Anil Gote : पळून गेलेल्या बंडखोर आमदारांवर कोट्यवधी रुपये कोण उधळतंय? अनिल गोटेंचा सवाल; फडणवीसांवर टीका करत म्हणाले, कारस्थानी

राज्याच्या अनेक भागांत पेरण्या झालेल्या नाहीत. काही ठिकाणी दुबार पेरणीचे संकट आले आहे. खत उपलब्ध नाही. याकडे कोणाचेही लक्ष नाही. दुसरीकडे अशाप्रकारची पैशांची उधळपट्टी होत आहे. हा पैसा नेमका कुठून आला, याचा तर हिशोब लावायचा आहे, असे अनिल गोटे म्हणाले.

Anil Gote : पळून गेलेल्या बंडखोर आमदारांवर कोट्यवधी रुपये कोण उधळतंय? अनिल गोटेंचा सवाल; फडणवीसांवर टीका करत म्हणाले, कारस्थानी
अनिल गोटे
Image Credit source: tv9
| Updated on: Jun 29, 2022 | 6:09 PM

मुंबई : एकनाथ शिंदे (Eknath Shinde) आणि इतर पळून गेलेल्या बंडखोर आमदारांवर कोट्यवधी रुपये खर्च होत आहेत. या आमदारांचा गुवाहाटीतील खर्च कोण करत आहे, असा सवाल माजी आमदार अनिल गोटे यांनी केला आहे. ते मुंबईत बोलत होते. या विषयी राज्यपाल भगतसिंग कोश्यारी (Bhagatsingh Koshyari) यांना पत्र लिहिले आहे. स्वत: त्यांच्या कार्यालयात जाऊन तक्रार देऊन आलेलो आहे. त्याची एक प्रत माझ्याकडे आहे. राज्यपाल यांच्यासह सीबीआय, ईडी, इन्कम टॅक्स, अॅन्टी करप्शन या संस्थांकडेही तक्रार केल्याचे अनिल गोटे (Anil Gote) यांनी सांगितले आहे. कोट्यवधी रुपयांची उधळपट्टी सुरू असल्याचा घणाघात गोटे यांनी बंडखोरांवर केला आहे. एखाद्याकडे दहा-पाच लाख सापडले की त्याच्यावर कारवाई होते. मात्र यांच्यावर काहीच होत नाही, असा आरोप त्यांनी केला.

‘एक खाणारे जाऊन दुसरे येणार’

हे सरकार गेले आणि ते सरकार आले तर सर्वसामान्य नागरिकांवर काहीही फरक पडणार नाही. उलट एक खाणारे जाऊन दुसरे खाणारे आले, एवढाच काय तो फरक असेल, असे ते म्हणाले. या माणसांवर एवढा खर्च कसा? सहा फ्लाइट. दोन माणसांसाठी विशेष विमान. हा सर्व खर्च करत आहे कोण, असा सवाल त्यांनी केला. भाजपाचे नेते देवेंद्र फडणवीस अत्यंत कपटी, लबाड आणि कारस्थानी आहेत. त्यांचेच हे कारस्थान आहे. हा लोकशाहीचा खेळ देशाला घातक आहे.

‘खुलेआम नंगानाच सुरू’

राज्याच्या अनेक भागांत पेरण्या झालेल्या नाहीत. काही ठिकाणी दुबार पेरणीचे संकट आले आहे. खत उपलब्ध नाही. याकडे कोणाचेही लक्ष नाही. दुसरीकडे अशाप्रकारची पैशांची उधळपट्टी होत आहे. हा पैसा नेमका कुठून आला, याचा तर हिशोब लावायचा आहे, असे अनिल गोटे म्हणाले. महाराष्ट्रात जो काही राजकीय तमाशा सुरू आहे, खुलेआम नंगानाच सुरू आहे. त्याला न्यायालयाने रोख, लगाम लावायला हवा, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली आहे. तर राज्यपालांवर कोणतीही टिप्पणी करण्यास त्यांनी नकार दिला.

काय म्हणाले अनिल गोटे?