AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मनोज जरांगे पाटील यांच्या टिकेवर चंद्रशेखर बावनकुळे यांची पहिली मोठी प्रतिक्रिया, म्हणाले, माझी..

मराठा समाजाचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी चंद्रशेखर बावनकुळे यांच्यावर जोरदार टीका केली. यावर आता बावनकुळे यांनीही मोठी प्रतिक्रिया दिली आहे.

मनोज जरांगे पाटील यांच्या टिकेवर चंद्रशेखर बावनकुळे यांची पहिली मोठी प्रतिक्रिया, म्हणाले, माझी..
Chandrashekhar Bawankule and Manoj Jarange Patil
| Updated on: Aug 06, 2026 | 1:18 PM
Share

मराठा समाजाचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी नुकताच भाजपा नेते चंद्रशेखर बावनकुळे यांच्यावर गंभीर आरोप केले. या आरोपांवर बोलताना चंद्रशेखर बावकुळे यांनी म्हटले की, माझी नार्को टेस्ट करता येईल. माझी परवानगी आहे. जे जात पडताळणी विभाग आहे, हा अर्ध न्यायिक आहे. त्यात हस्तक्षेप करता येत नाही. कोणताही मंत्री या ऑथोरिटीला फोन करू शकत नाही. जात पडताळणीचा जो काही निर्णय त्यात बावनकुळे किंवा इतर कोणी फोन करतात हे म्हणणं योग्य नाही. त्यांच्या न्यायिक अधिकारात कोणी जाऊ शकत नाही. कुणालाही हस्तक्षेप करण्याचा अधिकार नाही. जरांगे का बोलले माहीत नाही. जात पडताळणी समितीने जो निर्णय घेतला आहे, त्याला उच्च न्यायालयात जाता येतं. आमच्यावर अन्याय झाला असं वाटत असेल तर हायकोर्टात जाऊन अपील करा. स्टे आणू

पुढे बावनकुळे यांनी म्हटले की, ते काय बोलले याबद्दल चर्चा करायची नाही. जात पडताळणीच्या कोणत्याही अर्ध न्यायिक प्रक्रियेतील भाग आहे. जात पडताळणीवर कोणता मंत्री फोन करेल आणि त्यावर समिती ऐकेल असं होत नाही. कोणत्याही राज्यात होत नाही. त्यांना काही अन्याय झाला वाटत असेल तर ते कोर्टात जाऊन न्याय मागू शकतात.

प्रमाणपत्र का रद्द होत आहेत. हे समिती सांगू शकते. याचा डेटा वेबसाईटवर मिळू शकेल. कुणाकुणाची जात पडताळणी झाली हे पाहता येईल. समितीचे अधिकार अर्ध न्यायिक आहेत. त्यावर कुणाला बोलायचा अधिकार नाही. मंत्री फोन करू शकत नाही. कारण त्यांना तो अधिकार नाही. मनोज जरांगे पाटील यांनी केलेल्या आरोपांवर पहिली मोठी प्रतिक्रिया बानकुळे यांनी दिली.

मनोज जरांगे पाटील यांनी बावनकुळे यांच्यासोबतच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावरही गंभीर आरोप केले, एकनाथ शिंदे यांनी आपला डबल गेम केला म्हणताना मनोज जरांगे पाटील दिसले. देवेंद्र फडणवीस यांच्याबद्दलही काही आरोप जरांगे यांनी केला. जरांगे नक्की काय बोलले हे मी ऐकले नसल्याचेही बावनकुळे यांनी म्हटले.

Follow Us
पेट्रोल भरायला गेलात तर खिशात कॅश ठेवा! ...ह्या तारखेपासून UPI बंद
Mumbai Petrol Pump | पेट्रोल भरायला गेलात तर खिशात कॅश ठेवा! ...ह्या तारखेपासून UPI बंद करण्याचा पेट्रोल पंप चालकांचा इशारा
दुष्काळ आढावा बैठकीत अधिकारी मोबाईलमध्ये व्यस्त! कुणी WhatsApp, तर...
Akola : दुष्काळ आढावा बैठकीत अधिकारी मोबाईलमध्ये व्यस्त! कुणी WhatsApp, तर कुणी... प्रशासनाच्या संवेदनशीलतेवरच प्रश्नचिन्ह
दीड महिन्यांच्या प्रतीक्षेनंतर धाराशिवमध्ये पावसाची दमदार एन्ट्री!
Dharashiv Rain : दीड महिन्यांच्या प्रतीक्षेनंतर धाराशिवमध्ये पावसाची दमदार एन्ट्री! शेतकऱ्यांना दिलासा, मात्र...
धर्मवीर आनंद दिघेंची खास गाडी 25 वर्षांनी पुण्यात! गाडी पाहण्यासाठी...
Anand Dighe | धर्मवीर आनंद दिघेंची खास गाडी 25 वर्षांनी पुण्यात! गाडी पाहण्यासाठी शिवसैनिकांसह नागरिकांची मोठी गर्दी
माझी चाल कासवाची नाही, पण प्रेरणा... टीकाकारांच्या दगडफेकीवर
Devendra Fadnavis | माझी चाल कासवाची नाही, पण प्रेरणा... टीकाकारांच्या दगडफेकीवर फडणवीसांचा पलटवार
शेतकऱ्यांनी कोणताही वेगळा विचार करू नये, पीक नुकसानीवर...भरणेंची...
Dattatray Bharne : शेतकऱ्यांनी कोणताही वेगळा विचार करू नये, पीक नुकसानीवर... दत्तात्रय भरणेंची मोठी ग्वाही
हे अत्यंत संवेदनशील प्रकरण आहे, रोज बोलणं... दिशा सालियन प्रकरणावर...
Nitesh rane | हे अत्यंत संवेदनशील प्रकरण आहे, रोज बोलणं... दिशा सालियन प्रकरणावर नितेश राणेंचं ट्विट चर्चेत
PM मोदींची मिमिक्री करणाऱ्या पुलकित मणींचा नोएडा शो रद्द; आता...
PM मोदींची मिमिक्री करणाऱ्या पुलकित मणींचा नोएडा शो रद्द; आता अंडरग्राऊंड... म्हणत सोशल मीडियावर पोस्ट
7 एकर शेती करपली, पत्नीचं मंगळसूत्र गहाण ठेवून... पावसाने दगा दिल्याने
Sangali : 7 एकर शेती करपली, पत्नीचं मंगळसूत्र गहाण ठेवून... पावसाने दगा दिल्याने शेतकऱ्याच्या डोळ्यात अश्रू
राहुल गांधींनी आता... मोदींच्या मिमिक्रीवर फडणवीसांचा हल्लाबोल
Devendra Fadnavis : राहुल गांधींनी आता कॉमेडियन बनलं पाहिजे, मोदींच्या मिमिक्रीवर फडणवीसांचा जोरदार हल्लाबोल