AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

फडणवीस साहेब डोक्यातील हवा काढा, नाही तर राज्यात फिरणं मुश्किल होईल; मनोज जरांगे यांचा इशारा

manoj jarange politics : मनोज जरांगे पाटील यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनाही मोठा इशारा दिला आहे. कुणबी प्रमाणपत्र कुणाच्या आदेशाने झाले, असा सवाल देखील त्यांनी केला.

फडणवीस साहेब डोक्यातील हवा काढा, नाही तर राज्यात फिरणं मुश्किल होईल; मनोज जरांगे यांचा इशारा
| Updated on: Aug 06, 2026 | 1:23 PM
Share

मनोज जरांगे पाटील यांनी मराठा आरक्षणावरून पुन्हा आक्रमक भूमिका घेतली आहे. मराठा बांधवांना ओबीसीतून आरक्षणाची मागणी केल्यानंतर काहींना मिळालेलं कुणबी प्रमाणपत्र रद्द करण्यात आल्याचे समोर आलं आहे. मराठवाड्यात तब्बल 4 नगरसेवकांचं थेट जातप्रमाणपत्र रद्द करण्यात आल्याचे समोर आलं आहे. परंतु या निर्णयावरून मनोज जरांगे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासहित सत्ताधारी नेत्यांवर जोरदार टीकास्त्र डागलं आहे. आता देवेंद्र फडणवीस साहेब डोक्यातील हवा काढा, नाही तर राज्यात फिरण मुश्किल होईल, असा इशाराच मनोज जरांगे पाटलांनी मुख्यमंत्री फडणवीसांना इशारा दिलाय.

मनोज जरांगे यांनी अंतरवाली सराटीतून माध्यमाशी संवाद साधताना सत्ताधाऱ्यांवर जोरदार टीका केली. मनोज जरांगे पाटील म्हणाले, ‘प्रसाद लाड काय करेन. ते करतात मरमर. यांना वाटोळच करायचं ठरवलं आहे. उदय सामंत आणि लाड यांना तीनदा सांगून होत नाही. कारण त्यांचं ऐकत नाही. फडणवीस यांनी डोक्यातील हवा बाहेर काढा. एकदा आंदोलन सुरू झालं तर महाराष्ट्रात फिरणं मुश्किल होईल’.

‘तुमचे नेते आमच्या विरोधात भाषणं करत आहेत. बैठका घेत आहेत. त्यांना तुम्ही उपनेते करता. इतकं येडं करू नका. तुम्हाला आमचं एक मत मिळणार नाही. आशिष शेलार यांना मी काय होतंय हे सांगितलं. अतुल सावे त्यातच आहे हे मी सांगितलं. मी कुणाचंही नाव घेत नाही. छगन भुजबळ किंवा धनंजय मुंडेंचं नाव घेतलं का. घेतलं नाही. बाकीच्यांचं घेत आहे. बावनकुळेमुळे भाजपचं वाटोळं होईल. आम्हाला भोग भोगावे लागू देऊ नका, असा इशारा मनोज जरांगेंनी दिला.

वाटोळं करायचं बंद करा; जरांगेंचा सरकारला इशारा

मनोज जरांगे पाटील यांनी म्हटलं की, ‘मंत्री राधाकृष्ण विखेंना यातील काही माहीत नाही. बोगस कशाला काही माहीत नाही. आरक्षणाचा काही मेळ नाही. तुम्ही उपसमितीचे अध्यक्ष आहात. बावनकुळे करू शकतात, तुम्हीही करू शकतात. ५० टक्क्यावर आरक्षण गेलंय, ते बोगस नाही का. मराठ्यांपर्यंतच अक्कल चालवू नका. आपल्या घरचे आहेत म्हणून पायदळी तुडवू नका. १९९४मध्ये १६ टक्के आरक्षण दिलं ते बोगस आहे की नाही ते बघावं. खरंच पोटजाती ओबीसींच्या होत्या का हे बघा. मराठे आपले आहेत म्हणून त्यांचं वाटोळ करायचं बंद करा. ते पूर्वी चालत होतं’.

Follow Us
पेट्रोल भरायला गेलात तर खिशात कॅश ठेवा! ...ह्या तारखेपासून UPI बंद
Mumbai Petrol Pump | पेट्रोल भरायला गेलात तर खिशात कॅश ठेवा! ...ह्या तारखेपासून UPI बंद करण्याचा पेट्रोल पंप चालकांचा इशारा
दुष्काळ आढावा बैठकीत अधिकारी मोबाईलमध्ये व्यस्त! कुणी WhatsApp, तर...
Akola : दुष्काळ आढावा बैठकीत अधिकारी मोबाईलमध्ये व्यस्त! कुणी WhatsApp, तर कुणी... प्रशासनाच्या संवेदनशीलतेवरच प्रश्नचिन्ह
दीड महिन्यांच्या प्रतीक्षेनंतर धाराशिवमध्ये पावसाची दमदार एन्ट्री!
Dharashiv Rain : दीड महिन्यांच्या प्रतीक्षेनंतर धाराशिवमध्ये पावसाची दमदार एन्ट्री! शेतकऱ्यांना दिलासा, मात्र...
धर्मवीर आनंद दिघेंची खास गाडी 25 वर्षांनी पुण्यात! गाडी पाहण्यासाठी...
Anand Dighe | धर्मवीर आनंद दिघेंची खास गाडी 25 वर्षांनी पुण्यात! गाडी पाहण्यासाठी शिवसैनिकांसह नागरिकांची मोठी गर्दी
माझी चाल कासवाची नाही, पण प्रेरणा... टीकाकारांच्या दगडफेकीवर
Devendra Fadnavis | माझी चाल कासवाची नाही, पण प्रेरणा... टीकाकारांच्या दगडफेकीवर फडणवीसांचा पलटवार
शेतकऱ्यांनी कोणताही वेगळा विचार करू नये, पीक नुकसानीवर...भरणेंची...
Dattatray Bharne : शेतकऱ्यांनी कोणताही वेगळा विचार करू नये, पीक नुकसानीवर... दत्तात्रय भरणेंची मोठी ग्वाही
हे अत्यंत संवेदनशील प्रकरण आहे, रोज बोलणं... दिशा सालियन प्रकरणावर...
Nitesh rane | हे अत्यंत संवेदनशील प्रकरण आहे, रोज बोलणं... दिशा सालियन प्रकरणावर नितेश राणेंचं ट्विट चर्चेत
PM मोदींची मिमिक्री करणाऱ्या पुलकित मणींचा नोएडा शो रद्द; आता...
PM मोदींची मिमिक्री करणाऱ्या पुलकित मणींचा नोएडा शो रद्द; आता अंडरग्राऊंड... म्हणत सोशल मीडियावर पोस्ट
7 एकर शेती करपली, पत्नीचं मंगळसूत्र गहाण ठेवून... पावसाने दगा दिल्याने
Sangali : 7 एकर शेती करपली, पत्नीचं मंगळसूत्र गहाण ठेवून... पावसाने दगा दिल्याने शेतकऱ्याच्या डोळ्यात अश्रू
राहुल गांधींनी आता... मोदींच्या मिमिक्रीवर फडणवीसांचा हल्लाबोल
Devendra Fadnavis : राहुल गांधींनी आता कॉमेडियन बनलं पाहिजे, मोदींच्या मिमिक्रीवर फडणवीसांचा जोरदार हल्लाबोल