Sanjay Raut : आंदोलनात सहभागी झाला म्हणून आमिर खानचा भाचा इमरानला देश सोडण्याची नोटीस, राऊत म्हणाले मग तुम्ही अक्षय कुमारला..
"त्यांना उपराष्ट्रपती पदावरुन हाकलून दिलेलं. जगदीप धनकड यांना तडकाफडकी काढण्याचं काम मोदी-शाहंनी केलय. धनकड यांना आरएसएसने प्रमुख पाहुणे म्हणून बोलावल यावरुन तुम्ही समजून घ्या, आरएसएस आणि मोदी-शाहंमध्ये दरी निर्माण झालीय. आरएसएसला मोदी-शाहंना दूर करायचय त्याचा हा पुरावा आहे"

इंडिया आघाडीने ज्ञानेश कुमारांच्या कथित घोटाळ्याविरोधात सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. त्यावर आज सुनावणी आहे. संजय राऊत त्या पार्श्वभूमीवर बोलले आहेत. “आज याचिकेसंदर्भात सुनावणी आहे, काय होतय ते पाहू. ही रस्त्यावरची लढाई आहे. देशाच्या सुप्रीम कोर्टाच्या दारात उभे आहोत. देशभरातील जनता जमली आहे. राहुल गांधी आम्ही सगळे साडेपाच ते सहा तास दिल्लीच्या रस्त्यावरचा प्रवास करुन सुप्रीम कोर्टात पोहोचून याचिका दाखल केली. आज सुनावणीची तारीख आहे. आम्ही आशावादी आहोत. सुप्रीम कोर्टाला कळतय, बाहेर काय चाललं आहे. लोकांमध्ये किती अशांतता आहे, असंतोष खदखदत आहे. आमचं म्हणणं सुप्रीम कोर्ट ऐकून घेईल” असं संजय राऊत म्हणाले.
“जंतर-मंतरवर तिरंगा फडकवला म्हणून सीजेपीच्या तीन नेत्यांना अटक झाली. महाराष्ट्रातल्या पत्रकारांनी दिल्लीत जाऊन काय चाललय ते पाहणं महत्वाचं आहे. देशातल्या प्रश्नांचं प्रतिबिंब रोज राजधानीत उमटतय” असं संजय राऊत म्हणाले. “अंकिता भंडारीचं प्रकरण आहे. तिची हत्या झाली, खून झाला एका रिसॉर्टवर. या खुनात भाजपचे सरचिटणीस दुष्यंत गौतम यांचं नाव आलं. त्यांची चौकशी सुरु आहे. चौकशी सुरु असताना त्यांची सिक्कीमच्या राज्यपालपदी नियुक्ती झाली. आता राज्यपाल म्हणून संरक्षण मिळालं. चौकशी बंद झाली. आपल्या एका रेपिस्ट पदाधिकाऱ्याला वाचवण्यासाठी मोदी-शाहंनी त्याची राज्यपालपदी नियुक्ती केली” असा आरोप संजय राऊत यांनी केला. “काल राहुल गांधींनी अंकिता भंडारीच्या मात्या-पित्यांना दिल्लीत बोलवून त्यांच्याशी चर्चा केली. इंडिया गेटवर काही काळ आंदोलन केलं. पहाटे चार वाजता अमित शाहच्या पोलिसांनी अंकिताच्या आई-वडिलांना अटक केली” असं संजय राऊत म्हणाले.
..तर हे सरकार घाबरलेलं आहे
सीजेपीच्या आंदोलनात सहभागी झालेला आमिर खानचा भाचा इमरान खानला देश सोडून जाण्याच आदेश देण्यात आला आहे. त्यावरही राऊत बोलले. “मग, शेख हसीना यांना का सांगत नाही? अक्षय कुमार परदेशी नागरिक आहे त्याला का सांगत नाही? बॉलिवूडमध्ये अनेक कलाकार NRI, विदेशी आहेत. इमरान खानने आंदोलनात सहभाग घेतला, तरुणांच्या बाजूने बोलला, म्हणून देश सोडून जायला सांगितलं असेल तर हे सरकार घाबरलेलं आहे” असं संजय राऊत म्हणाले.
हिंदू मंदिराचा कळस मोगलांनी कापून नेलेला
राम मंदिर दानपेटी प्रमाणे काशी विश्वनाथ मंदिराच्या कळसावरील सोन्याची चोरी झालीय यावर संजय राऊत म्हणाले की, “तिथले खासदार, पंतप्रधान नरेंद्र मोदी आहेत. काशीचा कळस, हिंदू मंदिराचा कळस मोगलांनी कापून नेलेला. सोमनाथ मंदिर अनेकदा मोगलांनी लुटलेलं. मोदींच्या काळात हिंदू राज्यात त्यांचेच लोक राम मंदिर दानपेटी लुटतायत. सोन्याचा कळस चोरुन नेतात, मोदी आपण कुठे आहात? लक्ष ठेवा कोण चोर आहे ते” असं संजय राऊत म्हणाले.