AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Nagpur Crime : ‘लॉकअप’मध्ये हवा पिझ्झा अन् मऊ गादी.. अल्पवयीन मुलीवरील अत्याचारप्रकरणातील आरोपीची नाटकं

नागपूरमध्ये अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार केल्याचा आरोप असलेल्या आरोपीने लॉकअपमध्ये व्हीआयपी सुविधांची मागणी केल्याने पोलीस चक्रावले. पिझ्झा, मऊ गादी आणि मॉस्किटो रिपेलंट त्याने मागितलं आहे.

Nagpur Crime : 'लॉकअप'मध्ये हवा पिझ्झा अन् मऊ गादी.. अल्पवयीन मुलीवरील अत्याचारप्रकरणातील आरोपीची नाटकं
आरोपीला लॉकअपमध्ये हावा पिझ्झा आणि मऊ गादी..
| Updated on: Aug 06, 2026 | 1:21 PM
Share

नागपूरमधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. अल्पवयीन मुलीचं कथित अपहरण आणि लैंगिक अत्याचार प्रकरणात 20 वर्षांच्या तरूणाला अटक करण्यात आली आहे. मात्र लॉकअपमध्येही त्याचा माज कमी झाला नसून त्याने VIP ट्रीटमेंटची मागणी केली आहे. खायला पिझ्या हवा, झोपायला उशी आणि मऊ गादी हवी, लॉकअपमध्ये डास चावतात, त्यामुळे मॉस्किटो रिपेलंटची मागणी देखील त्याने केली आहे. 20 वर्षांच्या बीबीएच्या या विद्यार्थ्याच्या वागणुकीमुळे पोलिसांसमोर नवा पेच निर्माण झाला आहे. लॉकअपमध्ये असताना, चौकशीत सहकार्य करण्याऐवजी आरोपीने लॉकअपमधील सुविधांबाबत तक्रारींचा पाऊस पाडला असून ‘व्हीआयपी’ दर्जाच्या सुविधांची मागणी सुरू केल्याने पोलिसही वैतगाले आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी तरूणाने त्या लॉकअपमधील अस्वच्छ भिंती, दुर्गंधीयुक्त शौचालय आणि डासांचा त्रास यावर आक्षेप नोंदवला आहे. त्याने पोलिसांच्या कस्टोडियल चौकशीला सहकार्य करण्यास नकार दिला आहे. पीडित मुलीकडून ताब्यात घेतलेला मोबाईल आणि स्वतःच्या मोबाईलचा पासवर्ड देण्यासही त्याने स्पष्ट नकार दिल्याचे पोलिसांनी सांगितले. त्यामुळे डिजिटल पुरावे गोळा करण्यात तपास यंत्रणेला अडचणी येत आहेत. एवढंच नव्हे तर आरोपीने सुरुवातीला वैद्यकीय तपासणी आणि उपचारांनाही विरोध केला होता. मात्र अखेर मंगळवारी पोलिसांनी त्याला वैद्यकीय तपासणीसाठी नेलं.

लॉकअपमध्ये सतत वाद, पीडितेलाच ठरवलं दोषी

पोलिसांच्या सांगण्यानुसार, आरोपी लॉकअपमध्ये अधिकाऱ्यांशी सतत वाद घालत असून, आपल्या कृत्यांसाठी, त्याने त्या अल्पवयीन पीडितेलाच जबाबदार ठरवण्याचा प्रयत्न केला आहे. चौकशीदरम्यान विचारलेल्या अनेक प्रश्नांचं नीट उत्तर दिलं नसून तो बोलण्यास टाळाटाळ करत असल्याचंही समोर आलं आहे.

न्यायालयात पोलिसांवर गंभीर आरोप

या आरोपीने मंगळवारी विशेष न्यायालयात पोलिसांविरोधात गंभीर आरोप केले.पोलिसांनी त्याच्या भाड्याच्या घरातून 70 हजार रुपये रोख रक्कम घेतली, त्याला मारहाण केली आणि त्याचे चष्मे व बूट परत दिले नाहीत, असा दावा त्याने केला आहे. मात्र दुसरीकडे पोलिसांनी हे आरोप फेटाळून लावले आहेत. स्वतःची बाजू मजबूत करण्यासाठी आरोपी स्वतःलाच इजा करून घेण्याचाही प्रयत्न करत आहे, असं पोलिसांनी सांगितलं.

चैनीच्या मागण्या पूर्ण होऊ शकत नाहीत

याप्रकरणी हुडकेश्वर पोलीस ठाण्याच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षक अनामिका मिर्झापुरे यांनी सांगितलं की, आरोपीला कायद्यानुसार आवश्यक त्या सर्व मूलभूत सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. मात्र एखाद्या आरोपीने मऊ गादी, विशेष जेवण किंवा इतर चैनीच्या सुविधा मागितल्या, तर त्या देणे शक्य नाही. आरोपी चौकशीत सातत्याने अडथळे निर्माण करत असून सहकार्य करण्यास नकार देत आहे. त्याचे समुपदेशन सुरू आहे, असं त्यांनी नमूद केलं.

दरम्यान, आरोपी स्वतःला इजा करून घेण्याचा प्रयत्न करू नये, यासाठी पोलिसांकडून त्याच्यावर 24 तास विशेष लक्ष ठेवण्यात येत असल्याची माहितीही समोर आली आहे.

Follow Us
पेट्रोल भरायला गेलात तर खिशात कॅश ठेवा! ...ह्या तारखेपासून UPI बंद
Mumbai Petrol Pump | पेट्रोल भरायला गेलात तर खिशात कॅश ठेवा! ...ह्या तारखेपासून UPI बंद करण्याचा पेट्रोल पंप चालकांचा इशारा
दुष्काळ आढावा बैठकीत अधिकारी मोबाईलमध्ये व्यस्त! कुणी WhatsApp, तर...
Akola : दुष्काळ आढावा बैठकीत अधिकारी मोबाईलमध्ये व्यस्त! कुणी WhatsApp, तर कुणी... प्रशासनाच्या संवेदनशीलतेवरच प्रश्नचिन्ह
दीड महिन्यांच्या प्रतीक्षेनंतर धाराशिवमध्ये पावसाची दमदार एन्ट्री!
Dharashiv Rain : दीड महिन्यांच्या प्रतीक्षेनंतर धाराशिवमध्ये पावसाची दमदार एन्ट्री! शेतकऱ्यांना दिलासा, मात्र...
धर्मवीर आनंद दिघेंची खास गाडी 25 वर्षांनी पुण्यात! गाडी पाहण्यासाठी...
Anand Dighe | धर्मवीर आनंद दिघेंची खास गाडी 25 वर्षांनी पुण्यात! गाडी पाहण्यासाठी शिवसैनिकांसह नागरिकांची मोठी गर्दी
माझी चाल कासवाची नाही, पण प्रेरणा... टीकाकारांच्या दगडफेकीवर
Devendra Fadnavis | माझी चाल कासवाची नाही, पण प्रेरणा... टीकाकारांच्या दगडफेकीवर फडणवीसांचा पलटवार
शेतकऱ्यांनी कोणताही वेगळा विचार करू नये, पीक नुकसानीवर...भरणेंची...
Dattatray Bharne : शेतकऱ्यांनी कोणताही वेगळा विचार करू नये, पीक नुकसानीवर... दत्तात्रय भरणेंची मोठी ग्वाही
हे अत्यंत संवेदनशील प्रकरण आहे, रोज बोलणं... दिशा सालियन प्रकरणावर...
Nitesh rane | हे अत्यंत संवेदनशील प्रकरण आहे, रोज बोलणं... दिशा सालियन प्रकरणावर नितेश राणेंचं ट्विट चर्चेत
PM मोदींची मिमिक्री करणाऱ्या पुलकित मणींचा नोएडा शो रद्द; आता...
PM मोदींची मिमिक्री करणाऱ्या पुलकित मणींचा नोएडा शो रद्द; आता अंडरग्राऊंड... म्हणत सोशल मीडियावर पोस्ट
7 एकर शेती करपली, पत्नीचं मंगळसूत्र गहाण ठेवून... पावसाने दगा दिल्याने
Sangali : 7 एकर शेती करपली, पत्नीचं मंगळसूत्र गहाण ठेवून... पावसाने दगा दिल्याने शेतकऱ्याच्या डोळ्यात अश्रू
राहुल गांधींनी आता... मोदींच्या मिमिक्रीवर फडणवीसांचा हल्लाबोल
Devendra Fadnavis : राहुल गांधींनी आता कॉमेडियन बनलं पाहिजे, मोदींच्या मिमिक्रीवर फडणवीसांचा जोरदार हल्लाबोल