मोठी बातमी! मुंबई पुणे एक्सप्रेस वे वर वाहनांच्या मोठ्या रांगा, सुप्रिया सुळे तब्बल दोन तासांपासून..

सलग सुट्ट्या आल्याने मुंबई पुणे एक्सप्रेसवर मोठी वाहतूक कोडीं निर्माण झाली. या वाहतूक कोडींचा मोठा फटका खासदार सुप्रिया सुळे यांनाही बसल्याचे दिसत आहे. गेल्या दोन तासांपासून सुप्रिया सुळे या वाहतूक कोडींत अडकल्या आहेत.

मोठी बातमी! मुंबई पुणे एक्सप्रेस वे वर वाहनांच्या मोठ्या रांगा, सुप्रिया सुळे तब्बल दोन तासांपासून..
MP Supriya Sule
| Updated on: May 01, 2026 | 10:39 AM

मुंबई पुणे एक्सप्रेस वे वर मोठी वाहतूक कोंडी झाली. वाहनांच्या मोठ्या रांगा लागल्या आहेत. सलग तीन सुट्ट्या असल्याने लोक घराबाहेर पडली आहेत. दोन तासांपासून मुंबई पुणे एक्सप्रेसवर मोठी वाहतूक कोडीं निर्माण झाली. याचा फटका लोकांना बसत आहे. मुंबईहून पुण्याकडे जाणाऱ्या लेनवर वाहनांच्या रांगा लागल्या आहेत. तीन सलग सुट्ट्या असल्याने मुंबईकर मोठ्या प्रमाणात लोणावळ्याच्या दिशेने निघाले आहेत. सकाळपासूनच वाहतूक धिम्यागतीने सुरू होती. मात्र, आता दोन तासांपेक्षाही अधिक वेळापासून मोठा जाम लागला आहे. विकेंडमुले एक्सप्रेसवर वाहनांच्या लांबच लांब रागा बघायला मिळत आहेत. अमृतांजन ब्रिज ते खोपोली एक्झिटपर्यंत वाहतूक कोंडी आहे. वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी महामार्ग पोलिसांचा पुणे लेनवर पंधरा मिनिटांचा ब्लॉक आहे. मात्र, वाहतूक काही सुरळीत होत नाही.

खासदार सुप्रिया सुळे यांनाही या वाहतूक कोडींचा मोठा फटका बसल्याचे बघायला मिळत आहे. या वाहतूक कोडींत सुप्रिया सुळे दोन तासांपासून अडकून बसल्या आहेत. सुप्रिया सुळे यांनी काही व्हिडीओही तयार केली आहेत. सुप्रिया सुळे व्हिडीओमध्ये मी दोन तासांपासून वाहतूक कोडींत अडकल्याचे सांगताना दिसत आहेत. शिवाय त्या शेजारी असलेल्या वाहनचालकांनाही गप्पा मारत आहेत.

या वाहतूक कोडींमध्ये माझी या वाहनचालकांसोबत चांगली मैत्री झाली. आम्ही दोन तासांपासून इथेच आहोत, असे म्हणताना सुप्रिया सुळे आणि इतर वाहनचालक दिसत आहेत. सुप्रिया सुळे यांनी नक्की किती जास्त वाहतूक कोडीं आहे, हे देखील दाखवले आहे. त्यांनी वाहतूक कोडींचा व्हिडीओही शेअर केला. सकाळी सात वाजता निघूनही इथेच असल्याचे सांगताना काही वाहनचालक दिसत आहेत.

मुंबई पुणे एक्सप्रेस वे वरील वाहतूक कोडींचा मोठा फटका सुप्रिया सुळे यांनीही बसल्याचे दिसत आहे. दोन तासांपासून त्यांची गाडी काही पुढे जाताना दिसत नाहीये. सलग सुट्ट्या आल्या की, मुंबई पुणे एक्सप्रेस वे वर वाहतूक कोडीं मोठ्या प्रमाणात होते. सध्या पोलिसांकडून वाहतूक कोडींतून मार्ग काढला जात आहे. वाहतूक सुरळीत करण्याकरिता प्रयत्न केला जात आहे.

 

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us