टिपू सुलतान नावाला विरोध बजरंग दल रस्त्यावर, अनेकांची धरपकड; भाजपचे खासदार, आमदारही आंदोलनात

| Updated on: Jan 26, 2022 | 4:36 PM

आता टिपू सुलतान या नावावरून बजरंग दल (Bajrang Dal)चांगलेच आक्रमक झाले आहे. मालाडमधील ज्या क्रिडा संकुलाच्या नावावरून हा वाद पेटला आहे, त्या क्रिडा संकुलाच्या बाहेर बजरंग दलाने जोरदार आंदोलन केले आहे.

टिपू सुलतान नावाला विरोध बजरंग दल रस्त्यावर, अनेकांची धरपकड; भाजपचे खासदार, आमदारही आंदोलनात
बजरंग दलाचे आक्रमक आंदोलन
Follow us on

मुंबई : मुंबईत सध्या टिपू सुलतान (Tipu Sultan) नावावरून जोरदार राजकारण पेटलं आहे. आधी या नावाला भाजपने (Bjp) कडाडून विरोध केला. राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनीही यावर भाष्य करत विरोध दर्शवला आणि आता टिपू सुलतान या नावावरून बजरंग दल (Bajrang Dal)चांगलेच आक्रमक झाले आहे. मालाडमधील ज्या क्रिडा संकुलाच्या नावावरून हा वाद पेटला आहे, त्या क्रिडा संकुलाच्या बाहेर बजरंग दलाने जोरदार आंदोलन केले आहे. यावेळी बजरंग दलाकडून जोरदार घोषणाबाजीही करण्यात आली. आंदोलकांना आवर घालण्यासाठी यावेळी तगडा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. पालकमंत्री अस्लम शेख यांच्या समर्थनार्थ येथे त्यांचेही कार्यकर्ते जमले आहेत, आंदोलन आटोक्यात आणण्यासाठी पोलिसांनी बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांची धरपकड केली आहे.

बजरंग दल, विश्व हिंदू परिषदेची भूमिका काय?

मालाडच्या मालवणी परिसरामध्ये बांधण्यात आलेल्या एका क्रीडा मैदानाचे ‘वीर टिपू सुलतान क्रीडा संकुल’ असे नामकरण करण्याचे प्रयत्न सत्ताधारी काँग्रेसकडून केले जात आहे. स्थानिक आमदार आणि काँग्रेसचे नेते तथा मुंबई शहराचे पालकमंत्री असलम शेख यांच्या आमदार निधीतून हे सर्व काम पूर्णत्वास येत आहे. याचा लोकार्पण सोहळा बुधवार 26 जानेवारी रोजी करण्यात येणार असल्याच्या आशयाचे फलक मालवणी परिसरात लावण्यात आले आहेत. टिपू सुलतान सुल्तान हिंदू विरोधी होता. त्याने हिंदूंची अनेक मंदिरे उध्वस्त केली, हजारो हिंदूंचे धर्मांतरण केले तसेच अनेक हिंदूंची क्रूरपणे हत्या केली आहे. अशा क्रूर आणि हिंदू विरोधी टिपू सुलतानचे नाव क्रीडा मैदानास देण्यास आमचा विरोध आहे. हे नामकरण त्वरित थांबविण्यात यावे, असे निवेदन आम्ही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना करत आहोत, असे प्रतिपादन विश्व हिन्दू परिषद, मुंबईचे सहमंत्री / प्रवक्ता श्रीराज नायर यांनी एका व्हिडिओ द्वारे केले आहे.

भाजपची भूमिका काय?

हिंदुंचा अनन्वित छळ करणारा टिपू सुलतान हा देश गौरव होऊच शकत नाही. त्यांचं नाव उद्यानाला देणं अयोग्य ठरेल, असं देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे. मुंबई महापालिका टिपू सुलतानचे नाव उद्यानाला देऊन त्यांचं महिमामंडन करत आहे. हे त्वरीत थांबवलं गेलं पाहिजे, असंही फडणवीसांनी म्हटलं आहे. देवेंद्र फडणवीस यांनी मीडियाशी संवाद साधताना हा विरोध केला. ज्या टिपू सुलतानानेने हिंदुंवर अनन्वित अत्याचार केले तो टिपू सुलतान आमचा देश गौरव होऊ शकत नाही. त्यांचं नाव मैदानाला देणं अयोग्य आहे. अत्याचार करणाऱ्याचं महिमामंडन करण्याचं काम होत आहे. हा निर्णय रद्द केला पाहिजे, असं फडणवीस म्हणाले.

VIDEO: टिपू सुलतान देश गौरव होऊच शकत नाही, मुंबई महापालिकेच्या वादात फडणवीसांची उडी

शिवसेना की ‘लाचारसेना’? उद्यानाला हिंदुद्वेष्ट्या टिपू सुलतानचे नाव खपवून घेणार नाही-भाजप

VIDEO: अडीच महिन्यानंतर मुख्यमंत्री ‘प्रकटले’, राऊत म्हणतात; टीका करणारे नामर्द!