AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

2 तास 54 मिनिटाचा ब्लॉकबस्टर चित्रपट, बनवण्यासाठी लागली 7 वर्षे, आजही प्रेक्षक आवडीने बघतात

दहशतवाद आणि देशभक्तीवरील 2 तास 54 मिनिटाचा हा चित्रपट बनवण्यासाठी लागली होती 7 वर्षे. प्रदर्शित होताच ठरला होता ब्लॉकबस्टर, जिंकला होता नॅशनल अवॉर्ड.

2 तास 54 मिनिटाचा ब्लॉकबस्टर चित्रपट, बनवण्यासाठी लागली 7 वर्षे, आजही प्रेक्षक आवडीने बघतात
Image Credit source: Social media
| Updated on: Mar 19, 2026 | 2:59 PM
Share

बॉलिवूडमध्ये देशभक्ती आणि दहशतवाद या विषयांवर अनेक चित्रपट निर्माण झाले आहेत. काही चित्रपट बॉक्स ऑफिसवर अपयशी ठरले तर काहींनी प्रचंड यश मिळवत इतिहास घडवला. अशाच गाजलेल्या चित्रपटांपैकी एक म्हणजे 1999 साली प्रदर्शित झालेला ‘सरफरोश’ हा चित्रपट.

30 एप्रिल 1999 रोजी प्रदर्शित झालेल्या या चित्रपटात आमिर खान मुख्य भूमिकेत होता. या चित्रपटात सीमापार दहशतवाद आणि शस्त्रास्त्रांची तस्करी या गंभीर विषयांवर प्रकाश टाकण्यात आला होता. विशेष म्हणजे, त्या काळात पहिल्यांदाच चित्रपटात पाकिस्तान या शब्दाचा स्पष्ट उल्लेख करण्यात आला होता. चित्रपटाला राष्ट्रीय पुरस्काराचाही मान मिळाला होता.

कथानकानुसार, अजय सिंह राठोड (आमिर खान) हा आपल्या भावाच्या हत्येनंतर आणि वडिलांच्या जखमी झाल्यानंतर वैद्यकीय शिक्षण सोडून पोलिस अधिकारी बनतो. त्यानंतर तो सीमापार सुरू असलेल्या शस्त्रास्त्र तस्करीच्या रॅकेटचा पर्दाफाश करण्यासाठी झटतो. चित्रपटातील मोठा ट्विस्ट म्हणजे, लोकप्रिय पाकिस्तानी गझल गायक गुलफाम हसनच या तस्करीमागील मास्टरमाइंड असल्याचे उघड होते. ज्याला अजय आपला आदर्श मानत असतो.

चित्रपटाचे बजेट आणि कमाई

या चित्रपटात सोनाली बेंद्रे हिचीही महत्त्वाची भूमिका होती. सुमारे 15 कोटींच्या बजेटमध्ये तयार झालेल्या या चित्रपटाने जगभरात सुमारे 32 कोटी 42 लाख रुपयांची कमाई करत बॉक्स ऑफिसवर हिट ठरला. या चित्रपटाच्या निर्मितीसाठी जवळपास 7 वर्षांचा कालावधी लागला होता. दिग्दर्शक जॉन मॅथ्यू मॅथन यांनी या चित्रपटाचे दिग्दर्शन केले. आमिर खानने साकारलेला प्रामाणिक आणि धाडसी पोलिस अधिकाऱ्याचा रोल प्रेक्षकांना प्रचंड आवडला होता.

या चित्रपटातील गाणी आजही प्रेक्षकांच्या मनात घर करून आहेत. ‘जो हाल दिल का इधर हो रहा है…’ हे रोमँटिक गाणं आजही लोकप्रिय आहे. हे गाणं कुमार सानू आणि अलका याज्ञिक यांनी गायले आहे. हा चित्रपट केवळ मनोरंजनापुरता मर्यादित न राहता सामाजिक आणि राष्ट्रीय मुद्द्यांवर प्रभावी भाष्य करणारा ठरला आहे. आजही हा चित्रपट तितक्याच आवडीने पाहिला जातो.

Follow Us
पेट्रोल भरायला गेलात तर खिशात कॅश ठेवा! ...ह्या तारखेपासून UPI बंद
Mumbai Petrol Pump | पेट्रोल भरायला गेलात तर खिशात कॅश ठेवा! ...ह्या तारखेपासून UPI बंद करण्याचा पेट्रोल पंप चालकांचा इशारा
दुष्काळ आढावा बैठकीत अधिकारी मोबाईलमध्ये व्यस्त! कुणी WhatsApp, तर...
Akola : दुष्काळ आढावा बैठकीत अधिकारी मोबाईलमध्ये व्यस्त! कुणी WhatsApp, तर कुणी... प्रशासनाच्या संवेदनशीलतेवरच प्रश्नचिन्ह
दीड महिन्यांच्या प्रतीक्षेनंतर धाराशिवमध्ये पावसाची दमदार एन्ट्री!
Dharashiv Rain : दीड महिन्यांच्या प्रतीक्षेनंतर धाराशिवमध्ये पावसाची दमदार एन्ट्री! शेतकऱ्यांना दिलासा, मात्र...
धर्मवीर आनंद दिघेंची खास गाडी 25 वर्षांनी पुण्यात! गाडी पाहण्यासाठी...
Anand Dighe | धर्मवीर आनंद दिघेंची खास गाडी 25 वर्षांनी पुण्यात! गाडी पाहण्यासाठी शिवसैनिकांसह नागरिकांची मोठी गर्दी
माझी चाल कासवाची नाही, पण प्रेरणा... टीकाकारांच्या दगडफेकीवर
Devendra Fadnavis | माझी चाल कासवाची नाही, पण प्रेरणा... टीकाकारांच्या दगडफेकीवर फडणवीसांचा पलटवार
शेतकऱ्यांनी कोणताही वेगळा विचार करू नये, पीक नुकसानीवर...भरणेंची...
Dattatray Bharne : शेतकऱ्यांनी कोणताही वेगळा विचार करू नये, पीक नुकसानीवर... दत्तात्रय भरणेंची मोठी ग्वाही
हे अत्यंत संवेदनशील प्रकरण आहे, रोज बोलणं... दिशा सालियन प्रकरणावर...
Nitesh rane | हे अत्यंत संवेदनशील प्रकरण आहे, रोज बोलणं... दिशा सालियन प्रकरणावर नितेश राणेंचं ट्विट चर्चेत
PM मोदींची मिमिक्री करणाऱ्या पुलकित मणींचा नोएडा शो रद्द; आता...
PM मोदींची मिमिक्री करणाऱ्या पुलकित मणींचा नोएडा शो रद्द; आता अंडरग्राऊंड... म्हणत सोशल मीडियावर पोस्ट
7 एकर शेती करपली, पत्नीचं मंगळसूत्र गहाण ठेवून... पावसाने दगा दिल्याने
Sangali : 7 एकर शेती करपली, पत्नीचं मंगळसूत्र गहाण ठेवून... पावसाने दगा दिल्याने शेतकऱ्याच्या डोळ्यात अश्रू
राहुल गांधींनी आता... मोदींच्या मिमिक्रीवर फडणवीसांचा हल्लाबोल
Devendra Fadnavis : राहुल गांधींनी आता कॉमेडियन बनलं पाहिजे, मोदींच्या मिमिक्रीवर फडणवीसांचा जोरदार हल्लाबोल