CNG Price : गॅस सिलिंडरनंतर सीएनजीच्या दरात वाढ; सर्वसामान्यांना महागाईचा दुहेरी झटका, भाडेवाढ होण्याची शक्यता

गॅस सिलिंडरनंतर सीएनजीच्या दरात वाढ झाली आहे. त्यामुळे सर्वसामान्यांना महागाईचा दुहेरी झटका बसला आहे. त्यामुळे भाडेवाढ होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

CNG Price : गॅस सिलिंडरनंतर सीएनजीच्या दरात वाढ; सर्वसामान्यांना महागाईचा दुहेरी झटका, भाडेवाढ होण्याची शक्यता
cng rate
Image Credit source: टीव्ही9 मराठी
| Updated on: Oct 02, 2026 | 7:47 AM

भारतात ऑक्टोबरच्या पहिल्याच दिवशी गॅस सिलिंडरच्या दरात वाढ झाली. गॅस सिलिंडरनंतर आता मुंबई आणि आसपासच्या भागात सीएनजीच्या दरात वाढ झाली आहे. गॅस सिलिंडर आणि सीएनजीच्या दरात वाढ झाल्याने सर्वसामान्यांना दुहेरी झटका बसला आहे. गणेशोत्सव झाल्यानंतर दसरा, नवरात्री अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपली आहे. या सणासुदीच्या काळात सीएनजीच्या दरात वाढ झाली आहे. महानगर गॅस लिमिटेडने 1 ऑक्टोबरपासून सीएनजीच्या दरात वाढ झाल्याने नवा दर 89 रुपये प्रति किलो झाला आहे. त्यामुळे पुढील काळात रिक्षा, टॅक्सीची भाडेवाढ होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

एलपीजी सिलिंडर आणि सीएनजी महागल्याने सर्वसामान्यांच्या बजेट कोलमडण्याची शक्यता आहे. खरंतर 1 ऑक्टोबर रोजी व्यावसायिक गॅस सिलिंडरच्या दरात वाढ झाली. त्यानंतर आता सीएनजी महागल्याने सर्वसामान्यांना दुहेरी दणका बसला आहे. पुढील काही दिवसांत एसी, टीव्ही, फ्रीज या इलेक्ट्रॉनिक वस्तूच्या किंमती वाढण्याची शक्यता आहे. त्याचबरोबर साखर,दाळीच्या किंमती देखील वाढण्याची शक्यता आहे. पुढील काही दिवसांत महागाई आणखी वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे .

Loading...

देशाअंतर्गत गॅस आणि आयात करण्यात आलेल्या आरएलएनजीच्या वाढलेल्या किंमतीमुळे दरवाढ केल्याचे महानगर गॅस लिमिटेडने सांगितलं आहे.  या निर्णयानुसार, मुंबई आणि आसपासच्या महानगर प्रदेशात सीएनजीच्या (CNG) दरात एक रुपयांनी वाढ केली आहे.  ही वाढ आजपासून लागू होणार असून वाहनधारकांना सीएनजीसाठी अधिकचे पैसे मोजावे लागतील.

सीएनजीच्या दरात का वाढ झाली?

महानगर गॅस लिमिटेडने सांगितलं की, कच्चा माल तयार करण्यासाठी खर्च वाढला आहे.  देशाअंतर्गत तयार करण्यात येणारा नैसर्गिक वायू, आयात केलल्या पुनर्वायूकृत द्रवीकृत नैसर्गिक वायू (आरएलएनजी) च्या दरात वाढ  झाल्याचे कंपनीने सांगितले. इंधनाचा तुटवडा आणि दरवाढीमुळे अनेक वाहनधारकांनी आपला मोर्चा सीएनजी वापराकडे वळवला आहे, असं बोलले जात आहे. आयात करण्यात येत असलेल्या आरएलएनजीच्या किमती आंतरराष्ट्रीय गॅस बाजाराशी निगडित असतात. या गॅसच्या वाढलेल्या जागतिक किमतींमुळे कंपनीचा खरेदी खर्च वाढल्याचे सांगण्यात येत आहे.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us