AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

सिद्धिविनायक ट्रस्टच्या अध्यक्षांचा मुलगा पराभूत, डॅडीच्या मुलींचीही हार, डबेवाल्याच्या पोरानं उधळला विजयाचा गुलाल, मुंबई महापालिका निकालाचे हायलाईट

मुंबईमध्ये भाजप आणि शिवसेना शिंदे गटाच्या युतीला मोठं यश मिळताना दिसून येत आहे. तर शिवसेना ठाकरे गट आणि मनसेला मोठा धक्का बसला आहे. मुंबईमध्ये भाजप 99 जागांवर आघाडीवर आहे.

सिद्धिविनायक ट्रस्टच्या अध्यक्षांचा मुलगा पराभूत, डॅडीच्या मुलींचीही हार, डबेवाल्याच्या पोरानं उधळला विजयाचा गुलाल, मुंबई महापालिका निकालाचे हायलाईट
Mumbai Municipal Election ResultsImage Credit source: टीव्ही 9 मराठी
| Updated on: Jan 16, 2026 | 3:52 PM
Share

राज्यात गुरुवारी 29 महापालिका निवडणुकांसाठी मतदान पार पडलं, त्यानंतर आता आज मतमोजणी सुरू असून, अनेक ठिकाणी धक्कादायक निकाल समोर येत आहेत, राज्यात भाजप हा सर्वात मोठा पक्ष ठरला आहे. तर दुसऱ्या क्रमांकांवर शिवसेना शिंदे गट आहे, राज्यात काँग्रेसने देखील चांगली कामगिरी केली आहे. परंतु त्या तुलनेत राष्ट्रवादी अजित पवार गट, राष्ट्रवादी शरद पवार गट आणि शिवसेना ठाकरे गट यांना अपेक्षीत यश मिळताना दिसून येत नाहीये.  मुंबईसह, छत्रपती संभाजीनगरमध्ये शिवसेना ठाकरे गटाला मोठा धक्का बसला आहे. तर पुण्यात भाजपनं राष्ट्रवादी अजित पवार गट आणि राष्ट्रवादी शरद पवार गट यांना पराभवाचा धक्का दिला आहे.

दरम्यान मुंबई महापालिका निवडणुकीच्या निकालाबाबत बोलायचं झाल्यास मुंबईमध्ये भाजपनं जोरदार मुसंडी मारली असून, स्पष्ट बहुमताच्या दिशेनं वाटचाल सुरू केली आहे. मुंबई महापालिका निवडणुकीमध्ये भाजपचे उमेदवार 99 जागांवर पुढे आहेत, तर शिवसेना शिंदे गटाचे उमेदवार 30 जागांवर पुढे आहेत. दुसरीकडे शिवसेना ठाकरे गटाचे उमेदवार हे मुंबईत 63 जागांवर पुढे आहेत. तर मनसे 9 जागांवर पुढे आहे, मुंबईमध्ये आता भाजपचा महापौर होण्याची शक्यता आहे.

दरम्यान मुंबईमध्ये भाजप आणि शिवसेना शिंदे गटाला जरी मोठं यश मिळालं असलं तरी देखील काही प्रभागांमध्ये धक्कादायक निकाल लागले आहेत . मुंबईत शिवसेना शिंदे गटाचे नेते सदा सरवणकर यांना मोठा धक्का बसला आहे, त्यांचा मुलगा समाधान सरवणकर यांचा पराभव झाला आहे, सदा सरवणकर हे सिद्धिविनायक ट्रस्टचे अध्यक्ष आहेत.  तर दुसरीकडे अरुण गवळी यांच्या दोन्ही मुली गीता गवळी आणि योगीता गवळी यांचाही पराभव झाला आहे. मात्र दुसरीकडे प्रभाग क्रमांक चार मधून एका सामान्य डबेवाल्याचा मुलगा मंगेश दत्ताराम पांगारे यांनी विजयाचा गुलाल उधळला आहे. मंगेश पांगारे विजयी होताच डबेवाल्यांनी मोठा जल्लाष सजरा केला आहे.  दरम्यान पुण्यात देखील भाजपनं जोरदार मुसंडी मारली आहे. पुण्यात भाजपनं राष्ट्रवादी अजित पवार गट आणि शरद पवार गटाला मोठा धक्का दिला आहे.

Follow Us
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान असं का म्हणाले?
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात शिंदेंचं...
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस- अवधूत गुप्ते
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस... दहीहंडी कार्यक्रमानिमित्त अवधूत गुप्तेंचं भावनिक वक्तव्य;
प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावत...
Mallika SherawAt Magathane Dahihandi | प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावतची हजेरी
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ;
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ; मुंबईतील ही दहीहंडी चर्चेत
हम दो हमारे दो और इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं...
Gulabrao Patil : 'हम दो हमारे दो और... इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं वक्तव्य तुफान चर्चेत
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला;
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला; प्रेक्षकांचं मन जिंकणाऱ्या संवादाची सर्वत्र चर्चा
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची...
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची समिती...
दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर...
MNS Avinash Jadhav Dahi Handi 2026 : दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई, थेट 1,322 कोटी...