SSC Result 2026 Maharashtra Board Declared and Link LIVE : दोन्ही कानाने ऐकू येत नाही, पण लीप मुव्हमेंटवरून शिकली, मुलीचं यश पाहून तुम्हीही थक्क व्हाल

Maharashtra Board 10th (SSC) Result 2026 LIVE Link at TV9 Marathi Check : महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून घेण्यात आलेल्या इयत्ता 10वीचा निकाल आज लागला आहे. यंदा राज्याचा एकूण निकाल 92.09 टक्के निकाल लागला असून कोकण विभाग अव्वल ठरला आहे.

SSC Result 2026 Maharashtra Board Declared and Link LIVE : दोन्ही कानाने ऐकू येत नाही, पण लीप मुव्हमेंटवरून शिकली, मुलीचं यश पाहून तुम्हीही थक्क व्हाल
| Edited By: | Updated on: May 08, 2026 | 10:00 PM

महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून घेण्यात आलेल्या 12 वीचा निकाल गेल्या आठवड्यात लागला. तेव्हापासूनच 10 वीच्या विद्यार्थ्यांची उत्सुकता वाढली. अखेर आज इयत्ता 10 वीचा निकाल  आज लागला.   फेब्रुवारी-मार्च 2026 मध्ये राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने 10 वीची परीक्षा घेतली होती. लाखो विद्यार्थी त्या परीक्षेला बसले होते, त्यांचा निकाल आज अखेर लागला. 11 वाजता बोर्डाची पत्रकार परिषध झाली. राज्याचा एकूण निकाल 92.09 टक्के लागला असून कोकण विभागाचा निकाल सर्वाधिक आहे.  दरवर्षीप्रमाणे यंदाही मुलींनी निकालात बाजी मारली आहे.

यंदा 10वीच्या विद्यार्थ्यांना निकाल दुपारी 1 ऐवजी लवकर पाहता आला.  विद्यार्थी त्यांचा निकाल ऑनलाईन तसेच इतर माध्यमांद्वारे चेक करू शकतात.

तसेच www.tv9marathi.com वेबसाईटवरही विद्यार्थ्यांना आपला निकाल पाहता येईल. यासोबतच mahahsscboard.in आणि mahresult.nic.in वर जाऊन आपला रोल नंबर आणि आवश्यक माहिती भरून निकाल पाहू शकतात.10 वीच्या निकालाचे प्रत्येक अपडेट्स, तुम्हाला इथे tv9 लाईव्ह ब्लॉगवरही जाणून घेता येतील. निकालाचे अपडेट्स जाणून घेण्यासाठी हा ब्लॉग फॉलो करा.

LIVE NEWS & UPDATES

The liveblog has ended.
  • 08 May 2026 09:59 PM (IST)

    वादळात झाड कोसळून तरुणाचा मृत्यू

    अचानक सुटलेल्या प्रचंड वेगाच्या वाऱ्यामुळे वाघोदा – निंभोरा रस्त्यावरील रस्त्याच्या कडेला उभे असलेले मोठे झाड क्षणार्धात कोसळले आणि त्याचवेळी रस्त्याने मोटारसायकलवरून जात असलेल्या तरुणावर हे झाड पडून त्यांचा जागीच मृत्यू झाल्याची घटना घडली आहे.

  • 08 May 2026 08:30 PM (IST)

    नगर – मनमाड महामार्गावर भीषण अपघात, कंटेनर कारवर उलटला

    शिर्डा जवळील सावळीविहीर शिवारात नगर – मनमाड महामार्गावर भिषण अपघात झाला आहे. मालवाहतूक कंटेनरचे टायर फुटल्याने माल वाहतूक कंटेनर कारवर उलटला. संभाजीनगरहून शिर्डीला साईदर्शनासाठी आलेल्या भक्तांच्या वाहनावर हा कंटेनर उलटला. सुदैवानं या अपघातामध्ये कोणतीही जीवितहानी झालेली नाहीये. करमधील भाविक किरकोळ जखमी झाल्याची माहिती समोर येत आहे.

     

     

  • 08 May 2026 07:54 PM (IST)

    अंधेरी रेल्वे स्थानक पोस्ट ऑफिसचे आधुनिक रुपात उद्घाटन

    अंधेरी रेल्वे स्थानक (आरएस) पोस्ट ऑफिसचे ‘जन सेवा कनेक्ट’ प्रकल्पांतर्गत आधुनिक आणि भविष्यकालीन सुविधांनी सज्ज असे नूतनीकरण करण्यात आले असून, त्याचे उद्घाटन आज केंद्रीय दळणवळण आणि ईशान्य विकास मंत्री ज्योतिरादित्य एम. शिंदे यांच्या हस्ते करण्यात येणार आहे. या कार्यक्रमाला महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची देखील उपस्थिती असणार आहे.

  • 08 May 2026 07:40 PM (IST)

    कराटे प्रशिक्षकाकडून अल्पवयीन मुलीवर दोनदा अत्याचाराचा प्रयत्न

    कराटे प्रशिक्षकाकडून अल्पवयीन मुलीवर दोनदा अत्याचाराचा प्रयत्न

    कल्याणमध्ये संतापजनक घटना

    प्रशिक्षण घेणाऱ्या इतर मुलींसोबतही असे कृत्य केल्याचा संशय

    शिवसेना ठाकरे गट आक्रमक

  • 08 May 2026 03:06 PM (IST)

    Maharashtra Board 10th (SSC) Result 2026 : श्रवणशक्ती पूर्ण गमावलेल्या शांभवीचे दहावीच्या परीक्षेत नेत्रदीपक यश

    पूर्ण श्रवणशक्ती गमावलेल्या शांभवीने दहावीच्या परीक्षेत मोठं यश मिळवलं. जिद्दीच्या भरवशावर सामान्य विद्यार्थ्यांसोबत शिक्षण घेत तिने दहावीच्या परीक्षेत 94 टक्के गुण प्राप्त केले.

    शांभवीने नागपूरच्या सोमलवर शाळेची विद्यार्थिनी असून शांभवी पाचव्या वर्गात असताना कफचा त्रास सुरू झाला होता, त्यावेळी कोरोना असल्याने तिचे योग्य उपचार होऊ शकले नाही . कफाचा परिणाम शांभवीच्या श्रवण शक्तीवर झालाय, हळू -हळू तिला ऐकू येणे बंद झाले,आता शांभवीला बिलकुल ऐकू येत नाही . अशाही परिस्थितीत शांभवीवर पालक आणि शिक्षकांनी विश्वास दाखवला . शांभवीने सामान्य विद्यार्थांसोबत पाचवीपासूनचे शिक्षण पूर्ण करून दहावीत 94 टक्के गुण प्राप्त केले

  • 08 May 2026 02:55 PM (IST)

    कांद्याला भाव मिळत नसल्याने कांदा उत्पादक शेतकरी हवालदिल- मनोज जरांग

    कांद्याला भाव मिळण्यासाठी आंदोलन करावेच लागेल, याला एकजूट हाच पर्याय.. कांद्याला भाव मिळत नसल्याने मनोज जरांगे आक्रमक

  • 08 May 2026 02:45 PM (IST)

    निदा खान प्रकरणात जलील यांना सहआरोपी करा- शिरसाट

    निदा खान प्रकरणात जलील यांना सहआरोपी करा. SIT चौकशी लावण्याची मागणी मुख्यमंत्र्यांकडे करणार- शिरसाट

  • 08 May 2026 02:43 PM (IST)

    Maharashtra Board 10th (SSC) Result 2026 : नागपुरातील जुळ्या भावा बहिणीचं डबल सेलिब्रेशन, दोघांनाही मिळाले अगदी सारखे मार्क

    दहावी परीक्षेत अनेक विद्यार्थ्यांनी प्राविण्य मिळविले मात्र नागपुरातील जुळ्या भावा बहिणीने अगदी सारखे मार्क मिळविले. खिलाज आणि खुशी चांदेवर असे जुळ्या भावा बहिणीचे नाव असून या जुळ्या भावा बहिणीला दोघांनाही 97.2 टक्के मिळाले

    ते दोघे सोमलवार शाळेत शिकत होते . दोघंही सोबत अभ्यास करायचे मात्र दोघंही वेगवेगळ्या नोट्स काढायचे. लहानपणा पासून दोघंही सोबत राहिले सोबत अभ्यास केला आणि दोघांनी सारखे गुण मिळवले. पुढेही दोघांना सोबत अभ्यास करून गुण मिळवायचे आहेत.

  • 08 May 2026 02:30 PM (IST)

    नाशिकच्या मालेगावात कांदा उत्पादक शेतकरी दुहेरी संकटात.

    नाशिकच्या मालेगावात कांदा उत्पादक शेतकरी दुहेरी संकटात….. अवकाळी पावसामुळे कांदा भिजला, तर सध्या तीव्र उन्हामुळे साठवलेला कांदा सडू लागल्याने शेतकरी चिंतेत….त्यातच बाजारातील कवडीमोल भावामुळे शेतकरी दुहेरी संकटात

  • 08 May 2026 02:24 PM (IST)

    निदा खान प्रकरणात नाशिक पोलिसांची मोठी कारवाई

    निदा खान प्रकरणात नाशिक पोलिसांची मोठी कारवाई. MIM नगरसेवक मतीन पटेल सहआरोपी. मतीन पटेलवर निदा खानला लपवल्याचा आरोप. मतीन पटेल विरोधात नाशिकमध्ये गुन्हा दाखल

  • 08 May 2026 02:15 PM (IST)

    जलील यांनी नेहमीच निदा खानचं समर्थन केलं- पडळकर

    ‘निदा खान अटक प्रकरणात इम्तियाज जलील आणि MIMचे नगरसेवक मतीन पटेल यांची चौकशी करा’ भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर यांची मागणी.  जलील यांनी नेहमीच निदा खानचं समर्थन केलं- पडळकर

  • 08 May 2026 02:08 PM (IST)

    Maharashtra Board 10th (SSC) Result 2026 : गायत्रीचे मार्क पाहून अख्खा धारावी जिल्हा थक्क..

    धाराशिव जिल्ह्यात दहावीचा निकाल जाहीर झाला आहे उमरगा येथील डॉक्टर के डी इंग्लिश स्कूलची विद्यार्थिनी गायत्री महादेव पाटील हिने 100% गुण घेत दहावीला घवघवीत यश मिळवलं आहे.
    गायत्रीला पाचशेपैकी 492 गुण मिळाले. तसेच संगीताचे 8 गुण मिळून पाचशेपैकी पाचशे गुण मिळाले. ती सध्या नीटची तयारी करीत आहे. गायत्रीला डॉक्टर होऊन आईवडिलांचे स्वप्न पूर्ण करायचे आहे.

    सुरुवातीपासूनच चांगले गुण मिळवण्याची माझी इच्छा होती. त्यासाठी मेहनतही घेतली आणि त्याचे फळ मला मिळाले. मी रोज सकाळी लवकर उठून अभ्यास करत होते. मला डॉक्टर होण्याची इच्छा आहे, अशी प्रतिक्रिया शंभर टक्के गुण मिळवत उमरगा तालुक्यात प्रथम क्रमांक पटकावणाऱ्या गायत्री पाटील हिने व्यक्त केली.

  • 08 May 2026 01:35 PM (IST)

    Maharashtra Board 10th (SSC) Result 2026 : पाल्यांना समजून घ्या, अति महत्वाकांक्षी अपेक्षा नको – पंकज भोईर यांचे पालकांना आवाहन

    दिवसेंदिवस स्पर्धा वाढल्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये निराशा येते. पालकांना माझं आव्हान आहे अति महत्वाकांक्षी अपेक्षा पाल्याकडून बाळगू नका. पाल्यांना समजून घ्या आणि शिक्षकांच्या माध्यमातून व्यवस्थित काऊन्सिलिंग केल पाहिजे असं शालेय शिक्षण/गृह राज्यमंत्री पंकज भोईर म्हणाले.

  • 08 May 2026 01:15 PM (IST)

    Maharashtra Board 10th (SSC) Result 2026 : पुण्यातील ओजसीला मिळाले 100 पैकी 100 गुण

    दहावीच्या परीक्षेत पुण्यातील ओजसी अमोल ओगले या विद्यार्थिनीला 100 पैकी 100 गुण मिळाले. ती माधव सदाशिव गोळवलकर गुरुजी माध्यमिक विद्यालयची विद्यार्थीनी आहे. निकालानंतर तिने प्रतिक्रिया व्यक्त केली.

    शंभर पैकी शंभर मार्क मिळाल्याचा आनंद आहे. मला पैकीच्या पैकी मार्क मिळतील हा ठाम विश्वास होता. या यशात आई वडील शिक्षक यांचं मार्गदर्शन मला मिळालं.  प्रमाणित अभ्यास केला की यश नक्की मिळतं.  मला 11 वी सायन्सला जायचं आहे आणि पुढे रिसर्च करायचा आहे – असं ओजसी म्हणाली.

     

  • 08 May 2026 01:01 PM (IST)

    Maharashtra Board 10th (SSC) Result 2026 : 10 वीच्या रिझल्टमध्ये छत्रपती संभाजी नगर विभागाचा निकाल सर्वात कमी

    10वीचा निकाल जाहीर झाला., दरवर्षीप्रमाणे कोकण विभाग अव्वल ठरला. कोकणाचा निकाल 97.62 टक्के लागला आहे. मात्र यंदा सर्वात कमी निकाल लागलेल्या विभागाचं नावं ऐकून धक्का बसेल. यंदा छत्रपती संभाजी नगर विभागाचा निकाल सर्वात कमी तो अवघा 88.41 टक्के लागला आहे. तर लातूर विभाग शेवटून दुसऱ्या स्थानी असून लातूरचा निकाल 88.42 टक्के इतका आहे.

  • 08 May 2026 12:54 PM (IST)

    Maharashtra Board 10th (SSC) Result 2026 : टीव्ही9 मराठीवर चेक करा 10वीचा निकाल

    10वीचा निकाल  टीव्ही9 मराठीवरही चेक करता येणार आहे. टीव्ही9 मराठीच्या होम पेजला गेल्यावर तिथे तुम्हाला 10वी निकाल दिसेल. तिथे क्लिक करा. त्यानंतर रोल नंबर टाका आणि माहिती भरा. एक सेकंदात तुमचा निकाल स्क्रीनवर असेल.

  • 08 May 2026 12:50 PM (IST)

    Maharashtra Board 10th (SSC) Result 2026 : राज्यातील 179 विद्यार्थ्यांना 100 टक्के गुण; कोणत्या शहराचे किती विद्यार्थी?

  • 08 May 2026 12:46 PM (IST)

    Maharashtra Board 10th (SSC) Result 2026 : 10 वीच्या परीक्षेत कुठे किती कॉपी केसेस ?

    महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे घेण्यात आलेल्या दहावीच्या परीक्षाचा निकाल जाहीर झाला. या परीक्षांदरम्यान अनेक गैरप्रकार देखील उघडकीस आले आणि याचा फटका अनेक कर्मचाऱ्यांना बसला. पुण्यात 3 एफआयआर दाखल झाले तर लातूरमध्ये 1 एफआयआर दाखल झाला. 5 कर्मचारी निलंबित झाले. छत्रपती संभाजी नगर येथून एक, कोल्हापूर येथून २ आणि लातूर येथील देखील २ कर्मचाऱ्यांना निलंबित करण्यात आलं.

    किती घडले गैरप्रकार ?

    पुणे ४२, नागपूर ४६ , छत्रपती संभाजी नगर ७१, मुंबई ४४ , कोल्हापूर ४, अमरावती ६७, नाशिक ८२ आणि लातूर मध्ये ४२ गैर प्रकार घडल्याची माहिती समोर आली.

  • 08 May 2026 12:41 PM (IST)

    Maharashtra Board 10th (SSC) Result 2026 : 20 विषयांचा निकाल लागला 100 टक्के

    10 वीची परीक्षा फेब्रुवारी-मार्च 2026 मध्ये झाली. एकूण 64 विषयांची परीक्षा घेण्यात आली. त्यापैकी एकूण 20 विषयांचा निकाल हा 100 टक्के लागला आहे.

  • 08 May 2026 12:35 PM (IST)

    10th SSC Result : विद्यार्थ्यांची मार्कशीट, सर्टिफिकेट बाबतीत महत्वाची बातमी समोर

  • 08 May 2026 12:33 PM (IST)

    Maharashtra Board 10th (SSC) Result 2026 : 12 वी प्रमाणे यंदा 10वीच्या निकालाचा टक्काही घसरला, गेल्या वर्षीच्या तुलनेत निकाल कमी

    गेल्या आठवड्यात 12 वीचा निकाल लागला होता. तर आज 10वीच्या परीक्षेचा निकाल जाहीर झाला मात्र, 12 वी चा निकाल घसरला, त्याप्रमाणे यंदा 10 वीच्या निकालाची टक्केवारीही कमी झाली. गेल्या वर्षी, 2025 साली 10 वीचा निकाल 94.10 टक्के होता तर 2024 मध्ये हीच टक्केवारी 95.81 टक्के होती. यंदा 10 वीचा निकाल घसरला असून राज्याचा निकाल 92.02 टक्के इतका लागला आहे.

  • 08 May 2026 12:26 PM (IST)

    Maharashtra Board 10th (SSC) Result 2026 : राज्यात 10वीच्या निकालाचा मोठा उत्साह..

    महाराष्ट्रात 10 वीचा निकाल जाहीर झाला. या निकालाचा मोठा उत्साह पहायला मिळत आहे. यंदाही मुलींनी या निकालात मोठी बाजी मारली. मुलांपेक्षा मुलींची पास होण्याची टक्केवारी अधिक आहे. मुलींना मुलांना धोबीपछाड देत जास्त टक्केवारी कायम राखली.

  • 08 May 2026 12:24 PM (IST)

    Maharashtra Board 10th (SSC) Result 2026 : 10 वी परीक्षा रिझल्ट, ‘एटीकेटी’ सुविधा

    10वीच्या परीक्षेस प्रविष्ट झालेल्या आणि एक अथवा दोन विषयांत उत्तीर्ण होऊ न शकलेल्या विद्यार्थ्यांना प्रचलित पद्धतीप्रमाणे ‘एटीकेटी’ची (ATKT)  सुविधा लागू राहील. सदर सुविधेचा लाभ घेण्यासाठी 41 हजार 065 विद्यार्थी पात्र आहेत.

  • 08 May 2026 12:20 PM (IST)

    Maharashtra Board 10th (SSC) Result 2026 : टीव्ही9 मराठीवर पटापट चेक करा 10वीचा निकाल

    10वीचा निकाल अगदी झटपट टीव्ही9 मराठीवरही चेक करता येणार आहे. टीव्ही9 मराठीच्या होम पेजला गेल्यावर तिथे तुम्हाला 10वी निकाल दिसेल. तिथे क्लिक करा. त्यानंतर रोल नंबर टाका आणि माहिती भरा. एक सेकंदात तुमचा निकाल स्क्रीनवर दिसेल.

  • 08 May 2026 12:14 PM (IST)

    Maharashtra Board 10th (SSC) Result 2026 : 10 वीचा निकाल जाहीर, मार्कशीट आणि सर्टिफिकेटबाबत बोर्डाची मोठी घोषणा

    महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून घेण्यात आलेल्या इयत्ता 10 वी च्या शालांत परिक्षांचा निकाल आज जाहीर झाला . गेल्या परीक्षपर्यंत मार्कशीट आणि सर्टिफिकेट वेगवेगळे छापत होतो. आता एकाच पेपरवर दोन्ही देणार आहोत. निकाल लागल्यापासून १५ व्या दिवशी शाळेत मिळणार आहे.

    सात वेबसाईट आहे. टीव्ही९ मराठीसह सात वेबसाईटवर निकाल पाहता येणार आहे. बोर्डाची वेबसाईट आहे. डीजीलॉकर, नवनीत, एमकेसीएलची वेबसाईट आहे, यावर निकाल चेक करता येई शकेल.

  • 08 May 2026 12:09 PM (IST)

    TV9marathi.com वर येऊन असा पहा 10 वी चा निकाल

  • 08 May 2026 12:07 PM (IST)

    Maharashtra Board 10th (SSC) Result 2026 : विद्यार्थ्यांना रीचेकिंगसाठी कधीपर्यंत करता येणार अर्ज ?

    10वी चा निकाल जाहीर झाला असून बोर्डातर्फे निकालाचे वाचन करण्यात आले. राज्याचा एकूण निकाल 92.02 टक्के लागला आहे. 97.62 टक्क्यासंह कोकण विभागाचा निकाल सर्वाधिक तर 88.41 टक्क्यांसह छत्रपती संभाजी नगर विभागाचा निकाल सर्वात कमी लागला आहे.

    वेबसाईटवर निकाल चेक करता येत असून ज्या विद्यार्थ्यांना गुणपडताळणी अर्था रीचेकिंग करायचं आहे त्याची मुदत उद्या 9 मे ते 23 मे पर्यंत आहे. त्यासाठी ऑनलाइन अर्ज करता येणार आहे.

     

  • 08 May 2026 12:03 PM (IST)

    Maharashtra Board 10th (SSC) Result 2026 : 10 वीचा निकाल जाहीर, किती विद्यार्थ्यांना मिळाली प्रथम श्रेणी ?

    राज्यात नियमित उत्तीर्ण विद्यार्थ्यांपैकी ४,२२,८५१ विद्यार्थी प्राविण्यासह प्रथम श्रेणीत उत्तीर्ण झाले.

    ४,३१,१६४ विद्यार्थी प्रथम श्रेणीत उत्तीर्ण

    ३,८०,४३७ विद्यार्थी द्वितीय श्रेणीत उत्तीर्ण

    १,३४,१३४ विद्यार्थी तृतीय श्रेणीत उत्तीर्ण

    राज्यातील २३,६१२ माध्यमिक शाळांनी नियमित विद्यार्थ्यांची नोंदणी केली

    त्यापैकी १५,५५,०२६ विद्यार्थ्यांची नोंदणी झाली होती

    राज्यातील ६,६१२ शाळांचा निकाल शंभर टक्के लागला

    मार्च २०२३, मार्च २०२४ आणि फेब्रुवारी-मार्च २०२६ परीक्षांतील नियमित विद्यार्थ्यांच्या निकालात वाढ झाली

  • 08 May 2026 11:54 AM (IST)

    Maharashtra Board 10th (SSC) Result 2026 : 10 वीच्या निकालात किती विद्यार्थ्यांना 100 पैकी 100 गुण ?

    इयत्ता 10वीचा निकाला जाहीर झाला असून राज्याचा निकाल 92.09 टक्के लागला आहे. यंदा राज्यात 179 विद्यार्थ्यांना शंभर पैकी शंभर गुण मिळाले आहेत.

    आकडेवारी खालीलप्रमाणे –

    पुणे -12

    नागपूर -3

    संभाजीनगर -24

    मुंबई -5

    कोल्हापूर -15

    नाशिक -6

    अमरावती -3

    कोकण -7

  • 08 May 2026 11:50 AM (IST)

    Maharashtra Board 10th (SSC) Result 2026 : 10 वीच्या निकालातही मुलींनीच मारली बाजी

    12 वी प्रमाणेच इयत्ता 10वीचा निकाल नुकताच जाहीर झाला. या निकालातही मुलींनी मोठी बाजी मारली आहे. 10 वीच्या निकालात मुलीनी मुलांना थोबीपछाड दिल्याचे पहायला मिळत आहे.

  • 08 May 2026 11:48 AM (IST)

    Maharashtra Board 10th (SSC) Result 2026 : टीव्ही9 मराठीवर झटपट पाहता येईल 10वीचा निकाल

    10वीचा निकाल अगदी झटपट टीव्ही9पाहता येणार आहे.  टीव्ही9 मराठीच्या होम पेजला गेल्यावर तिथे तुम्हाला 10वी निकाल दिसेल. तिथे क्लिक करा. त्यानंतर रोल नंबर टाका आणि माहिती भरा. एक सेकंदात तुमचा निकाल स्क्रीनवर असेल.

  • 08 May 2026 11:47 AM (IST)

    Maharashtra Board 10th (SSC) Result 2026 : नऊ विभागीय मंडळांचा 10 वीचा निकाल पाहा..

    नऊ विभागीय मंडळामार्फत फेब्रुवारी मार्चमध्ये घेण्यात आलेल्या परीक्षेटचा निकाल जाहीर. या निकालात कोकण विभाग अव्वल ठरला आहे. तर छत्रपती संभाजी नगर विभागाला मोठा दणका बसलाय. छत्रपती संभाजी नगर विभागाचा सर्वात कमी निकाला लागला.

    विभागीय निकाल खालीलप्रमाणे 

    कोकण 97.62

    पुणे विभाग 94.24

    नागपूर 89.07

    संभाजीनगर 88.41

    मुंबई 94.97

    कोल्हापूर 95.47

    अमरावती 90.50

    नाशिक 90.93

    लातूर 88.42

    छत्रपती संभाजी नगर विभागाचा निकाल सर्वात कमी…88.41

  • 08 May 2026 11:45 AM (IST)

    Maharashtra Board 10th (SSC) Result 2026 : राज्याचा निकाल 92 .09 टक्के.. 10 वीचा निकाल घसरला

    बोर्डाने 10 वीचा निकाल जाहीर केला. गेल्या चार वर्षातील टक्केवारी पाहिली, तर या वर्षी राज्याचा निकाल 92.09 टक्के आहे. गेल्या वर्षी 2025 साली 10 वीचा निकाल 94.10 टक्के होता तर 2024 मध्ये हीच टक्केवारी 95.81 टक्के होती.   यंदा 10 वीचा निकाल घसरला आहे.

  • 08 May 2026 11:42 AM (IST)

    Maharashtra Board 10th (SSC) Result 2026 : 6 हजारांपेक्षा अधिक शाळांचा निकाल 100 टक्के

    बोर्डाने 10 वीचा निकाल जाहीर केला आहे. एकूण विद्यार्थ्यांपैकी ४ लाख ८२ हजार २६४ फर्स्ट क्लासमध्ये पास झाले. ४ लाख २२ हजार ८९१ प्राविण्यासह प्रथम श्रेणीत तर ३ लाख ८० हजार ४३७ द्वितीय श्रेणीत पास झालेय. १ लाख ३४ हजार ९३४ विद्यार्थी उत्तीर्ण आहे. एकूण 6 हजार ६१२ शाळांचा निकाल १०० टक्के लागला

  • 08 May 2026 11:39 AM (IST)

    Maharashtra Board 10th (SSC) Result 2026 : सर्वात मोठी बातमी ! दुपारी 1 ऐवजी आताच इयत्ता 10 वीचा निकाल जाहीर

    दुपारी 1 ऐवजी आताच इयत्ता 10 वीचा निकाल जाहीर झाला आहे. या लिंकवरही तुम्ही तुमचा निकाला पाहू शकता.

  • 08 May 2026 11:32 AM (IST)

    Maharashtra Board 10th (SSC) Result 2026 : छत्रपती संभाजी नगर विभागाला मोठा झटका

    इयत्ता 10 वीचा निकाल जाहीर झाला आहे. या निकालात छत्रपती संभाजी नगर विभागाला मोठा झटका बसला. सर्वात कमी निकाल छत्रपती संभाजी नगर विभागाचा लागला आहे.

  • 08 May 2026 11:28 AM (IST)

    Maharashtra Board 10th (SSC) Result 2026 : टीव्ही9 मराठीवर 10वीचा निकाल चेक करा पटापट

    10वीचा निकाल जाहीर झाला असून तो  टीव्ही9 मराठीवर अगदी झटपट पाहता येईल. टीव्ही9 मराठीच्या होम पेजला गेल्यावर तिथे तुम्हाला 10वी निकाल दिसेल. तिथे क्लिक करा. त्यानंतर रोल नंबर टाका आणि माहिती भरा. एक सेकंदात तुमचा निकाल स्क्रीनवर असेल.

  • 08 May 2026 11:26 AM (IST)

    Maharashtra Board 10th (SSC) Result 2026 : 10 वीचा निकाल जाहीर, यंदाही मुलींनीच मारली बाजी

    इयत्ता 10 वीचा निकाल जाहीर झाला आहे. दरवर्षीप्रमाणे यंदाही या निकालात मुलींनी बाजी मारली आहे. ९४.९६ टक्के मुली उत्तीर्ण झाल्या. तर ८९.५६ टक्के ुल या परीक्षेत पास झालीत.

  • 08 May 2026 11:23 AM (IST)

    Maharashtra Board 10th (SSC) Result 2026 : कोकण विभागाचा निकाल सर्वाधिक, छत्रपती संभाजीनगरचा निकाल कमी

    दहावीचा निकाल जाहीर झाला आहे. या निकालात कोकण विभाग टॉपला आहे. कोकणचा निकाला सर्वाधिक ९७.६२ टक्के लागला आहे. तर सर्वाधिक कमी निकाल हा छत्रपती संभाजीनगरचा आहे.या विभागाचा निकाला ८८.४१ टक्के इतका लागला.

  • 08 May 2026 11:19 AM (IST)

    Maharashtra Board 10th (SSC) Result 2026 : टीव्ही9 मराठीवर 10वीचा निकाल पहा झटपट

    10वीचा निकाल अगदी झटपट इथे पाहता येईल. टीव्ही9 मराठीच्या होम पेजला गेल्यावर तिथे तुम्हाला 10वी निकाल दिसेल. तिथे क्लिक करा. त्यानंतर रोल नंबर टाका आणि माहिती भरा. एक सेकंदात तुमचा निकाल स्क्रीनवर असेल.

  • 08 May 2026 11:18 AM (IST)

    Maharashtra Board 10th (SSC) Result 2026 : 10 वी चा निकाल अखेर जाहीर

    म्हणजे परीक्षेत एकूण सर्व मिळून १६ लाख १६४ विद्यार्थ्यांनी नोंदनी केली. त्यापैकी १४ लाख ५२ हजार २४६ विद्यार्थी उत्तीर्ण झाले. ९०.७५ विद्यार्थी उत्तीर्ण झाले. राज्याचा एकूण निकाल ९२.०९ टक्के इतका लागला आहे.य

  • 08 May 2026 11:16 AM (IST)

    Maharashtra Board 10th (SSC) Result 2026 : 10 वीचा निकाल जाहीर, 92.09 टक्के विद्यार्थी उत्तीर्ण

    इयत्ता 10 वीचा निकाल बोर्डाकडून जाहीर. १४ लाख २० हजार ४८६ विद्यार्थी पास झाले. ९२.०९ टक्केवारी उत्तीर्ण

    एकूण २८ हजार २५ विद्यार्थी फॉर्म नंबर १७ भरून बसले
    त्यापैकी २२ हजार ३ विद्यार्थी उत्तीर्ण. ७६.३३ टक्के विद्यार्थी पास
    रिपीटर २८ हजार ८६७ विद्यार्थी बसले. त्यापैकी ९ हजार ७५७ विद्यार्थी पास झाले. ३३. ८९ टक्केवारी उत्तीर्ण

     

  • 08 May 2026 11:13 AM (IST)

    Maharashtra Board 10th (SSC) Result 2026 : 10वीचा निकाल पहा झटपट… काही क्षणात निकाल येईल हाती

    10वीचा निकाल अगदी झटपट इथे पाहता येईल. टीव्ही9 मराठीच्या होम पेजला गेल्यावर तिथे तुम्हाला 10वी निकाल दिसेल. तिथे क्लिक करा. त्यानंतर रोल नंबर टाका आणि माहिती भरा. एक सेकंदात तुमचा निकाल स्क्रीनवर असेल.

     

  • 08 May 2026 11:13 AM (IST)

    Maharashtra Board 10th (SSC) Result 2026 : बोर्डाकडून निकालाचे वाचन सुरू

    इयत्ता 10 वीचा निकाल बोर्डाकडून जाहीर केला जात आहे. काही वेळातच राज्याचा निकाल जाहीर होईल. नक्की कोणत्या विभागाने या निकालात बाजी मारली स्पष्ट होईल.

  • 08 May 2026 11:12 AM (IST)

    Maharashtra Board 10th (SSC) Result 2026 : दहावीचा निकाल लवकर लागणार ? बोर्डाच्या वेबसाईटवर बदल, मोठी अपडेट समोर

    महाराष्ट्रातील 10 वीच्या निकालाबाबत मोठी बातमी आहे. बोर्डाच्या अधिकृत वेबसाईटवर निकालाची वेळ बदलली असून आता दुपारी 1 ऐवजी सकाळी 11.30 वाजताच निकाल जाहीर होण्याची शक्यता आहे. त्यामुळे लाखो विद्यार्थ्यांची प्रतीक्षा लवकर संपू शकते.वेबसाईटवर अचानक येणारे ट्रॅफिक पाहता हा निर्णय मंडळाने घेतल्याचे समजते.

  • 08 May 2026 11:07 AM (IST)

    Maharashtra Board 10th (SSC) Result 2026 : मुलं वरचढ ठरणार की यंदाही मुली मारणार बाजी ? काही मिनिटांत 10 वीच्या निकालाचं चित्र होणार स्पष्ट..

    बोर्डाकडून काही मिनिटांमध्येच 10 वीच्या निकालाची घोषणा होणार आहे. विभागीय निकाल बोर्डाकडून जाहीर केला जाणार आहे. विद्यार्थ्यांना त्यांचा निकाल थोड्याच वेळात वेबसाईटवर पाहता येणार आहे. या निकालात पुन्हा मुली बाजी मारणार की यंदा मुलं वरचढ ठरणार, हे काही क्षणांतच स्पष्ट होईल.

  • 08 May 2026 11:04 AM (IST)

    Maharashtra Board 10th (SSC) Result 2026 : 10वीचा निकाल पहा झटपट… काही क्षणात निकाल येईल हाती

    10वीचा निकाल अगदी झटपट इथे पाहता येईल. टीव्ही9 मराठीच्या होम पेजला गेल्यावर तिथे तुम्हाला 10वी निकाल दिसेल. तिथे क्लिक करा. त्यानंतर रोल नंबर टाका आणि माहिती भरा. एक सेकंदात तुमचा निकाल स्क्रीनवर असेल.

  • 08 May 2026 11:02 AM (IST)

    Maharashtra Board 10th (SSC) Result 2026 : अवघ्या काही मिनिटांत बोर्डाकडून जाहीर होणार 10 वीचा निकाल

    महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे  घेण्यात आलेल्या 10 वी परीक्षेचा निकाल काही वेळातच जाहीर होईल. 11 वाजता बोर्डाकडून हा निकाल जाहीर होणार आहे. विद्यार्थी तसेच पालकांची उत्सुकता शिगेला पोहोचल्याचे दिसत आहे.

  • 08 May 2026 10:58 AM (IST)

    Maharashtra Board 10th Result 2026 : लाखो विद्यार्थ्यांची प्रतीक्षा संपणार, कोणत्याही क्षणी लागणार निकाल

    महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीने फेब्रुवारी-मार्च २०२६ मध्ये घेण्याच आलेल्या इयत्ता 10 वी निकाल आत कोणत्याही क्षणी लागू शकतो. लाखो विद्यार्थ्यांची प्रतीक्षा संपणार असून ते निकालासाठी उत्सुक आहेत.  रिझल्ट चेक करण्यासाठी तुम्हाला अधिकृत वेबसाईटवर जावं लागणार आहे. https://mahahsscboard.in या वेबसाईटवरही 10 वीचा निकाल चेक करता येऊ शकतो.

  • 08 May 2026 10:53 AM (IST)

    Maharashtra Board 10th (SSC) Result 2026 : टीव्ही9 मराठी वेबसाईटवर पाहा इयत्ता 10वीचा निकाल ..

    इयत्ता 10 वी परीक्षेचा निकाल तुम्ही टीव्ही9 मराठीच्या वेबसाईटला भेट देऊन पाहू शकता…

  • 08 May 2026 10:50 AM (IST)

    Maharashtra Board 10th Result 2026 : 11 वाजता होणार बोर्डाची पत्रकार परिषद

    एसएससी निकाल जाहीर करण्यापूर्वी महाराष्ट्र बोर्ड सकाळी 11 वाजता पत्रकार परिषद घेणार आहे. ही पत्रकार परिषद पुण्यातील महाराष्ट्र राज्य बोर्डाच्या मुख्यालयातून आयोजित केली जाईल. बोर्डाचे अधिकारी एकूण उत्तीर्णतेची टक्केवारी, उत्कृष्ट कामगिरी करणारे जिल्हे आणि विद्यार्थ्यांच्या कामगिरीबद्दल महत्त्वाची माहिती देतील. मुलांच्या आणि मुलींच्या निकालांची स्वतंत्र आकडेवारीसुद्धा जाहीर केली जाईल.  मागील वर्षांच्या तुलनेत या वर्षीच्या निकालांची माहितीदेखील पत्रकार परिषदेत देण्यात येईल. विद्यार्थी आणि पालक आता निकालांच्या अधिकृत घोषणेची आतुरतेने वाट पाहत आहेत.

     

  • 08 May 2026 10:41 AM (IST)

    htra Board 10th Result 2026 : 12 वी नंतर अवघ्या आठ दिवसांत 10 वीचा निकाल

    गेल्या शनिवारी 2 मे ला 12 वीचा निकाल लागला. त्यानंतर ​यंदाही राज्य मंडळाने निकालाची प्रक्रिया वेगाने पूर्ण करत आपली परंपरा कायम राखली आहे. 2 मे रोजी बारावीचा निकाल जाहीर केल्यानंतर अवघ्या सहा दिवसांत, 8 मे रोजी दहावीचा निकाल सादर केला जाणार आहे. पुणे, मुंबई, नागपूर, नाशिक यांसह नऊ विभागीय मंडळांचा निकाल एकाच वेळी संकेतस्थळावर उपलब्ध होईल.

  • 08 May 2026 10:36 AM (IST)

    Maharashtra Board 10th (SSC) Result 2026 : टीव्ही9 मराठी वेबसाईटच्या होमपेजला जाऊन पाहा 10वीचा निकाल..

    इयत्ता 10 वी परीक्षेचा निकाल तुम्ही टीव्ही९ मराठीच्या वेबसाईटला भेट देऊन पाहू शकता…

     

  • 08 May 2026 10:28 AM (IST)

    Maharashtra Board 10th Result 2026 : 10 वीचा निकाल मोबाईल, SMS वर कसा कराल चेक ?

    10 वीचा निकाल तुम्हाला वेबसाईटवर चेक करता येणार आहेच. पण त्याशिवाय तुम्ही 10 वीचा रिझल्ट मोबाईल एसएमएसवर ही पाहू शकता. त्यासाठी मोबाईलच्या मेसेज बॉक्समध्ये जाऊन MHSSC Seat Number टाइप करा आणि तो 57766 या क्रमांकावर पाठवा.

  • 08 May 2026 10:28 AM (IST)

    Maharashtra Board 10th Result 2026 : डिजीलॉकरवर कसा कराल 10 वीचा निकाल चेक?

    10 वीचे विद्यार्थी डिजीलॉकरवरही त्यांचा निकाला चेक करू शकतात. तिथे रिझल्ट चेक करण्याची स्टेप बाय स्टेप पद्धत घ्या जाणून

    1) पहिल्यांदा digilocker.gov.in वर जा किंवा मोबाईलमध्ये DigiLocker App उघडा.

    2) त्यानंतर तिथे लॉगिन करा. जर अकाउंट नसेल तर आधार नंबर वापरून साईन-अप करा.

    3) जर अकाउंट असेल तर युजरनेम आणि पिन टाकून Login करा.
    4) त्यानंतर होमपेजवर ‘Education’ विभागात जा आणि ‘Maharashtra State Board of Secondary and Higher Secondary Education’ निवडा.

    5) त्यानंतर ‘Class X Marksheet’ किंवा ‘SSC Result 2026’ हा पर्याय निवडा.

    6) त्यानंतर तिथे तुमचा रोल नंबर (Roll Number/Seat Number) आणि आईचे नाव (Hall Ticket वर दिल्याप्रमाणे) टाका.

    7) त्यानंतर ‘Get Document’ वर क्लिक करा.

    8) पुढे स्क्रीनवर तुमचा निकाल दिसेल. ही डिजिटल मार्कशीट आणि प्रमाणपत्र तुम्ही डाउनलोड किंवा सेव्ह करून ठेऊ शकता.

  • 08 May 2026 10:23 AM (IST)

    Maharashtra Board 10th Result 2026 : डिजीलॉकरवरही चेक करू शकता 10 वीचा निकाल

    महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने फेब्रुवारी मार्च मध्ये घेतलेल्या इयत्ता 10 वीचा निकाल दुपारी 1 वाजता ऑनलाइन पाहता येणार आहे. तो चेक करताना वेबसाईट डाऊन झाली, क्रॅश झाली तरी टेन्शन घेऊ नका. तुम्ही डिजीलॉकरवरही मार्कशीट चेक करू शकता.

     

  • 08 May 2026 10:18 AM (IST)

    Maharashtra Board 10th (SSC) Result 2026 : टीव्ही9 मराठीवरही चेक करू शकता 10 वीचा निकाल

    10 वीचे विद्यार्थी टीव्ही9 मराठीवरही निकाल चे करू शकतात. खाली दिलेल्या जागेत तुमचा नंबर आणि आईच नाव सबमिट करून तुम्ही रिझलट चेक करू शकता.

     

  • 08 May 2026 10:10 AM (IST)

    Maharashtra Board 10th Result 2026 : अवघा 1 तास उरला, लाखो विद्यार्थ्यांचं 10 वीच्या निकालाकडे लक्ष

    महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने फेब्रुवारी मार्च मध्ये घेतलेल्या दहावीच्या परीक्षेचा निकाल आज दुपारी एक वाजता ऑनलाईन पद्धतीने जाहीर करण्यात येणार आहे. राज्यातील 23 हजार 683 शाळांमधून एकूण 16 लाख 15 हजार 489 विद्यार्थ्यांनी दहावीच्या परीक्षेसाठी नोंदणी केली होती. बोर्डाचे अध्यक्ष त्रिगुण कुलकर्णी यांची पत्रकार परिषद 11 वाजता एसएससी बोर्ड मुख्य कार्यालयात होणार आहे. लाखो विद्यार्थ्यांचं याकडे लक्ष लागलं आहे.

  • 08 May 2026 09:51 AM (IST)

    Maharashtra Board 10th Result 2026 : गुणपडताळणी, रीचेकिंगसाठी कधी करायचा अर्ज?

    गुणपडताळणी किंवा रीचेकिंग, तसंच छायाप्रतीसाठी, उद्या म्हणजेच शनिवार 9 मे ते 23 मे 2026 पर्यंत विद्यार्थ्यांना अर्ज करता येणार आहे. त्यासाठी जे शुल्क लागेल ते तुम्ही डेबिट कार्ड, क्रेडिट कार्ड, युपीआय किंवा नेट बँकिंगद्वारे भरू शकता.

  • 08 May 2026 09:36 AM (IST)

    Maharashtra Board 10th (SSC) Result 2026 : टीव्ही9 वरही चेक करू शकता 10 वीचा निकाल

    इयत्ता 10वीचा निकाल इथेही चेक करता येईल.

  • 08 May 2026 09:24 AM (IST)

    Maharashtra Board 10th Result 2026 : मार्क कमी मिळाले तरी घाबरू नका, बोर्डाकडून देण्यात आल्या या सुविधा !

    10 वी परीक्षेच्या निकालाची वेळ जवळ येताच विद्यार्थ्यांची धडधड वाढली आहे. अनेकदा विद्यार्थ्यांना अपेक्षेपेक्षा कमी गुण मिळतात किंवा काही विषयांत निकाल समाधानकारक नसतो. अशा वेळी बोर्डाने काही महत्त्वाच्या सुविधा उपलब्ध करून दिल्या आहेत. तुम्हाला तुमच्या गुणांची खात्री करायची असेल, तर तुम्ही गुणपडताळणीसाठी अर्ज करू शकता. तुम्हाला तुमची उत्तरपत्रिका स्वतः बघायची असेल, तर तिची प्रिंटआऊट मागवता येईल.  पेपर पुन्हा तपासला जावा असं जर वाटत असेल तर तुम्ही त्यासाठी अर्ज करू शकता.

  • 08 May 2026 09:10 AM (IST)

    Maharashtra Board 10th (SSC) Result 2026 : जे बारावीत घडलं तेच दहावीत घडणार? निकालाचा टक्का वाढणार की घसरणार?

    गेल्या आठवज्यात इयत्ता 12 वीचा निकाल जाहीर झाला होता. मात्र गेल्या वर्षीपेक्षा 12 वीची उत्तीर्ण टक्केवारी घसरली होती. आज 10वीचा निकाल जाहीर होणार आहे. जे बारावीत घडलं तेच दहावीत घडणार? निकालाचा टक्का वाढणार की घसरणार? याची उत्सुकता सर्वांना आहे. गेल्या वर्षी 10 वीचा निकाल 93.04 टक्के लागला होता. यंदा यापेक्षा जास्त निकाल लागतो की उत्तीर्ण विद्यार्थ्यांची टक्केवारी कमी होते, याकडे राज्याचे, विद्यार्थी, पालकांचे लक्ष लागलं आहे.

  • 08 May 2026 09:04 AM (IST)

    Maharashtra Board 10th (SSC) Result 2026 : टीव्ही9 वरही चेक करता येईल तुमचा 10 वीचा निकाल

    इयत्ता दहावीचा निकाला इथेही चेक करता येईल.

  • 08 May 2026 09:02 AM (IST)

    Maharashtra Board 10th Result 2026 : गेल्या वर्षी किती टक्के लागला होता 10 वीचा निकाल ?

    महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीने फेब्रुवारी-मार्चमध्ये घेतलेल्या 10वीच्या परीक्षेचा निकाल आज लागणार आहे. 11 वाजता पत्रकार परिषद होणार असून सविस्तर निकाल जाहीर होईल. तर विद्यार्थ्यांना दुपारी 1 वाजता वेबसाईटवर निकाल पाहता येईल. गेल्या वर्षी 13 मे रोजी 10 वीच्या परीक्षेचा निकाल लागला. 2025 मध्ये 10 वी निकालाची उत्तीर्ण विद्यार्थ्यांची टक्केवारी 93.04 टक्के होती तकर 2024 मध्ये हा आकडा 95.81 टक्के इतका होता.

  • 08 May 2026 08:48 AM (IST)

    Maharashtra Board 10th (SSC) Result 2026 : कसा पहाल 10वीचा निकाल ?

    यंदा 10वी परीक्षा ज्या विद्यार्थ्यांनी दिली आहे, त्यांना आज दुपारी एक वाजता निकाल उपलब्ध होईल. विद्यार्थ्यांना त्यांचा परीक्षा क्रमांक आणि आईचं नाव नोंदवून मग आपला निकाल पाहता येईल.

    निकाल चेक करण्याची पद्धत स्टेप बाय स्टेप :

    1) mahahsscboard.in. या अधिकृत वेबसाईटला भेट द्या

    2) Maharashtra SSC Result 2026 ही लिंक उपलब्ध असेल त्यावर क्लिक करा

    3) विद्यार्थ्यांनी यानंतर रोल नंबर आणि आईचं नाव नोंदवून लॉगीन करा.

    4) विद्यार्थ्यांनी सबमिट बटनावर क्लिक केल्यावर त्यांच्या स्क्रीनवर दहावीचा निकाल उपब्ध होईल .

    5) दहावीचा निकाल डाऊनलोड करा आणि प्रिंट काढून पुढील कामांसाठी सोबत ठेवा, सेव्ह करा.

  • 08 May 2026 08:40 AM (IST)

    Maharashtra Board 10th Result 2026 : पुनर्मूल्यांकनासाठी कसा करता येईल अर्ज ?

    फेब्रुवारी-मार्च 2026 परीक्षेच्या उत्तरपत्रिकेच्या पुनर्मूल्यांकनासाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज मंडळाच्या अधिकृत संकेतस्थळावरून करण्यासाठी प्रथम उत्तरपत्रिकेची छायाप्रत घेणे अनिवार्य आहे. छायाप्रत मिळाल्याच्या दिवसापासून कार्यालयीन कामाच्या पाच दिवसांत पुनर्मूल्यांकनाच्या कार्यपद्धतीचा अवलंब करून विहित नमुन्यात विहित शुल्क भरून संबंधित विभागीय मंडळाकडे विद्यार्थ्यांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करणे आवश्यक असेल. ज्या विद्यार्थ्यांना उत्तरपत्रिकेचे पुनर्मूल्यांकन करावयाचे असेल त्यांनी अधिक माहितीसाठी संबंधित विभागीय मंडळाकडे संपर्क साधावा.

  • 08 May 2026 08:32 AM (IST)

    Maharashtra Board 10th Result 2026 : यंदा तरी पोरं पोरींचा विक्रम मोडणार का? 10 वीच्या निकालाचा सस्पेन्स थोड्याच वेळात संपणार

    इयत्ता 10 वीचा निकाल आज 11 वाजता लागणार आहे. दरवर्षीप्रमाणे यंदाही 10 वीच्या निकालात मुली बाजी मारणार की मुलं यंदा मुलींना मागे टाकून विक्रम मोडणार ? याकडे सर्वांच लक्ष लागलं आहे. 10 वीचे विद्यार्थी, पालक आजच्या निकालासाठी उत्सुक असून थोड्याच वेळात त्यांची निकालाची प्रतीक्षा संपणार आहे.

     

  • 08 May 2026 08:22 AM (IST)

    Maharashtra Board 10th (SSC) Result 2026 : कोणत्या वेबसाईटवर पाहता येणार 10 वीचा निकाल ?

    विद्यार्थ्यांना या वेबसाईट्सवर 10वीचा निकाल चेक करता येईल.

    1. https://sscresult.mahahsscboard.in

    2. https://results.digilocker.gov.in

    3. https://mahahsscboard.in

    4. https://sscresult.mkcl.org

    5.https://results.navneet.com

  • 08 May 2026 08:12 AM (IST)

    Maharashtra Board 10th (SSC) Result 2026 : विषयनिहाय गुणांची पडताळणी कधीपासून करता येणार ?

    10 वीच्या परीक्षेचा निकाल आज लागणार असून दुपारी ऑनलाइन चेक करता येणार आहे. पुणे, मुंबई, नागपूरसह नऊ विभागीय मंडळांचा निकाल एकाच वेळी वेबसाईटवर उपलब्ध असेल. विषयनिहाय गुणांची पडताळणी 9 मे पासून करता येणार आहे.

  • 08 May 2026 08:02 AM (IST)

    Maharashtra Board 10th (SSC) Result 2026 : यंदा किती विद्यार्थ्यांनी दिली 10 वीची परीक्षा ?

    फेब्रुवारी-मार्च 2026 या कालावधीत इयत्ता 10 वीची परीक्षा घेण्यात आली. या परीक्षेसाठी यंदा 16 लाख 15 हजार 489 विद्यार्थ्यांनी नोंदणा केली. त्यापैकी 8 लाख 65 हजार 740 मुलं, 7 लाख 49 हजार 736 मुली आणि 13 ट्रान्सजेंडर होती.  एकूण 23 हजार 683 शाळांमधून या विद्यार्थ्यांची नोंदणी झाली. संपूर्ण राज्यात या परीक्षेसाठी 5 हजार 111 मुख्य केंद्र होती.

  • 08 May 2026 07:56 AM (IST)

    Maharashtra Board 10th (SSC) Result 2026 : आज दहावीचा निकाल, इथे पहा तुमचा रिझल्ट, या वेबसाईट्स लगेच करा नोट

  • 08 May 2026 07:43 AM (IST)

    10 वीच्या विद्यार्थ्यांना Digital गुणपत्रिका करता येणार सेव्ह

    10 वीच्या परीक्षेस प्रविष्ट झालेल्या सर्व विद्यार्थ्यांना विषयनिहाय संपादित केलेले गुण वेबसाईटवर उपलब्ध होणार आहेत. तसेच या माहितीची प्रिंट आऊटही घेता येईल. त्याचप्रमाणे विद्यार्थ्यांना DigiLocker App मध्ये Digital गुणपत्रिका सेव्ह करून ठेवण्याची सोय उपलब्ध करून देण्यात आलेली आहे.

  • 08 May 2026 07:39 AM (IST)

    Maharashtra Board 10th Result 2026 : कुठे पाहता येणार निकाल ?

    10 वीची परीक्षा दिलेले विद्यार्थी mahresult.nic.in आणि mahahsscboard.in या पोर्टल्सवर निकाल पाहू शकतील याची महाराष्ट्र बोर्डाने पुष्टी केली आहे.

  • 08 May 2026 07:26 AM (IST)

    Maharashtra Board 10th Result 2026 : इयत्ता 10 वी रिझल्ट, 9 विभागांत कोण मारणार बाजी ?

    महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीने घेण्यात आलेल्या 10 वीचा निकाल थोड्याच वेळात जाहीर होणार. पुणे, नागपूर, छत्रपती संभाजीनगर, मुंबई, कोल्हापूर, अमरावती, नाशिक, लातूर आणि कोकण या नऊ विभागीय मंडळांतर्फे परीक्षा घेण्यात आली होती. आज कोणता विभाग ठरणार अव्वल, कोणाचा निकाल लागणार सर्वाधिक ?

    थोड्याच वेळात हे चित्र स्पष्ट होईल.

  • 08 May 2026 07:13 AM (IST)

    Maharashtra Board 10th Result 2026 : महाराष्ट्रात दहावीचा आज निकाल, गेल्या वर्षी कधी लागला होता निकाल ?

    महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे दहावीच्या परीक्षेचा निकाल आज जाहीर करण्यात येणार आहे.  दुपारी एक वाजल्यापासून विद्यार्थ्यांना निकाल ऑनलाइन पाहता येईल.  गेल्या वर्षी दहावीच्या परीक्षेचा निकाल 13 मे रोजी जाहीर करण्यात आला होता.

  • 08 May 2026 07:06 AM (IST)

    Maharashtra Board 10th Result 2026 : दुपारी उपलब्ध होणार इयत्ता 10 वीचा निकाल

    महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीने देण्यात आलेल्या माहितीनुसार इयत्ता दहावीचा निकाल हा मंडळाच्या अधिकृत संकेतस्थळावर आज ( 8 मे) दुपारी उपलब्ध होणार आहेत. लाखो विद्यार्थ्यांचे लक्ष आजच्या निकालाकडे लागलं आहे.

  • 08 May 2026 06:59 AM (IST)

    Maharashtra Board 10th Result 2026 : 10 वीचा निकाल आज, विद्यार्थ्यांची उत्सुकता शिगेला

    प्रत्येक विद्यार्थ्याच्या आयुष्यातील महत्वाचा टप्पा असलेल्या इयत्ता 10 वीचा निकाल आज लागणार आहे. सकाळी 11 वाजता महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून पत्रकार परिषद घेऊन सविस्तर निकालाचे वाचन होईल. विद्यार्थ्यांना दुपारी 1 वाजता त्यांचा निकाल ऑनलाइन पाहता येईल. निकालाची वेळ जवळ येताच विद्यार्थ्यांची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे.

Follow Us