AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मंत्रालयाला टाळं ठोकलं; मंत्रालयाच्या दारात आमदारांचा आक्रोश

NCP Sharad Pawar Group and Shivsena Uddhav Thackeray Group MLA Andolan : मराठा आरक्षणासाठी विशेष अधिवेशन बोलवा, अशी मागणी करत मंत्रालयाबाहेर राष्ट्रवादी आणि ठाकरे गटाच्या आमदारांचं आंदोलन सुरु आहे. यावेळी जोरदार घोषणाबाजी करण्यात येत आहे. वाचा सविस्तर...

मंत्रालयाला टाळं ठोकलं; मंत्रालयाच्या दारात आमदारांचा आक्रोश
आयेशा सय्यद
आयेशा सय्यद | Updated on: Nov 01, 2023 | 12:57 PM
Share

अक्षय मंकणी, प्रतिनिधी- टीव्ही 9 मराठी, मुंबई | 01 नोव्हेंबर 2023 : आरक्षणाच्या मागणीसाठी मराठा समाज रस्त्यावर उतरला आहे. मराठा आंदोलनाची धग आता मंत्रालयापर्यंत पोहोचली आहे. ठिकठिकाणी आंदोलनं केली जात आहेत. उपोषण केलं जात आहे. अशातच मंत्रालय परिसरात आमदार आकोश करताना दिसत आहेत. मराठा आरक्षणासाठी सर्वपक्षीय आमदार आंदोलन करत आहेत. मंत्रालयाला कुलुप लावण्यात आलं आहे. कोणत्याही मंत्र्याला आम्ही मंत्रालयात जाऊ देणार नाही. मराठा आरक्षणासाठी अधिवेशन बोलवा, अशी मागणी हे आमदार करत आहेत. यावेळी या आमदारांनी आपला आक्रोश व्यक्त केला.

कोण-कोणते नेते आंदोलनात सहभागी

मंत्रलय परिसरात सध्या आमदार आंदोलन करत आहेत. मराठा समाजाला आरक्षण मिळावं, या मागणीसाठी आंदोलन केलं जात आहे. राजू नवघरे, अमोल मिटकरी, राहुल पाटील, कैलास पाटील, विक्रम काळे, चेतन तुपे, बाबासाहेब आजबे, यशवंत माने, निलेश लंके , बाळासाहेब पाटील, दिलीप बनकर, बाबाजानी दुर्रानी, मोहन उबर्डे हे आमदार मंत्रालय परिसरात आंदोलन करत आहेत.

मराठा आरक्षणासाठी सर्वपक्षीय आमदारांनी भूमिका घ्यावी.त्यांनी सरकारसमोर बाजू मांडावी, अशी मागणी सर्वसामान्य मराठा बांधव करत आहेत. तसंच सरकारनं विशेष अधिवेशन बोलवून मराठा आरक्षणाचा प्रश्न मार्गी लावावा, अशी मागणी हे आंदोलक करत आहेत. याच मागणीला घेऊन आज मंत्रालय परिसरात आंदोलन करण्यात आलं. यावेळी या आमदारांनी विशेष अधिवेशनाची मागणी केली आहे.

मनोज जरांगे पाटील हे अंतरवली सराटी गावात आमरण उपोषण करत आहेत. त्यांच्या उपोषणाचा आज आठवा दिवस आहे. त्यांची तब्येत खालावते. त्यामुळे परवापासून ते पाणी पीत आहेत. पण आजच्या दिवसभरात सरकारने आरक्षणाबाबत निर्णय घ्यावा, अन्यथा आजपासून पुन्हा एकदा जलत्याग करण्याचा इशारा त्यांनी दिलाय. या पार्श्वभूमीवर आमदारांचं सुरु असलेलं हे आंदोलन लक्षवेधी ठरत आहे.

सह्याद्री अतिथीगृहात आज सर्वपक्षीय बैठक पार पडते आहे. या बैठकीत मराठा आरक्षण प्रश्नावर होत आहे. या बैठकीला सर्व पक्षाचे नेते उपस्थित आहेत. त्यामुळे या बैठकीतून काय समोर येतं. मराठा आरक्षणावर तोडगा निघतो का? हे पाहणं महत्वाचं आहे.

दरम्यान आज सकाळी आकाशवाणी आमदार निवास या ठिकाणी गाड्यांची तोडफोड करण्यात आली आहे. हसन मुश्रीफ यांच्या गाडीच्या काचा फोडण्यात आल्या. त्यामुळे हे आंदोलन आता अधिक तीव्र होत चाललं आहे.

Follow Us
उदय सामंत: 'एमआयडीसीच्या समस्यांवर लक्ष, मराठी भाषेला प्राधान्य'
उदय सामंत: एमआयडीसीच्या समस्यांवर लक्ष, मराठी भाषेला प्राधान्य
मराठीची सक्ती नाही मराठीची भक्ती आहे
'मराठीची सक्ती नाही मराठीची भक्ती आहे', रिक्षाचालकांच्या मराठी सक्तीवरून शिंदेंची प्रतिक्रिया
मराठी न बोलल्यास परवाना रद्द करण्याच्या धमक्यांवरचा दुबेंचा इशारा
संजय दुबे यांचा प्रताप सरनाईक यांच्या मराठी भाषेच्या सक्तीला थेट विरोध
प्रवीण दरेकर यांचा नवनाथ वाघमारे यांच्या वक्तव्यावर हल्लाबोल
प्रवीण दरेकर यांचा नवनाथ वाघमारे यांच्या वक्तव्यावर हल्लाबोल:
शरद पवार एनडीएमध्ये जाणार नाहीत, विरोधातच राहणार
पवारांकडून एनडीएमध्ये जाण्याच्या चर्चा फेटाळल्या; पक्ष कार्यकर्त्यांना दिले स्पष्ट निर्देश
देशमुखांचं कारागृह महानिरीक्षकांना पत्र; गैरप्रकारांच्या चौकशीची मागणी
धनंजय देशमुखांचे बीड कारागृह महानिरीक्षकांना पत्र: गैरप्रकार चौकशी आणि आरोपी स्थलांतराची मागणी
भाजप-शिवसेनेतील सुप्त संघर्ष पुन्हा चव्हाट्यावर
भाजप-शिवसेनेतील सुप्त संघर्ष पुन्हा चव्हाट्यावर? ठाण्यातील कार्यक्रमात भाजप नेत्यांची अनुपस्थिती
बेस्ट कामगारांचा बेमुदत संप; प्रलंबित मागण्यांसाठी कर्मचारी आक्रमक
बेस्ट कामगारांचा मंगळवारपासून बेमुदत संप: प्रलंबित मागण्यांसाठी कर्मचारी आक्रमक
पालकमंत्री महाजनांच्याविरोधात पहिल्याच दिवशी ठाकरे गटाचे आंदोलन
नाशिकचे पालकमंत्री गिरीश महाजन यांच्याविरोधात पहिल्याच दिवशी ठाकरे गटाचे आंदोलन
मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधीतून गरजू रुग्णांना मदत
मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधीतून गरजू रुग्णांना अवयव प्रत्यारोपणासाठी मदत