत नाहीय. आज संजय राऊत यांनी या निवडणुकीवरुन काही आरोप केले होते.

कोकणातील माघारीसाठी 25 कोटी रुपये दिले. त्यातले 15 कोटी रुपये बीकेसीतल्या एका हॉटेलमध्ये दिले, असा सनसनाटी आरोप संजय राऊत यांनी केला. कोकणातून उद्धव ठाकरे गटाचे बाळ माने महाविकास आघाडीचे उमेदवार होते. पण संख्याबळ नसल्याने त्यांनी माघार घेतली. त्यामुळे अनिकेत तटकरेच्या विजयाचा मार्ग मोकळा झाला. त्यावरुन संजय राऊत यांनी आरोप केला. आता संजय राऊत यांनी राज ठाकरेंची भेट घेण्यामागे हे कारण आहे की, अजून काही ते स्पष्ट झालेलं नाही.

सहा जागांवर समाधान मानावं लागलं

संजय राऊत हे दोन्ही ठाकरे बंधुंमधील दुवा मानले जातात. मुंबई महापालिका निवडणुकीच्यावेळी दोन्ही ठाकरे बंधुंना एकत्र आणण्यात संजय राऊत यांनी महत्वाची भूमिका बजावली होती. मराठी मतांची फाटाफूट होऊ नये ही त्यामागे भूमिका होती. दोन्ही ठाकरे बंधुंनी राजकारणात एकत्र यावं ही अनेक वर्षांची इच्छा त्यामुळे पूर्ण झाली. पण महापालिकेत ठाकरे बंधुंना सत्ता आणता आली नाही. या निवडणुकीत उद्धव ठाकरे गटाने मुंबईत 65 जागा जिंकल्या. राज ठाकरे यांच्या पक्षाला सहा जागांवर समाधान मानावं लागलं.

सध्या तरी ठाकरे बंधुंच्या आघाडीवर शांतता

या निवडणुकीआधी ठाकरे बंधु बऱ्याचवेळा एकत्र दिसले. दोघांनी एकत्र शाखांना भेटी दिल्या. शिवतीर्थ आणि मातोश्रीवर दोघांचं येणं-जाणं वाढलं होतं. पण निवडणूक निकालानंतर तितका एकोपा दिसला नाही. सध्या तरी ठाकरे बंधुंच्या आघाडीवर शांतता आहे. राज ठाकरेंनी सुद्धा या विधान परिषद निवडणुकीवर काही भाष्य केलेलं नाही.

Follow Us
विशाखा राऊतांचं नगरसेवकपद रद्द! कारवाईनंतर पहिली प्रतिक्रिया आली समोर
Vishakha Raut | विशाखा राऊतांचं नगरसेवकपद रद्द! कारवाईनंतर पहिली प्रतिक्रिया आली समोर
...तर 10 मिनिटांत महाराष्ट्र बंद पाडला पाहिजे! जरांगेंचा सरकारला इशारा
...तर 10 मिनिटांत महाराष्ट्र बंद पाडला पाहिजे! जरांगेंचा सरकारला कडक इशारा
20-22 दिवसांपासून पाऊस गायब, सोयाबीनवर येलो मोझॅकचा कहर!
Nanded | 20-22 दिवसांपासून पाऊस गायब, सोयाबीनवर येलो मोझॅकचा कहर! नांदेडमध्ये हजारो एकर पीक धोक्यात
तू तुझं तुझं बघ ना! सदावर्तेंच्या मागणीला अंबादास दानवेंचं परखड उत्तर
Ambadas Danve On Gunaratna Sadavarte | तू तुझं तुझं बघ ना! बाळासाहेब ठाकरेंच्या फोटोवरून सदावर्तेंच्या मागणीला अंबादास दानवेंचं परखड उत्तर, पुढे म्हणाले...
ठाकरे गटाला मोठा धक्का बसणार! विकासकामांसाठी... त्या बड्या नेत्याने...
ठाकरे गटाला मोठा धक्का बसणार! विकासकामांसाठी अनेक जण आमच्याशी संपर्कात, त्या बड्या नेत्याने सगळंच सांगितलं
अजित दादांचं काय झालं? जरांगे पाटलांनी उपस्थित केला थेट सवाल...
Manoj Jarange | अजित दादांचं काय झालं? जरांगे पाटलांनी उपस्थित केला थेट सवाल, पुढे म्हणाले...
सप्टेंबरमध्ये पावसाऐवजी सूर्य आग ओकतोय! सोयाबीन माना टाकू लागलं
Amravati | सप्टेंबरमध्ये पावसाऐवजी सूर्य आग ओकतोय! अमरावतीत सोयाबीन माना टाकू लागलं; शेतकरी संकटात
पोलिसांनी अडवलं तर बाजूला सारून पुढे जा; हल्ला केला तर...
Manoj Jarange | पोलिसांनी अडवलं तर बाजूला सारून पुढे जा; हल्ला केला तर... जरांगेंनी सांगितली आंदोलनाची रणनीती!
विखे पाटलांच्या अध्यक्षतेखाली मोठी बैठक; कुणबी प्रमाणपत्रासाठी...
Kunbi Certificate Update | विखे पाटलांच्या अध्यक्षतेखाली मोठी बैठक; कुणबी प्रमाणपत्रासाठी महत्त्वाचे निर्णय, जरांगेंच्या डेडलाइनपूर्वी सरकारची तयारी
मागण्या तात्काळ मान्य करा, नाहीतर...अंबादास दानवेंचा सरकारला थेट इशारा
Ambadas Danve | मागण्या तात्काळ मान्य करा, नाहीतर... जरांगे पाटलांच्या खालावलेल्या प्रकृतीवर अंबादास दानवेंचा सरकारला थेट इशारा