AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Eknath Shinde: ज्या ज्या माणसाला शरद पवारानं जवळ घेतलं त्या त्या माणसाला काखेत दाबून मारुन टाकलं, शहाजी बापूचं वक्तव्य, विलासराव हुशार म्हणून पळून गेले

आमदार शहाजी बापू पाटील त्यापुढे जाऊन त्याचा दिवसाचा किस्सा सांगताना त्यामध्ये शरद पवारांनी बंड कसं केलं ते सांगताना म्हणतात की, आणि दीड वाजता तिथंच बातमी आली. की शरद पवारनं बंड केलं, 40 आमदार घेऊन पळून गेलं, आणि वसंतदादांनी राजीनामा दिला.

Eknath Shinde: ज्या ज्या माणसाला शरद पवारानं जवळ घेतलं त्या त्या माणसाला काखेत दाबून मारुन टाकलं, शहाजी बापूचं वक्तव्य, विलासराव हुशार म्हणून पळून गेले
शरद पवारांना जवळ केला की, आपण मेलो असं वक्तव्य शहाजी बापू पाटलांनी केले आहे.Image Credit source: tv9 marathi
| Edited By: | Updated on: Jun 29, 2022 | 5:15 PM
Share

मुंबईः राज्यातील विधान सभेच्या निवडणुका झाल्या आणि निकालानंतर (Vidhansabha Result 2022) शिवसेनेच्या ज्या-ज्या आमदारांनी बंड केले. त्या त्या बंडखोर आमदारांनी गुवाहाटी दौऱ्यावर गेल्यापासून राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्यावर टीका करण्याची एकही संधीही त्यांनी सोडली नाही. बडखोरीच्या नाट्यात शहाजी बापू पाटलांच्या व्हिडीओंनी तर सोशल मीडियावर धुमाकूळ घातला. त्यामुळे शहाजी बापू पाटील आमदार असले तर सोशल मीडियावरही सेलिब्रेटी झाले. त्यानंतर शहाजी पाटील गुवाहाटीत (Rebel MLA Shahaji Bapu Patil) काय करतील त्याची चर्चा सुरू झाली. आताही एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे.

त्यामध्ये समोर बंडखोर आमदार आणि त्यांच्या समोर उभा राहून शहाजी बापू पाटील शरद पवार यांचे राजकारणातील किस्से आणि आठवणी सांगत आहेत. त्यांच्या शेजारी बंडखोर आमदारांचे हेडमास्टर एकनाथ शिंदे या सगळ्याचा ते मनमुराद आनंद घेत आहेत, आणि त्यामध्ये शेवटी शहाजी बापू पाटील आपल्या सोलापूरी भाषेत सांगतात की, बाकी काय बी निर्णय घ्या, त्याला जवळ करायचं नाय, नायतर मेलो आपण त्यावर सगळे बंडखोरांचा हश्या पिकतो.

…असं शरद पवार म्हटलं

या व्हिडीओमध्ये बंडखोर आमदार सांगत आहेत की, वसंतदादा पाटील हे माझे वडील आहेत, त्यांच्या आशिर्वादाने मी आज मोठा झालेलो आहे. आणि मी वसंतदादा पाटलांना कधीही दगा देणार नाही असं शरद पवार म्हटलं आहे असं ते शहाजी पाटील सांगत आहेत.

 शरद पवारांनी बंड कसं केलं

आमदार शहाजी बापू पाटील त्यापुढे जाऊन त्याचा दिवसाचा किस्सा सांगताना त्यामध्ये शरद पवारांनी बंड कसं केलं ते सांगताना म्हणतात की, आणि दीड वाजता तिथंच बातमी आली. की शरद पवारनं बंड केलं, 40 आमदार घेऊन पळून गेलं, आणि वसंतदादांनी राजीनामा दिला.

गणपतराव कशाला काढताय…?

वसंतदादा पाटलांची ही आठवण सांगताना ते आपलीही आठवण सांगत आहेत. त्यामध्ये ते म्हणतात की, माझा तर अनुभव लय जोरात आहे. भेटलो की, कसं चाललंय तुझं, बरं चाललंय? काय म्हणतो, गणपतराव…मी तुम्हाला भेटायलोय, ते गणपतराव कशाला काढताय…? असंही शहाजी बापू पाटील सांगतात

ज्या ज्या माणसाला शरद पवारानं जवळ घेतलं

ज्या ज्या माणसाला शरद पवारानं जवळ घेतलं, त्या त्या माणसाला काखेत दाबून मारुन टाकलं. हा किस्सा सांगितल्यावर बंडखोर आमदारांमधूनही हश्या येतो. आमदार शहाजी पाटील यांनी वसंतदादा पाटील यांच्या राजकारणाची आठवण करून देताना त्यांनी शरद पवारांना कशी साथ दिली हे आवर्जून त्यामध्ये सांगतात पण त्यानंतर वसंतदादाना आणि इतर राजकीय नेत्यांना शरद पवारांनी कसा धोका दिला हेही त्यांनी त्यामध्ये सांगितले आहे.

इथून पुढे शरद पवार यांच्यासोबत रहा

ती आठवण सांगताना त्यांनी सांगितले की, वसंतदादा पाटलानी आमराईला सभा घेतली, महाराष्ट्रातील सगळ्या कार्यकर्त्यांना बोलवून सांगितले, इथून पुढे शरद पवार यांच्यासोबत रहा. पण त्यानंतर झालेल्या राजकारणात ते म्हणतात, कुठं आहे वसंतदादाचं घर, कुठं आहे श्रीपतराव गोंधळ्याचं घर, कुठं आहे प्रतापराव भोसल्याचं घर, कुठंय कल्लप्पाण्णा आवाडेंचं घर, कुठंय नामदेवराव जगतापाचं सोलापुरातील घरं असा सवाल करत त्यांनी विलासराव आणि सुशिलकुमार शिंदे, हुशार म्हणून पळून गेली. नाही तर यांनापण चुरा करुन टाकला असता अशी टीकापण त्यांनी यावेळी केली आहे त्यांच्यावर.

त्यांच्या नादाला साहेब लावू नका

शहाजी पाटील या सगळ्या आठवणी सांगताना म्हणतात की, उद्धव ठाकरे यांना उद्देश्यून म्हणत आहेत की, त्यांच्या नादाला साहेब लावू नका, बाकी काय बी निर्णय घ्या, त्याला जवळ करायचं नाय, नायतर मेलो आपण.  बंडखोरीनंतर एकनाथ शिंदे यांच्यापेक्षाही शहाजी बापू पाटील यांच्या प्रत्येक वक्तव्याची दखल माध्यमांनी घेतली आहे. शहाजी पाटील या व्हिडीओमध्ये जे सांगत आहेत, त्याची मात्र आता जोरदार चर्चा होऊ लागली आहे.

ठाकरे बंधू-पवारांच्या NCPचा फॉर्म्युला ठरला! कोण किती जागांवर लढणार?
ठाकरे बंधू-पवारांच्या NCPचा फॉर्म्युला ठरला! कोण किती जागांवर लढणार?.
संभाजीनगरात युती फिस्कटली,जागावाटपावरून शिवसेना-भाजपमध्ये तीव्र मतभेद
संभाजीनगरात युती फिस्कटली,जागावाटपावरून शिवसेना-भाजपमध्ये तीव्र मतभेद.
ठाणे काँग्रेस कार्यालयात AB फॉर्म वाटपादरम्यान धक्काबुक्की अन् शिवीगाळ
ठाणे काँग्रेस कार्यालयात AB फॉर्म वाटपादरम्यान धक्काबुक्की अन् शिवीगाळ.
मुंबईत शिवसेना-भाजपच्या जागावाटपाचा आकडा फिक्स; किती जागांवर लढणार?
मुंबईत शिवसेना-भाजपच्या जागावाटपाचा आकडा फिक्स; किती जागांवर लढणार?.
बेस्ट बसच्या धडकेत चौघांचा मृत्यू, 9 जखमी; भांडुपमध्ये घडलं काय?
बेस्ट बसच्या धडकेत चौघांचा मृत्यू, 9 जखमी; भांडुपमध्ये घडलं काय?.
वरळीत नाराजीनाट्य,आदित्य ठाकरेंच्या मतदारसंघात उद्धव ठाकरेंची मध्यस्थी
वरळीत नाराजीनाट्य,आदित्य ठाकरेंच्या मतदारसंघात उद्धव ठाकरेंची मध्यस्थी.
नागपूरमध्ये शिवसेनेचे नेते नाराज अन् थेट गडकरींच्या भेटीला, कारण काय?
नागपूरमध्ये शिवसेनेचे नेते नाराज अन् थेट गडकरींच्या भेटीला, कारण काय?.
मनसे मुंबई पालिका निवडणूक 52 जागांवर लढवणार, उमेदवार ठरले!
मनसे मुंबई पालिका निवडणूक 52 जागांवर लढवणार, उमेदवार ठरले!.
कुलाब्यातून नार्वेकरांचे 3 नातेवाईक बीएमसी निवडणुकीच्या रिंगणात
कुलाब्यातून नार्वेकरांचे 3 नातेवाईक बीएमसी निवडणुकीच्या रिंगणात.
नाशकात शिंदेंची सेना अन दादांची NCP एकत्र, भाजप स्वबळावर निवडणूक लढणार
नाशकात शिंदेंची सेना अन दादांची NCP एकत्र, भाजप स्वबळावर निवडणूक लढणार.