मोदी डरपोक… एवढं घाबरता तर खुर्चीवर बसता कशाला? दीपकेंचा जोरदार हल्लाबोल

अभिजीत दीपके यांनी पंतप्रधान मोदींवर 'डरपोक' असा हल्लाबोल केला आहे. दिल्लीतील सीजेपी आंदोलनापूर्वी लागू केलेल्या प्रचंड निर्बंधांवरून दीपके यांनी मोदींना लक्ष्य केले. निवडणूक आयुक्तांवरील कथित गैरव्यवहाराविरोधात हे आंदोलन आहे. तरुणांना घाबरून मोदींनी खुर्ची सोडावी, अशी संतप्त प्रतिक्रिया दीपके यांनी दिली.

मोदी डरपोक... एवढं घाबरता तर खुर्चीवर बसता कशाला? दीपकेंचा जोरदार हल्लाबोल
Abhijeet Dipke
Image Credit source: tv9 marathi
| Updated on: Oct 10, 2026 | 7:32 AM

दिल्लीत होणाऱ्या सीजेपीच्या आंदोलनासाठी अभिजीत दीपके दिल्लीकडे रवाना झाले आहेत. मुंबईहून ते दिल्लीला निघाले आहेत. अभिजीत दीपके विमानतळावर आले असता त्यांना मीडियाने घेरले. यावेळी त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर जोरदार हल्ला केला. मोदी डरपोक पंतप्रधान आहेत. देशातील तरुणांना एवढं घाबरता तर त्यांनी खुर्ची सोडली पाहिजे, अशी संतप्त प्रतिक्रिया अभिजीत दीपके यांनी व्यक्त केली आहे. दीपके हे सकाळी 10 वाजेपर्यंत दिल्लीत पोहोचतील. त्यानंतर दिल्लीत आंदोलनाला सुरुवात होणार आहे, असं सांगितलं जात आहे.

अभिजीत दीपके यांनी विमानतळावरच पहिली प्रतिक्रिया दिली. नरेंद्र मोदी हे हुकूमशाहा आहेत. ते देशातील तरुणांना घाबरले आहेत. त्यामुळे त्यांनी दिल्लीतील रेल्वे, मेट्रो, रस्ते बंद करून टाकले आहेत. मोदींना देशातील युवकांची, जनतेची एवढी भीती वाटते तर कशाला पंतप्रधानपदाच्या खुर्चीवर बसले? त्यांनी खुर्ची सोडली पाहिजे. कशाला तुम्ही निर्बंध लादता? एवढंच वाटतं तर मला अटक करा. मोदी हे डरपोक पंतप्रधान आहेत, असा हल्ला अभिजीत दीपके यांनी चढवला.

Loading...

चौका चौकात पोलिसांचा बंदोबस्त

दरम्यान, सीजेपीच्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर चौकाचौकात पोलिसांचा बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. संसद मार्गाला तर छावणीचं स्वरुप आलं आहे. दिल्लीत येणाऱ्या प्रत्येकाची कसून चौकशी केली जात आहे. या ठिकाणी सीजीएफचे जवान तैनात करण्यात आले आहेत.

20 हजार जवान तैनात

कॉकरोच जनता पार्टीने मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या कथित निवडणूक घोटाळ्याच्या पार्श्वभूमीवर आंदोलन छेडलं आहे. ज्ञानेश कुमार यांचा राजीनामा घेण्यासाठी हे आंदोलन होत आहे. या आंदोलनाला पोलिसांची परवानगी नाहीये. मात्र, सीजेपीने आंदोलन करण्याचा निर्धार केला आहे. त्यामुळे दिल्ली पोलीस अलर्ट मोडवर आहेत. दिल्लीत एकूण 20 हजार जवान तैनात करण्यात आले आहेत.

कोणताही अनुचित प्रकार होऊ नये म्हणून वाहतुकीचे मार्ग बदलण्यात आले आहेत. काही रस्ते बंद करण्यात आले आहेत. कॅनॉट प्लेसमधील सर्व बाजार बंद ठेवण्यात आले आहेत. सोबतच 50 हून अधिक मेट्रो स्टेसन बंद ठेवण्यात आले आहेत. तसेच 60 हून अधिक रेल्वे रद्द करण्यात आल्या आहेत.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us