ट्रेन मालाड स्टेशनला येताच भोसकले… मुंबईला हादरवणारी घटना! नवा CCTV Video समोर; प्रत्येक प्रसंग कैद

मुंबईत हादरुन टाकणारी घटना समोर आली आहे. एका प्राध्यपकावर मालाड स्टेशन येताच हल्ला करण्यात आला. त्यानंतर हल्लेखोराने नेमकं काय केलं जाणून घ्या. या घटनेचा CCTV Video समोर आला आहे.

ट्रेन मालाड स्टेशनला येताच भोसकले... मुंबईला हादरवणारी घटना! नवा CCTV Video समोर; प्रत्येक प्रसंग कैद
Malad Case
Image Credit source: Tv9 Network
| Updated on: Jan 25, 2026 | 1:20 PM

मुंबईची लाईफलाइन म्हणून ओळखल्या जाणाऱ्या रेल्वेमध्ये धक्कादायक प्रकार घडला आहे. 33 वर्षीय प्राध्यापक आलोक कुमार सिंह यांच्या पोटात धारधार हत्याराने वार करुन आरोपी फरार झाला होता. अगदी छोट्याश्या गोष्टीवरुन झालेला वाद हा हत्येपर्यंत पोहोचला. जसे रेल्वे स्टेशन जवळ आले तसा आरोपीने प्रध्यापकावर हल्ला केला. त्याने हल्ला केला आणि पळ काढला. या घटनेचा सीसीटीव्ही व्हिडीओ समोर आला आहे. आता नेमकं काय घडलं जाणून घ्या…

दोघांमध्ये झाला होता वाद

प्राध्यापक आलोक कुमार सिंह हे एका खासगी महाविद्यालयात शिकवत होते. ते दररोज संध्याकाळी ट्रेनने प्रवास करत असत. आरोपी ओमकार शिंदे हा देखील याच ट्रेनने प्रवास करत असे. तो याच लोकलने मालाड ते चर्नी रोड असा प्रवास करतो. मालाड स्टेशन येण्यापूर्वी आलोक आणि ओमकार यांच्यामध्ये वाद झाला. उतरण्यासाठी आलोक सिंग यांना पुढे सरकण्यासाठी आरोपी शिंदे ढकलत होता. पण पुढ्यात महिला उभी असल्यामुळे आलोक सिंग यांनी धक्का मारू नको अश्या सूचना केल्या. या किरकोळ वादाचे रूपांतर भांडणात झाले. त्यानंतर ओमकारने बघून घेतो अशी धमकी दिली.

वाचा: प्लॅटफॉर्मवरच मर्डर! तोंडातून शब्दही फुटला नाही, आला अन् थेट पोटातच चिमटा…मालाड रेल्वे स्थानकात असं कधीच घडलं नव्हतं

मालाड स्टेशन येताच…

रेल्वे स्टेशनवरील एक व्हिडीओ समोर आला आहे. या व्हिडीओमध्ये स्पष्ट दिसत आहे की रेल्वे स्थानकात ट्रेन येताच आरोपी ओमकार शिंदे हा ट्रेनमधून खाली उतरतो. त्यानंतर तो खिश्यातून चिमटा काढतो आणि प्राध्यापकाच्या पोटात खुपसतो. चिमटा इतका धार धार होता की प्राध्यापकांना वेदना सुरु होतात. त्यानंतर ते आरोपीला पकडा असे ओरडू लागतात. तेवढ्यात आरोपी ओमकार हा फरार होतो. त्या पकडण्याचा रेल्वे स्थानकातील लोकांनी प्रयत्न केला. मात्र, तो पर्यंत तो तेथून पळून गेला. आलोक यांना रेल्वे स्थानकातील लोकांनी वेदना होत असल्यामुळे बसवल्याचे चित्र दिसत आहे.

आरोपीला अटक

घडलेला प्रकार पोलीसांना कळताच पोलीस घटनास्थळी पोहोचले. त्यांनी आलोक यांना रुग्णलयात ताडीने दाखल केले. पण तिथे डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. त्यानंतर पोलिसांनी आरोपीचा तपास सुरु केला. त्यांनी आरोपीवर बोरीवली जीआरपीने भादंवि कलम १०३ (हत्या) अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. सीसीटीव्हीच्या माध्यमातून त्यांनी आरोपीला अटक केली आहे.