AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

राज्यात मोठी खळबळ! एकनाथ शिंदे यांना कोणाकडून धोका? थेट निर्णय घेत…

राज्यातील 29 महापालिकांच्या निवडणुकीचे निकाल लागले असून भाजपाने या निवडणुकीत कमाल केली. एकनाथ शिंदे यांच्या पक्षाचीही धमाकेदार कामगिरी राहिली. यादरम्यान एकनाथ शिंदे यांनी मोठा गेम खेळल्याचे बघायला मिळत आहे.

राज्यात मोठी खळबळ! एकनाथ शिंदे यांना कोणाकडून धोका? थेट निर्णय घेत...
Eknath Shinde
| Updated on: Jan 18, 2026 | 12:50 PM
Share

राज्यातील 29 महापालिकांच्या निवडणुका झाल्या आहेत. या निवडणुकीत भाजपा हा सर्वात मोठा पक्ष ठरला. धमाकेदार कामगिरी भाजपाची बघायला मिळाली. विशेष म्हणजे राज्यातील अनेक महापालिकांवर एकहाती सत्ता भाजपची आली. 29 महापालिकांपैकी जर सर्वात चर्चेत राहिलेली निवडणूक कोणती असेल तर ती मुंबई महापालिकेची आहे. पहिल्यांदाच महापालिका निवडणुकीच्या तोंडावर शिवसेना आणि मनसे एकत्र आली. राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांनी एकत्र येऊन निवडणुका लढवल्या. मात्र, अपेक्षित यश त्यांना मिळाले नाही. मराठी माणसासाठी ही निवडणूक लढत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. मुंबई महापालिकेत शिवसेना ठाकरे गटाच्या 66 जागा आल्या आणि मनसे 9 जागांवर विजयी झाले. भाजपा 89 आणि शिवसेना शिंदे गट 29 जागांवर विजयी झाले. मुंबई महापालिकेत सर्वात मोठा पक्ष भाजपा ठरला. मुंबई महापालिकेत भाजपा सर्वात मोठा पक्ष ठरला.

भाजपा जरी मुंबई महापालिकेत मोठा पक्ष ठरला असला तरीही एकहाती सत्ता महापालिकेत मिळाली नाही. एकनाथ शिंंदे यांच्या नगरसेवकांची मदत घेतल्याशिवाय भाजपा सत्ता स्थापन करू शकणार नाही. एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेचे 29 नगरसेवक निवडून आले.  29 नगरसेवक निवडून येताच एकनाथ शिंदे यांनीही मुंबईच्या महापाैरपदावर दावा केला असून अडीच वर्ष भाजपा आणि अडीच वर्ष शिवसेनेचा महापाैर असल्याचा त्यांनी स्पष्ट केले.

भाजपाला अडीच वर्ष महापाैरपद पाहिजे नसून पाच वर्ष भाजपाचाच महापाैर हवा असल्याचे त्यांचे म्हणणे आहे, कारण सर्वात मोठा पक्ष भाजप ठरला. यादरम्यानच शिंदे यांनी आपले सर्व 29 नगरसेवक ताज लॅन्ड हॉटेलमध्ये ठेवले आहेत. नगरसेवक फुटले जाऊ नये, याकरिता काळजी घेतली जात आहे. यासोबतच शिवसेना ठाकरे गटाचे नेतेही एकनाथ शिंदे गटाच्या नगरसेवकांच्या संपर्कात आहेत.

यामुळे शिंदेंना आपले नगरसेवक फुटण्याची अधिक भीती असल्याने थेट नगरसेवकांना हॉटेलमध्ये ठेवण्याचा त्यांनी निर्णय घेतला. उद्धव ठाकरे यांनी कालही बोलताना म्हटले की, आजही माझी इच्छा आहे की, मुंबईचा महापाैर शिवसेनेचाच व्हावा. यामुळे महापालिकेवरील सत्ता मिळवण्यासाठी अजूनही ताकद लावली जात असल्याचे बघायला मिळत आहे.

Follow Us
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ;
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ; मुंबईतील ही दहीहंडी चर्चेत
हम दो हमारे दो और इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं...
Gulabrao Patil : 'हम दो हमारे दो और... इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं वक्तव्य तुफान चर्चेत
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला;
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला; प्रेक्षकांचं मन जिंकणाऱ्या संवादाची सर्वत्र चर्चा
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची...
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची समिती...
दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर...
MNS Avinash Jadhav Dahi Handi 2026 : दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई, थेट 1,322 कोटी...
गौतमीचं मुंबईवर अपार प्रेम, काय म्हणाली पहा? आणखी वेगळं...
Gautami Patil On Dahi Handi | गौतमीचं मुंबईवर अपार प्रेम, काय म्हणाली पहा? आणखी खास...
दहीहंडी उत्सवादरम्यान मोठी दुर्घटना; मुंबईतील हंडी फोडताना 7 वर्षीय...
दहीहंडी उत्सवादरम्यान मोठी दुर्घटना; मुंबईतील हंडी फोडताना 7 वर्षीय गोविंदा दगावला
प्रकाश सुर्वे यांच्या दहीहंडी उत्सवात संजय दत्त यांची उपस्थिती, अपना..
प्रकाश सुर्वे यांच्या दहीहंडी उत्सवात संजय दत्त यांची उपस्थिती, अपना भाई है म्हणत...
मुंबईतील नामांकित दहीहंडी कार्यक्रमात अजिंक्य देव यांची उपस्थिती;
मुंबईतील नामांकित दहीहंडी कार्यक्रमात अजिंक्य देव यांची उपस्थिती; पहा खास व्हिडीओ