रुग्णालयात मराठी तरुणीला बेदम मारहाण,सीसीटीव्हीत घटना कैद

एका रुग्णलयात मराठी तरुणीला मारहाण झाल्याची धक्कादायक प्रकार घडला आहे.ही घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली असून या प्रकरणी मारहाण करणाऱ्या तरुणावर गुन्हा दाखल झाला आहे.

रुग्णालयात मराठी तरुणीला बेदम मारहाण,सीसीटीव्हीत घटना कैद
KALYAN CASE
| Updated on: Jul 22, 2025 | 4:24 PM

कल्याणमध्ये एका मराठी तरुणीला मारहाण झाल्याचा गंभीर प्रकार घडला आहे. कल्याणच्या नांदिवली परिसरातील ही घटना असून एका खाजगी रुग्णालयात हा प्रकार घडला आहे. डॉक्टरांकडे एमआर बसले आहेत असे या रिसेप्सनीस्ट तरुणीने सांगितल्याने त्याचा राग आल्याने या तरुणाने तिला लाथेने मारल्याचा प्रकार सीसीटीव्हीत कैद झाला आहे. या प्रकरणी मानपाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला असून पुढील तपास सुरु आहे.

कल्याण जवळील नांदिवली परिसरातील एका खाजगी रुग्णालयात एका तरुणीला मारहाण झाल्याची घटना घडली आहे. ही तरुणी रिसेप्सनीस्ट असून या तरुणीने संबंधित तरुणाला डॉक्टरांकडे एमआर बसले आहेत तुम्ही जरा थांबा असे म्हटल्याने या तरुणाचा रागाचा पारा वाढला आणि त्याने तिला सरळ लाथेने प्रहार करीत ढकल्याचे उघडकीस आले आहे. रुग्णालयातील सीसीटीव्हीत हा प्रकार कैद झाला आहे. या तरुणाचे नाव गौरव झा असून या प्रकरणात त्याच्या विरोधात मानपाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिस या तरुणाचा शोध घेत आहेत.

तरुणावर कठोर कारवाईची मागणी

कल्याणच्या नांदिवली परिसरातील या धक्कादायक प्रकारानंतर डॉक्टरेतर कर्मचाऱ्यांच्या सुरक्षेचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर आला आहे. या प्रकरणात या तरुणीने केवळ डॉक्टरांची मिटींग चालू आहे नंतर डॉक्टर भेटतील असे सांगिल्याने या तरुणाचे माथे लागलीच भडकले. आणि त्याने या तरुणीला थेट लाथेने उडवल्याचे सीसीटीव्हीतील दृश्य अंगावर काटा आणणारे आहे. या घटनेपूर्वी यांच्यात काही शाब्दीक चकमक झाली का ? याचा तपास पोलीस घेणार आहेत. परंतू काही वाद झाले तरी एका महिलेवर अशा प्रकारे हल्ला करणे चुकीचे असल्याने या प्रकरणात कठोर कारवाई व्हावी अशी मागणी होत आहे.

रुग्णालयातील मारहाणीचे प्रकार वाढले

रुग्णालयात पेशंटच्या नातेवाईकांनी मारहाण करण्याच्या अनेक घटना अलिकडे घडत आहेत. या प्रकरणात डॉक्टर आणि डॉक्टरेतर कर्मचाऱ्यांच्या सुरक्षेसाठी विशेष कायदाही करण्यात आला आहे. तरीही डॉक्टर तसेच वैद्यकीय कर्मचाऱ्यांना रुग्णाच्या नातेवाईकांकडून मारहाण केल्याचे प्रकार वारंवार घडत आहे.

काय घडलं नेमकं?

ही घटना २१ जुलैच्या सायंकाळी घडलेली आहे. “श्री बाल चिकित्सालय” या खाजगी क्लिनिकमध्ये रिसेप्शनिस्ट म्हणून कार्यरत असलेल्या या तरुणीला मारहाण करणारा हा तरुण नशेत होता असेही म्हटले जात आहे. खाजगी क्लिनिकमध्ये रिसेप्शनिस्ट म्हणून कार्यरत असताना तिने डॉक्टरांच्या स्पष्ट आदेशानुसार  केबिनमध्ये प्रवेश प्रवेश नाकारला होता.  ती तिच्या नियमाचे पालन करत असताना, एका नशेत धुंद परप्रांतीय तरुणाने थेट केबिनमध्ये घुसण्याचा प्रयत्न केला. त्याला अडवण्याचा प्रयत्न केला असता त्याने संतापून तिला पुन्हा मागे पळत येऊन तिच्या तोंडावर लाथ मारली. त्यामुळे ती खाली कोसळली तरीही त्याने तिच्यावर लाथाबुक्क्यांचा भयंकर मारा केला असे प्रत्यदर्शींनी सांगितले.