AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

डॉक्टरच्या मुलाचं सरकारी अधिकाऱ्याच्या मुलीसोबत भयानक कांड, पोलीस रुमच्या आत घुसले त्यावेळी मुलीचे हात-पाय बांधलेले, मुलाच्या हातात बेल्ट होता आणि..

आरोपी ठाण्यातील एका प्रतिष्ठीत डॉक्टरचा मुलगा असून पीडित मुलगी नागपूरची आहे. तिचे वडिल वरिष्ठ सरकारी अधिकारी आहेत. आरोपीने इन्स्टाग्रामवरुन मुलीशी ओळख वाढवली होती.

डॉक्टरच्या मुलाचं सरकारी अधिकाऱ्याच्या मुलीसोबत भयानक कांड, पोलीस रुमच्या आत घुसले त्यावेळी मुलीचे हात-पाय बांधलेले, मुलाच्या हातात बेल्ट होता आणि..
Police Image Credit source: PTI
| Updated on: Aug 06, 2026 | 1:18 PM
Share

अल्पवयीन मुलीचं अपहरण करुन तिचं लैंगिक शोषण केल्याच्या प्रकरणात नागपूर पोलिसांनी बॅचलर ऑफ बिझनेस अॅडमिनिस्ट्रेशनच्या विद्यार्थ्याला अटक केली आहे. आरोपी ठाण्यातील एका प्रतिष्ठीत डॉक्टरचा मुलगा असून पीडित मुलगी नागपूरची आहे. तिचे वडिल वरिष्ठ सरकारी अधिकारी आहेत. आरोपीने इन्स्टाग्रामवरुन पीडित मुलीशी ओळख वाढवली होती. आरोपी ठाण्याला राहतो. त्याचे आई-वडिल प्रतिष्ठीत डॉक्टर असून तो आयपीएस ऑफिसरचा भाचा आहे. पीडित मुलीचे वडिल महसूल अधिकारी आहेत. इन्स्टाग्रामवरुन त्याने पीडित मुलीशी ओळख वाढवली. आकाश मेहरा नावाने त्याने एक फेक अकाऊंट बनवलं होतं. ते त्याचं खरं नाव नाहीय.

24 तासापासून पीडित मुलगी बेपत्ता होती. ती घरी आली नाही. तिचा फोनही स्विचऑफ येत होता. शेवटी आई-वडिलांनी नागपूर पोलिसात धाव घेतली. पोलिसांनी मुलीचे इन्स्टाग्रॅम चॅट तपासले. त्याआधारे त्यांना आरोपी ठाण्याचा असल्याचं समजलं. पोलीस आरोपीच्या ठाण्याच्या घरापर्यंत पोहोचले. त्यांनी मुलाच्या आईला त्याला फोन लावायला लावला. आरोपीने फोन उचलताच पोलिसांनाी लोकेशन ट्रेस केलं व दिघोरीच्या फ्लॅटवर पोहोचले. दक्षिण नागपूरमध्ये हा भाग येतो. पोलिसांनी रुमच्या आत प्रवेश केला, तेव्हा पीडित मुलीचे हात-पाय बांधलेले होते. आरोपीच्या हातात पट्टा होता. आरोपीने पीडित मुलीला नशेचं चॉकलेट खायला दिलं. तिला पूर्णपणे हतबल केलं. आरोपीने पीडितेला चाबकाने फोडून काढलं. चाकूने कट केल्यामुळे तिच्या शरीरातून रक्तस्त्राव सुरु होता. पीडितेच्या शरीरावर 20 पेक्षा जास्त जखमा होत्या तसेच दाताने चावल्याचे व्रण होते. पोलीस रुमच्या आत आले, त्यावेळी आरोपीने पीडितेच्या गळ्यावर चाकू रोखलेला.

लेदर बेल्ट आणि चाबकाने फटके मारले

ही क्रूरता करताना आरोपीने पीडितेचे व्हिडिओ बनवले व फोटो खेचून पीडितेला ब्लॅकमेल केलं. आरोपीने इन्स्टाग्राम, ऑनलाइन गेमिंग APP च्या माध्यमातून पीडितेशी ओळख केली. त्याने दिघोरीमध्ये फ्लॅट बुक केला. पीडितेला त्याने तिथे बोलवलं होतं. तिची फसवूक करुन तिला नशा असलेलं चॉकलेट खायला दिलं. त्यामुळे तिच्यासोबत जे चुकीचं होतय, त्याला प्रतिकार करु शकली नाही. त्याने पीडितेचा बंधक बनवून लेदर बेल्ट आणि चाबकाने फटके मारले. पीडितेला असह्य वेदना दिल्या.

नायलॉनची रश्शी जप्त

पोलिसांनी घटनास्थळावरुन तीन चाकू, बेड्या, नायलॉनची रश्शी, स्प्रे, नशेच्या गोळ्या, एअर पंप आणि हवा भरलेली गादी जप्त केली. या उपकरणाच्या सहाय्याने तिने पीडितेला त्रास दिला. पीडित मुलीला आयसीयूमध्ये दाखल करण्यात आलं आहे.

Follow Us
कुणबी प्रमाणपत्रावरून जरांगे पाटील आक्रमक; फडणवीस-बावनकुळेंवर आरोप
कुणबी प्रमाणपत्रावरून जरांगे पाटील आक्रमक; फडणवीस-बावनकुळेंवर गंभीर आरोप
कोणाच्या दबावाखाली प्रमाणपत्र दिलं? जरांगे-सरकारवर काँग्रेसचा हल्ला
Vijay Wadettiwar | कोणाच्या दबावाखाली प्रमाणपत्र दिलं? जरांगे-सरकारवर काँग्रेस नेत्यांचा जोरदार हल्ला
अमित शाह उत्तर द्या च्या घोषणांनी संसद परिसर दणाणलं
Delhi | अमित शाह उत्तर द्या च्या घोषणांनी संसद परिसर दणाणलं; पुन्हा कामकाज स्थगित
अरे, तुम्ही मला पाणीच... धनंजय मुंडेंचा तो व्हिडीओ व्हायरल
अरे, तुम्ही मला पाणीच... सुनेत्रा पवारांच्या उपस्थित पत्रकारांना अडवण्यापूर्वीचा मुंडेंचा व्हिडीओ तुफान व्हायरल
सुप्रीम कोर्टात मोठी सुनावणी; धनुष्यबाणावर कोणाचा हक्क? आज होणार फैसला
Shiv Sena Supreme Court Hearing | सुप्रीम कोर्टात मोठी सुनावणी; धनुष्यबाणावर कोणाचा हक्क? आज होणार फैसला
बांग्लादेश कट्टरपंथ्यांच्या ताब्यात; शेख हसीनांचा गंभीर आरोप
Sheikh Hasina | बांग्लादेश कट्टरपंथ्यांच्या ताब्यात; शेख हसीनांचा गंभीर आरोप, डिसेंबरमध्ये पुनरागमनाची घोषणा!
मोठी बातमी! रणनीतीकार प्रशांत किशोर थेट सुनेत्रा पवारांच्या भेटीला,
मोठी बातमी! रणनीतीकार प्रशांत किशोर थेट सुनेत्रा पवारांच्या भेटीला, बैठकीत... महाराष्ट्राच्या राजकारणातील हालचाली वाढल्या
कुणबी प्रमाणपत्र अवैध ठरलेल्या लोकप्रतिनिधींची बैठक; मनोज जरांगे पाटील
कुणबी प्रमाणपत्र अवैध ठरलेल्या लोकप्रतिनिधींची बैठक; मनोज जरांगे पाटील यांचा मोठा निर्णय
संविधानाशी द्रोह करणाऱ्यांचा शेवट कायद्यानेच होईल; सुनावणीनंतर...
Sanjay Raut On Shivsena Hearing | आम्ही निश्चिंत आहोत...संविधानाशी द्रोह करणाऱ्यांचा शेवट कायद्यानेच होईल; सुनावणीनंतर संजय राऊतांचा इशारा!
...अन् ते थेट कोर्टाच्या रेकॉर्डवर आलं.’ राऊतांनी सांगितली कोर्टातील म
Sanjay Raut | ...अन् ते थेट कोर्टाच्या रेकॉर्डवर आलं.’ राऊतांनी सांगितली कोर्टातील महत्त्वाची बाब