मोठी बातमी! अजित पवार यांचा महापालिका निवडणुकीच्या अपयशानंतर मोठा निर्णय, पुण्यातच…
उपमुख्यमंत्री अजित पवार पुण्यात असून अॅक्शन मोडवर आहेत. महापालिका निवडणुकीच्या अपयशानंतर अजित पवार मुंबई ऐवजी पुण्यात ठाम मांडून आहेत. आता अजित पवार नेमका काय निर्णय घेतात याकडे सर्वांच्या नजरा आहेत.

राज्यातील 29 महापालिकेच्या निवडणुकांचे निकाल लागले आहेत. भाजपा हा सर्वात मोठा पक्ष या निवडणुकीत ठरला. मात्र, अजित पवार आणि शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा सुपडा साफ झाला. पुण्यासह पिंपरी चिंचवडमध्ये त्यांच्या पक्षाला मोठं अपयश मिळालं. अजित पवारांनी महापालिका निवडणुकीत भाजपा आणि शिवसेना शिंदे गटासोबत युती न करता स्वतंत्रपणे निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला. मात्र, तिथेच त्यांना फटका बसला आणि पिंपरी चिंचवडसह पुणे महापालिका त्यांच्या हातून गेली. 2017 च्या निवडणुकीत भाजपाने पुण्यासह पिंपरी चिंचवड महापालिकेत स्वत:ची सत्ता आणली. फक्त सत्ताच नाही तर त्यावेळी त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या हातून पिंपरी चिंचवड महापालिकेत एकहाती सत्ता आणली. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या मोठंमोठ्या नेत्यांना भाजपात घेतले आणि मोठी खेळी करत सूत्रे आपल्या हाती घेतली. यावेळी शिवसेना शिंदे गट आणि भाजपाने एकत्र येत निवडणुका लढल्या.
पिंपरी चिंचवड महापालिकेच्या निवडणुकीत अजित पवारांनी भाजपाचे आमदार महेश लांडगे यांच्यावर थेट टीका केली. यानंतर महेश लांडगे यांनी सडेतोड भाषेत कोणताही विचार न करता अजित पवारांवर निशाना साधला. यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही महेश लांडगे यांची साथ दिली. महेश लांडगे यांनी करून दाखवले आणि थेट भाजपाची थेट महापालिकेवर सत्ता आणली. हा अजित पवारांसाठी मोठा धक्का नक्कीच होता.
Municipal Election 2026
आम्हाला हॉटेल पॉलिटिक्स करण्याची गरज नाही - अमेय घोले
उल्हासनगरमध्ये अपक्ष विजयी उमेदवार सविता तोरणे यांचा शिवसेनेत प्रवेश
नवा महापौर निवडीपर्यंत शिवसेना शिंदे गटाचे नगरसेवक हॉटेलमध्येच राहणार
भाई जगताप यांना काँग्रेसची कारणे दाखवा नोटीस
पिंपरी चिंचवडमध्ये भाजप सर्वात मोठा पक्ष, आकडे बहुतमापेक्षाही अधिक
सोलापूरच्या निवडणुकीत पैशाचा आणि सत्तेचा गैरवापर करून भाजपचा विजय : अमोल बापू शिंदे यांची टीका
आता अजित पवार पुन्हा शदर पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षासोबत युतीचे करून जिल्हा परिषद आणि नगरपंचायतीच्या निवडणुका लढवणार का? हा प्रश्न उपस्थित केला जात आहे. कारण शरद पवार गटासोबत युती केल्याने त्यांना मोठा फटका बसला. महापालिका निवडणुकीतील अपयशानंतर मोठा निर्णय घेत अजित पवार जिल्हा परिषद निवडणुकीसाठी मैदानात उतरले आहेत.
उपमुख्यमंत्री अजित पवार पुण्यातील बारामती हॉस्टेलवरती झेडपीच्या इच्छुकांच्या मुलाखती घेत आहेत. जिल्हा परिषद,पंचायत समिती निवडणूकीची तयारी अजित पवारांनी सुरू केली आहे. मात्र, अजित पवार ही निवडणूक नक्कीच स्वतंत्र लढणार की, परत काकांचा हात पकडणार की, युती म्हणून भाजपासोबत लढणार हे पाहण्यासारखे ठरेल.
