AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मराठी पाट्या न लावणाऱ्या दुकानांना दोन कोटींचा भुर्दंड, काहींची मुजोरी सुरूच…

मराठी देवनागरी लिपीत व ठळक अक्षरात असणे बंधनकारक आहे. मध्यंतरी पालिकेची कारवाई थंडावली होती. मात्र, हिंदी सक्तीच्या निर्णयावरून मुंबईत तापल्यानंतर कारवाईने पुन्हा जोर धरल्याचे दिसून येत आहे.

मराठी पाट्या न लावणाऱ्या दुकानांना दोन कोटींचा भुर्दंड, काहींची मुजोरी सुरूच...
Mumbai
| Updated on: Aug 05, 2025 | 7:39 AM
Share

दुकानांवर मराठी पाट्या न लावणाऱ्या दुकानांवर महापालिकेकडून कारवाईचा बडगा सुरूच आहे. महापालिकेने 3 हजार 133 दुकाने, आस्थापनांवर कारवाई करत आतापर्यंत तब्बल 1 कोटी 98 लाखांचा दंड वसूल केला आहे. शिवाय नियम मोडणाऱ्या दुकानदारांवर दंडात्मक कारवाई तसेच न्यायालयीन प्रक्रियेलाही सामोरे जावे लागणार आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानंतर दुकाने व आस्थापनांवर मराठी पाट्या लावणे बंधनकारक केले आहे. मुंबईत नऊ लाखांहून अधिक दुकाने व आस्थापना आहेत.

महाराष्ट्र दुकाने व आस्थापना (नोकरीचे व सेवा शर्तीचे विनियमन) नियम, 2018 व महाराष्ट्र दुकाने व आस्थापना (नोकरीचे व सेवा शर्तीचे विनियमन) (सुधारणा) अधिनियम, 2022च्या अनुक्रमे नियम 35 व कलम 36 क च्या तरतुदींनुसार आस्थापनांचे फलक मराठी देवनागरी लिपीत व ठळक अक्षरात असणे बंधनकारक आहे. मध्यंतरी पालिकेची कारवाई थंडावली होती. मात्र, हिंदी सक्तीच्या निर्णयावरून मुंबईत तापल्यानंतर कारवाईने पुन्हा जोर धरल्याचे दिसून येत आहे.

आतापर्यंत पालिकेकडून या मोहिमेत 1 लाख 27 हजार भेटी दिल्या असून अनेक जण कोर्टातही गेले आहेत. संबंधित दुकानदारांना उच्च न्यायालयात हजेरी लावावी लागेल आणि न्यायालय दंडाची रक्कम ठरवेल, अशी माहिती महापालिकेने दिली. दुकानांवर मराठीत पाटी नसल्यास प्रतिकामगार दोन हजार रुपये दंड किंवा न्यायालयीन कारवाईची तरतूद कायद्यात करण्यात आली आहे. ज्या दुकानावर मराठी पाटी नसेल त्या दुकानांचा फोटो काढला जात आहे.

पुरावा म्हणून तो फोटो रेकॉर्डवर नोंद करून संबंधितांना नोटिसा पाठवल्या जात आहेत. दुकानांची तपासणी करण्यासाठी विविध वॉर्ड आणि विभाग पातळीवर 60 निरीक्षकांची नियुक्ती केली आहे. दररोज 2 ते 3 हजार दुकानांची तपासणी करण्याचे नियोजन पालिकेचे आहे. शालेय शिक्षणात हिंदी सक्ती विरोध झाल्यानंतर थंडावली ही मोहिम आता परत सुरू झालीये. ज्या दुकानावर मराठी भाषेत नाही, अशांवर कारवाई ही केली जाणार आहे. तसे स्पष्ट आदेश आहेत. मात्र, असे असताना देखील मुंबईतील अनेक दुकानांवर अजूनही इंग्रजी भाषेतच पाटी बघायला मिळते.आता परत एकदा करवाईला वेग आलाय.

Follow Us
भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नबीन तातडीने सुनेत्रा पवारांच्या भेटीला
Nitin Nabin | भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नबीन तातडीने सुनेत्रा पवारांच्या भेटीला, राजकीय कारण काय?
जरांगेंच्या 13 पैकी 12 मागण्या मान्य! चंद्रकांत पाटलांची मोठी माहिती
ChandrakantPatil | जरांगेंच्या 13 पैकी 12 मागण्या मान्य! चंद्रकांत पाटलांची मोठी माहिती; पुढे म्हणाले...
भोंदू खरातच्या जामीन अर्जाबाबत... कोर्टातील सुनावणीत नेमकं काय घडलं?
भोंदू खरातच्या जामीन अर्जाबाबत... कोर्टातील सुनावणीत नेमकं काय घडलं?
गणेशोत्सवात बाप्पाच्या चरणी फडणवीस-नबीन; सिद्धिविनायक मंदिरात...
गणेशोत्सवात बाप्पाच्या चरणी CM फडणवीस- नितीन नबीन; सिद्धिविनायक मंदिरात घेतले बप्पांचे दर्शन!
जरांगेंच्या 12 मागण्या कोणत्या? विजय वडेट्टीवारांचा सरकारला थेट सवाल
Vijay Wadettiwar | जरांगेंच्या 12 मागण्या कोणत्या? विजय वडेट्टीवारांचा सरकारला थेट सवाल, म्हणाले...
महाराष्ट्रातील 19 जिल्हे दुष्काळाच्या उंबरठ्यावर! पावसाचा खंड
महाराष्ट्रातील 19 जिल्हे दुष्काळाच्या उंबरठ्यावर! पावसाचा खंड, पिकांची स्थिती काय?
ठाकरेंच्या पक्षप्रमुख पदावरच शिंदे गटाचा सवाल! सुप्रीम कोर्टात...
Shivsena | उद्धव ठाकरेंच्या पक्षप्रमुख पदावरच शिंदे गटाचा सवाल! सुप्रीम कोर्टात नीरज किशन कौलांचा मोठा युक्तिवाद
मनोज जरांगे यांचा पुढील दौरा कसा असेल, व्हिडिओ बघाच
Manoj Jarange Patil | मनोज जरांगे यांचा पुढील दौरा कसा असेल, व्हिडिओ बघाच
अमित शाह 19-20 सप्टेंबरला कोल्हापूर दौऱ्यावर! सलग दुसऱ्यांदा दौरा
Amit Shah | अमित शाह 19-20 सप्टेंबरला कोल्हापूर दौऱ्यावर! सलग दुसऱ्यांदा दौरा, राजकीय भेटीगाठींकडे लक्ष
मनोज जरांगे पाटलांच्या उपोषणाचा 19वा दिवस! पाणी-सलाईन बंद, प्रकृती...
Manoj Jarange | मनोज जरांगे पाटलांच्या उपोषणाचा 19वा दिवस! पाणी-सलाईन बंद, प्रकृती चिंताजनक