शेजाऱ्यानेच केला घात, दहा वर्षांच्या मुलाचे अपहरण केले, 25 लाखांची मागणी केली, पुढे हत्या करुन…

| Updated on: Mar 26, 2024 | 11:23 AM

Crime News: मुदासिर बुबेरे राहणार वांगणी यांचा याच परिसरात टेलरिंगचा छोटासा व्यवसाय आहे. त्यांचा ९ वर्षीय मुलगा इबाद हा इयत्ता ४ थी शिकत आहे. रमजानचा महिना सुरु असल्याने इबाद हा नियमाप्रमाणे सायंकाळी नमाज अदा करण्यासाठी गेला होता. मात्र रात्र झाली तरी देखील तो घरी आला नाही.

शेजाऱ्यानेच केला घात, दहा वर्षांच्या मुलाचे अपहरण केले, 25 लाखांची मागणी केली, पुढे हत्या करुन...
Follow us on

शेजारी राहणाऱ्या व्यक्तीने घात केल्याचा प्रकार कल्याणजवळील अंबरनाथमध्ये घडला. 25 लाखांच्या खंडणीसाठी शेजारी राहणाऱ्या व्यक्तीनेच चिमुरड्याची हत्या केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आली आहे. ही घटना अंबरनाथ तालुक्यातील बदलापूर-कर्जत मार्गावर असलेल्या गोरेगावात घडली. याप्रकरणी कुळगाव ग्रामीण पोलीस काही तासांत आरोपींच्या मुसक्या आवळल्या. आरोपींवर अपहरण, खंडणी आणि हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आलाय. हे भयानक कृत्य करणाऱ्या दोन भावांसह त्यांच्या कुटूंबातील पाच जणांनी मिळून केले. सलमान मौलवी आणि त्याचा भाऊ सफूआन मौलवी अशी अटक केलेल्या दोन भावांची नावे आहेत. घराचं नव्यानं उभारणीचं काम सुरू असून घर बांधण्यासाठी पैशांची गरज असल्याने या दोन्ही आरोपीने 25 लाखांची खंडणी मागितली होती.

नमाजला गेला अन् आलाच नाही

मुदासिर बुबेरे राहणार वांगणी यांचा याच परिसरात टेलरिंगचा छोटासा व्यवसाय आहे. त्यांचा ९ वर्षीय मुलगा इबाद हा इयत्ता ४ थी शिकत आहे. रमजानचा महिना सुरु असल्याने इबाद हा नियमाप्रमाणे सायंकाळी नमाज अदा करण्यासाठी गेला होता. मात्र रात्र झाली तरी देखील तो घरी आला नाही. रात्रीचे ९ वाजून गेले तरी इबाद घरी आला नाही म्हणून त्याच्या घरच्यांनी मोहल्यात शोधाशोध सुरु झाली. या दरम्यान इबादच्या पालकांना एक निनावी फोन येऊन 25 लाखांच्या खंडणीची मागणी करण्यात आली.

पालकांनी गाठले पोलीस ठाणे

घाबरलेल्या इबादच्या पालकांनी याबाबत कुळगांव ग्रामीण पोलिसांना याबाबत माहिती दिली. यावर जिल्हा ग्रामीणचे पोलीस अधीक्षक डी.एस.स्वामी यांच्या नेतृत्वाखाली गेलेल्या पोलीस पथकाने गोरेगाव परिसरात रात्री उशीर पर्यंत तपास केला. यावेळी पोलिसांना शेजारी राहणाऱ्या कुटुंबियांच्या घरामागच्या बाजूला असलेल्या एका पोत्यात इबादचा मृतदेह आढळून आला.

हे सुद्धा वाचा

पोलिसांचा संशय खरा ठरला

अपहरण आणि हत्या प्रकरणाचा तपास करताना पोलिसांनी संशयित आरोपी म्हणून शेजारील घरातल्या काही लोकांना ताब्यात घेतले. त्यांची चौकशी केली. त्यांना पोलीस खाक्या दाखवल्या. त्यानंतर त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली. इबादचा मृतदेह शविच्छेदनासाठी जे.जे रुग्णालयात पाठवण्यात आला असल्याची माहिती दिली.