AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

एकनाथ शिंदेंनी डबल गेम केला, उद्धव ठाकरे बरे म्हणण्याची वेळ आणू नका, मनोज जरांगे संतापले..

मनोज जरांगे पाटील यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर जोरदार टीका केली. हेच नाही तर कोण कट रचत असल्याचे त्यांनी सांगितले. शिंदेंनी विश्वास घात केल्याचाही दावा त्यांनी केला.

एकनाथ शिंदेंनी डबल गेम केला, उद्धव ठाकरे बरे म्हणण्याची वेळ आणू नका, मनोज जरांगे संतापले..
Manoj Jarange Patil
| Updated on: Aug 06, 2026 | 12:55 PM
Share

मराठा समाजाचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी सरकारवर गंभीर आरोप केले. मराठा समाजासाठी आंदोलन सुरू झाल्यापासूनच एकनाथ शिंदे यांच्यावर एकदाही टीका करताना मनोज जरांगे पाटील दिसले नाहीत. मात्र, आता पहिल्यांदाच त्यांनी मनोज जरांगे पाटील यांनी एकनाथ शिंदे यांच्यावर टीका केली. एकनाथ शिंदे डबल गेम करत असल्याचा गंभीर आरोप जरांगेंनी केला. भुमरेंसाठी मराठा समाजाच्या पोरांनी जीवाचे रान केले. आमच्या उपकारांची परतफेड करता का? भुमरे मामा तुम्ही सहा नंबरला होते…  तुम्ही इतक्या लवकर विसरलात का? सध्या तात्पुरते घ्या आणि नंतर रद्द करा असं बावनकुळे यांनी सांगितलं होतंय. देवेंद्र फडणवीस बोलत नाहीत, याचा अर्थ मुकसमंती आहे. संजय सिरसाठ यांनी का केलं असावं… हा कट एकनाथ शिंदे यांनीच केला, असाही गंभीर आरोप मनोज जरांगे पाटील यांनी केला.

पुढे मनोज जरांगे पाटील यांनी म्हटले की, उद्धव ठाकरे यांना बरा म्हणायची वेळ आली आहे.  तुमच्या गद्दारीचा डाग आम्ही पुसला. मीडियात जाहीर पणे सांगितलं होतो. जिल्हा परिषदेच्या उमेदवारासाठी आमच्या लेकराचं वाटोळं करत आहात का? यादरम्यानच मनोज जरांगे पाटील यांनी शिंदे साहेब मी तुमचे सर्व लोकं झोपून टाकीन… पाडून टाकीन, असा गंभीर इशाराच दिला.

पुढे मनोज जरांगे पाटील यांनी म्हटले की, मला एकनाथ शिंदे यांच्याकडून अपेक्षा नव्हती. किती दिवस डबल ढोलकी वाजवणार… मी मिंधा नाही, जेलमध्ये सुद्धा जायला घाबरणार नाही.. बावनकुळे फडणवीस यांचा मालक झाला का? म्हणत मनोज जरांगे पाटील संतापले. यावेळी त्यांनी गंभीर आरोप करत म्हटले की, शिंदे त्यांच्या नेत्यांचा कॉलेजमध्ये बैठका घेत आहेत.

पहिल्यांदाच एकनाथ शिंदे यांच्यावर इतकी गंभीर टीका करताना मनोज जरांगे पाटील दिसले. मी खूपच जास्त खुनशी आहे, एकदा जर डोक्यात गेला तर सोडणार नसल्याचेही त्यांनी म्हटले. एकनाथ शिंदे यांना वारंवार इशारा देताना मनोज जरांगे पाटील दिसले. मंत्रालयात बसून कुणबी प्रमाणपत्र रद्द केल्याचा आरोप मनोज जरांगेंनी केला.

Follow Us
पेट्रोल भरायला गेलात तर खिशात कॅश ठेवा! ...ह्या तारखेपासून UPI बंद
Mumbai Petrol Pump | पेट्रोल भरायला गेलात तर खिशात कॅश ठेवा! ...ह्या तारखेपासून UPI बंद करण्याचा पेट्रोल पंप चालकांचा इशारा
दुष्काळ आढावा बैठकीत अधिकारी मोबाईलमध्ये व्यस्त! कुणी WhatsApp, तर...
Akola : दुष्काळ आढावा बैठकीत अधिकारी मोबाईलमध्ये व्यस्त! कुणी WhatsApp, तर कुणी... प्रशासनाच्या संवेदनशीलतेवरच प्रश्नचिन्ह
दीड महिन्यांच्या प्रतीक्षेनंतर धाराशिवमध्ये पावसाची दमदार एन्ट्री!
Dharashiv Rain : दीड महिन्यांच्या प्रतीक्षेनंतर धाराशिवमध्ये पावसाची दमदार एन्ट्री! शेतकऱ्यांना दिलासा, मात्र...
धर्मवीर आनंद दिघेंची खास गाडी 25 वर्षांनी पुण्यात! गाडी पाहण्यासाठी...
Anand Dighe | धर्मवीर आनंद दिघेंची खास गाडी 25 वर्षांनी पुण्यात! गाडी पाहण्यासाठी शिवसैनिकांसह नागरिकांची मोठी गर्दी
माझी चाल कासवाची नाही, पण प्रेरणा... टीकाकारांच्या दगडफेकीवर
Devendra Fadnavis | माझी चाल कासवाची नाही, पण प्रेरणा... टीकाकारांच्या दगडफेकीवर फडणवीसांचा पलटवार
शेतकऱ्यांनी कोणताही वेगळा विचार करू नये, पीक नुकसानीवर...भरणेंची...
Dattatray Bharne : शेतकऱ्यांनी कोणताही वेगळा विचार करू नये, पीक नुकसानीवर... दत्तात्रय भरणेंची मोठी ग्वाही
हे अत्यंत संवेदनशील प्रकरण आहे, रोज बोलणं... दिशा सालियन प्रकरणावर...
Nitesh rane | हे अत्यंत संवेदनशील प्रकरण आहे, रोज बोलणं... दिशा सालियन प्रकरणावर नितेश राणेंचं ट्विट चर्चेत
PM मोदींची मिमिक्री करणाऱ्या पुलकित मणींचा नोएडा शो रद्द; आता...
PM मोदींची मिमिक्री करणाऱ्या पुलकित मणींचा नोएडा शो रद्द; आता अंडरग्राऊंड... म्हणत सोशल मीडियावर पोस्ट
7 एकर शेती करपली, पत्नीचं मंगळसूत्र गहाण ठेवून... पावसाने दगा दिल्याने
Sangali : 7 एकर शेती करपली, पत्नीचं मंगळसूत्र गहाण ठेवून... पावसाने दगा दिल्याने शेतकऱ्याच्या डोळ्यात अश्रू
राहुल गांधींनी आता... मोदींच्या मिमिक्रीवर फडणवीसांचा हल्लाबोल
Devendra Fadnavis : राहुल गांधींनी आता कॉमेडियन बनलं पाहिजे, मोदींच्या मिमिक्रीवर फडणवीसांचा जोरदार हल्लाबोल