विरार रेल्वे स्थानकात शॉर्टसर्किटमुळे आग, माजला एकच गोंधळ , सुदैवाने जीवितहानी नाही

विरार स्थानकात शॉर्ट सर्किटमुळे भीषण आग लागल्याने एकच खळबळ उडाली. मात्र सुदैवाने त्यात कोणतीही जीवितहानी झालेली नाही. सोमवारी सकाळी 9:30 च्या सुमारास ही दुर्घटना घडली.

विरार रेल्वे स्थानकात शॉर्टसर्किटमुळे आग, माजला एकच गोंधळ , सुदैवाने जीवितहानी नाही
Image Credit source: प्रातिनिधीक फोटो
| Updated on: Nov 27, 2023 | 11:15 AM

विजय गायकवाड, टीव्ही9 मराठी प्रतिनिधी, विरार | 27 नोव्हेंबर 2023 : विरार स्थानकात शॉर्ट सर्किटमुळे भीषण आग लागल्याने एकच खळबळ उडाली. मात्र सुदैवाने त्यात कोणतीही जीवितहानी झालेली नाही. सोमवारी सकाळी 9:30 च्या सुमारास ही दुर्घटना घडली. कामासाठी बाहेर पडलेले नागरिक विरार स्थानकात आलेले असतानाच शॉर्टसर्किटमुळे आग लागली. विरार रेल्वे स्टेशनच्या प्लॅटफॉर्म क्रमांक सहावर हा प्रकार घडला. प्लॅटफॉर्मवरील लाईटच्या केबलमध्ये शॉर्टसर्किट होऊन भीषण आग लागली. आज सकाळी साडनेऊनच्या च्या सुमारास हा धक्कादायक प्रकार घडला. मात्र प्रवाशांनी वेळीच सावधगिरी बाळगली आणि ते बाजूला गेल्याने मोठी दुर्घटना टळली.

या आगीसंदर्भात माहिती मिळताच रेल्वे प्रशासन आणि वसई विरार महापालिकेच्या अग्निशामक दलाच्या जवानांनी घटनास्थळी तातडीने धाव घेतली. काही वेळानंतर आगीवर नियंत्रण मिळवून ती विझवण्यात अग्निशमन दलाच्या जवानांना यश मिळालं. रेल्वे प्रशासनाने केबलची लाईट बंद करुन, केबल दुरुस्तीचे काम पूर्ण केले..

मात्र सकाळी घाईच्या, गर्दीच्या वेळेत रेल्वे स्थानकात प्लॅटफॉर्मवर आग लागल्याने कामावर जाणाऱ्या प्रवाशांमध्ये भीतीचे वातावरण पसरलं होतं. शॉर्टसर्किटमुळे आग लागून धूर बराच दूर पसरला होता. आगीमुळे रेल्वे स्थानकात एकच गोंधळ माजला होता. मात्र कोणतीही जीवित अथवा वित्तहानी झालेली नाही.