राज्यपालांना हटविलं तरी महामोर्चा निघणारचं, अजित पवार यांचा इशारा

| Updated on: Dec 05, 2022 | 8:09 PM

८ ते १८ डिसेंबरदरम्यान, राज्यपाल कोश्यारी यांनी केंद्र सरकारनं हटविलं तरीही मोर्चा निघणारचं आहे, याचा पुनरुच्चार अजित पवार यांनी केला.

राज्यपालांना हटविलं तरी महामोर्चा निघणारचं, अजित पवार यांचा इशारा
उद्धव ठाकरे, अजित पवार
Follow us on

मुंबई – महाविकास आघाडीच्या नेत्यांमध्ये काही वेळापूर्वी बैठक झाली. अजित पवार यांच्या बंगल्यावर ही बैठक झाली. संजय राऊत, जयंत पाटील, मिलिंद नार्वेकर हे बैठकीला उपस्थित होते. अजित पवार यांच्या देवगिरी बंगल्यावर उद्धव ठाकरे आणि अजित पवार यांच्यात बैठक झाली. या बैठकीनंतर महाविकास आघाडीनं पत्रकार परिषद घेण्यात आली. यात महाविकास आघाडीनं राज्यपालांच्या वादग्रस्त निर्णयावर एकत्र येऊन आपली भूमिका ठरविली. या पत्रकार परिषदेला उद्धव ठाकरे, राष्ट्रवादी काँग्रेसचे अजित पवार आणि काँग्रेसचे बाळासाहेब थोरात उपस्थित होते.

महाविकास आघाडीची सत्तांतरानंतरही ही पहिली पत्रकार परिषद आहे. या पत्रकार परिषदेत समाजवादी पार्टीचे अबू आझमी, कपिल पाटील, शेतकरी कामगार पक्षाचे जयंत पाटील असे सर्व घटकपक्ष १७ डिसेंबरच्या मोर्चात सहभागी होणार आहेत, असं ठरलं.

यासंदर्भात बोलताना अजित पवार म्हणाले, काल ठरलं नि आज मिटिंग बोलावली. शनिवारी, १७ तारखेचा मोर्चा ठरलेला आहे. छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल राज्यपालांची बेताल वक्तव्य चालली आहेत. याचा निषेध केला जाणार आहे.

८ ते १८ डिसेंबरदरम्यान, राज्यपाल कोश्यारी यांनी केंद्र सरकारनं हटविलं तरीही मोर्चा निघणारचं आहे, याचा पुनरुच्चार अजित पवार यांनी केला.

नांदेडमधील देगलूरच्या लोकांनी आम्हाला तेलंगणात जायचं असं कधी सांगितलं नव्हतं. आता ती गावं बोलायला लागलीत. सांगली, सोलापूरची लोकं बोलायला लागलीत. गुजरातच्या सीमेवरील लोकंही बोलायला लागलीत.

पण, सीमेवरील गावांनी अशी इच्छा व्यक्त केली जात नव्हती. सांगतील जयंत पाटील यांनी तरतूद केली होती. ती या सरकारनं थांबविली. नाशिक जिल्ह्यात छगन भुजबळ यांनी तरतूद केली होती ही या सरकारनं थांबविली, असा आरोप अजित पवार यांनी केला.

मोठ-मोठे उद्योग जातात. आढावा घेण्याऱ्या संस्थांनी चांगलं काम केल्याचं सांगण्यात आलं. जे उद्योग होते ते घालविले. आता नवीन उद्योग काय आणणार, बाकीचेचं उद्योग चाललेत, असा खरपूस समाचारही अजित पवार यांनी घेतला, असं अजित पवार यांनी सांगितलं.

कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांना बोलण्याची धमक आहे का, अजित पवार यांनी असा सवालही राज्यसरकारला विचारला.