AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मुख्यमंत्री फडणवीसांकडून जपून बोलण्याचा सल्ला, शिरसाटांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले..

संजय शिरसाट यांच्या वक्तव्यावर प्रतिक्रिया देताना फडणवीस यांनी त्यांना जपून बोलण्याचा सल्ला दिला होता, यावर आता शिरसाट यांची प्रतिक्रिया समोर आली आहे.

मुख्यमंत्री फडणवीसांकडून जपून बोलण्याचा सल्ला, शिरसाटांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले..
| Updated on: Aug 04, 2025 | 4:32 PM
Share

शिवसेना शिंदे गटाचे मंत्री संजय शिरसाट यांनी निधी मागा, सरकारचा पैसा आहे, आपल्या काय बापाचं जातं, असं वक्तव्य केलं होतं, त्यावर प्रतिक्रिया देताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यांना जपून बोलण्याचा सल्ला दिला होता. संजय शिरसाट जे बोलले त्यात चुकीचं वाटत नाही, मात्र संयम ठेवून बोललं पाहिजे, असं फडणवीस यांनी म्हटलं होतं. दरम्यान आता फडणवीस यांच्या या सल्ल्यावर संजय शिरसाट यांची पहिली प्रतिक्रिया समोर आली आहे. ते सोलापुरात बोलत होते.

नेमकं काय म्हणाले शिरसाट?

मुख्यमंत्र्यांनी आम्हाला जपून बोलण्याचे आदेश दिलेत ते आमचे कुटुंब प्रमुख आहेत. बोली भाषेत कोणी काही बोललं तर त्याचा विपर्यास होतो, मात्र त्याबाबत आम्ही काळजी घेत आहोत, असं शिरसाट यांनी म्हटलं आहे.

दरम्यान मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी मोठं वक्तव्य केलं आहे, कामाला लागा, सत्ता आपलीच येणार आहे, असं राज ठाकरे यांनी आपल्या कार्यकर्त्यांना म्हटलं आहे. यावर देखील शिरसाट यांनी प्रतिक्रिया दिली आहे. राज ठाकरे पक्षाचे प्रमुख आहेत. पक्ष वाढीसाठी प्रत्येक नेता असे बोलतो. त्यामुळे राज ठाकरेंचे विधान गैर नाही. प्रत्येक नेता सत्तेत जाण्यासाठी प्रयत्न करतो. कोणत्याही पक्षाचे अखेरचे समीकरण हे सत्ता असते, असं शिरसाट यांनी म्हटलं आहे.  आम्हाला कोणाची भांडण लावण्यात इंटरेस्ट नाही.  दोन भाऊ एकत्र आले तर त्यांची युती मजबूत होईल असंही यावेळी शिरसाट यांनी म्हटलं आहे.

आज भंडारा येथे बोलताना भाजप नेते परिणय फुके यांनी वादग्रस्त वक्तव्य केलं आहे. शिवसेनेचा बाप मीच, असं फुके यांनी म्हटलं आहे. दरम्यान परिणय फुके यांच्या या वक्तव्यानंतर आता वातावरण चांगलंच तापलं आहे. फुके यांनी माफी मागणी अशी मागणी शिवसेना शिंदे गटाकडून करण्यात आली आहे, यावर देखील शिरसाट यांनी प्रतिक्रिया दिली आहे.  फुके नक्की काय बोलले ते मी  ऐकलं नाही, अन्यथा चांगल्या भाषेत उत्तर देण्याचे कसब माझ्याकडे आहे, असं यावेळी शिरसाट यांनी म्हटलं आहे.

Follow Us
कोळवणकर कुटुंबियांचा पर्यावरणपूरक गोकर्ण मंदिराचा देखावा, आत्मलिंग...
कोळवणकर कुटुंबियांचा पर्यावरणपूरक गोकर्ण मंदिराचा देखावा आणि आत्मलिंग कथा
खासगी रुग्णालयांतील सलाईन नळीच्या विक्रीत... FDA आयुक्तांची धडक कारवाई
खासगी रुग्णालयांतील सलाईन नळीच्या विक्रीत... FDA आयुक्तांची धडक कारवाई पुन्हा राज्यभर चर्चेत
आर्थर रोड राजा गणेश मंडळाचा अनोखा देखावा; ज्येष्ठांच्या आरोग्याचा दिला
Ganeshotsav | आर्थर रोड राजा गणेश मंडळाचा अनोखा देखावा; ज्येष्ठांच्या आरोग्याचा दिला महत्त्वाचा संदेश
कायदेशीर बाबींना वेळ द्या, आंदोलन स्थगित करा!
Radhakrishna Vikhepatil | कायदेशीर बाबींना वेळ द्या, आंदोलन स्थगित करा! राधाकृष्ण विखे पाटलांचं मनोज जरांगेंना आवाहन
भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नबीन तातडीने सुनेत्रा पवारांच्या भेटीला
Nitin Nabin | भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नबीन तातडीने सुनेत्रा पवारांच्या भेटीला, राजकीय कारण काय?
जरांगेंच्या 13 पैकी 12 मागण्या मान्य! चंद्रकांत पाटलांची मोठी माहिती
ChandrakantPatil | जरांगेंच्या 13 पैकी 12 मागण्या मान्य! चंद्रकांत पाटलांची मोठी माहिती; पुढे म्हणाले...
भोंदू खरातच्या जामीन अर्जाबाबत... कोर्टातील सुनावणीत नेमकं काय घडलं?
भोंदू खरातच्या जामीन अर्जाबाबत... कोर्टातील सुनावणीत नेमकं काय घडलं?
गणेशोत्सवात बाप्पाच्या चरणी फडणवीस-नबीन; सिद्धिविनायक मंदिरात...
गणेशोत्सवात बाप्पाच्या चरणी CM फडणवीस- नितीन नबीन; सिद्धिविनायक मंदिरात घेतले बप्पांचे दर्शन!
जरांगेंच्या 12 मागण्या कोणत्या? विजय वडेट्टीवारांचा सरकारला थेट सवाल
Vijay Wadettiwar | जरांगेंच्या 12 मागण्या कोणत्या? विजय वडेट्टीवारांचा सरकारला थेट सवाल, म्हणाले...
महाराष्ट्रातील 19 जिल्हे दुष्काळाच्या उंबरठ्यावर! पावसाचा खंड
महाराष्ट्रातील 19 जिल्हे दुष्काळाच्या उंबरठ्यावर! पावसाचा खंड, पिकांची स्थिती काय?