AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

LPG Cylinder: खबरदार! गॅस सिलिंडरचा अवैध साठा आणि काळा बाजार केलं तर थेट तुरुंगवारी, राज्य सरकारचा नवीन आदेश वाचला का?

LPG Cylinder Illegal Storage And Black Marketing: राज्यात गॅस सिलेंडरची कृत्रिम टंचाई तर केली जात नाही ना, याची खबरदारी सरकार घेत आहे. गॅस सिलेंडरचा तुटवडा जाणवत असल्याने गॅस एजन्सीबाहेर ग्राहकांच्या लांबच लांब रांगा लागल्या आहेत. आता सरकारने कडक पावलं टाकली आहेत.

LPG Cylinder: खबरदार! गॅस सिलिंडरचा अवैध साठा आणि काळा बाजार केलं तर थेट तुरुंगवारी, राज्य सरकारचा नवीन आदेश वाचला का?
एलपीजी गॅस सिलेंडरचा काळाबाजार केल्यास तुरुंगवारी Image Credit source: गुगल
| Edited By: | Updated on: Mar 11, 2026 | 1:26 PM
Share

LPG Cylinder Illegal Storage And Black Marketing: गॅस सिलिंडरचा अवैध साठा आणि ब्लॅक मार्केटिंग केलं तर थेट गुन्हा दाखल होणार आहे. नागपूरचे जिल्हाधिकारी आणि मनपा आयुक्त डॅा. विपीन ईटनकर यांनी साठेबाजांना हा इशारा दिला आहे. नागपूर पोलीस आणि जिल्हाधिकारी कार्यालयांचे भरारी पथकं धाडसत्र राबवणार आहे. सध्या नागपूरात गॅस सिलिंडरचा कुठलाही तुटवडा नाही, अशी माहिती त्यांनी दिली. काही लोक भितीने गॅस सिलिंडरचा साठा करुन ठेवत आहेत. आम्ही पोलीस विभाग, अन्न वितरण विभागाची बैठक घेतली आहे. वेगवेगळ्या टीम नागपूर जिल्ह्यात धाडसत्र सुरु करणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

अन्न पुरवठा विभागाची छापेमारी

गॅस सिलिंडरचा काळाबाजार थांबवण्यासाठी नागपूरमधील अन्न पुरवठा विभागाने छापेमारी सुरू केली आहे. गॅस एजन्सी आणि गोडाऊनवर अन्न आणि वितरण विभागाकडून छापेमारी करण्यात येत आहे. गॅस पुरवठा-समतोल वितरण नियंत्रणासाठी जीवनावश्यक वस्तू कायदा लागू करण्यात आला आहे. याच पार्श्वभुमीवर नागपूरात अधिकार्‍यांच्या पथकाची धाडसी कारवाई समोर येत आहे. गॅस सिलिंडरचा अवैध साठा तपासण्यासाठी नागपूर अन्न पुरवठा विभागाकडून छापेमारी सुरू आहे. मध्य पुर्वेत युद्धामुळे नागपूरात व्यावसायिक गॅस सिलिंडरचा तुटवडा जाणवत असल्याने काळाबाजार करणाऱ्यांवर थेट गुन्हा दाखल होणार असल्याचा इशारा पुरवठा विभागाचे परिमंडळ अधिकारी विनोद वाघदे आणि सागर बावरे यांनी दिला.

गॅसचा पुरेसा साठा, नागरिकांना मोठे आवाहन

जिल्ह्यातील गॅस पुरवठा बाबत काय परिस्थिती आहे याची माहिती जिल्हा पुरवठा अधिकारी प्रवीण फुलारी यांनी दिली आहे. घरगुती गॅस वापराचा साठा आपल्याकडे पुरेसा उपलब्ध आहे. घरगुती गॅससाठी कुठल्याही नागरिकांनी चिंता करण्याची आवश्यकता नाही. कमर्शियल आणि इंडस्ट्रियल गॅस वरूनच बंद असल्यामुळे ते आपल्या स्तरावर नाही. आपलं सगळं लक्ष घरगुती गॅस मिळणाऱ्या नागरिकांवर आहे. आपल्या जिल्ह्यात साधारणपणे दररोज तीन कंपनीच्या माध्यमातून 20 हजार 130 गॅस सिलेंडरची विक्री होते. एजन्सीच जिल्ह्यात कार्यरत आहेत. जवळपास दोन दिवसाचा सिलेंडरचा स्टॉक आपल्याकडे उपलब्ध आहे, अशी माहिती फुलारी यांनी दिली.

रिप्लिंग प्लांट आपल्याकडे HPCL कंपनीचा आहे तिथे दररोज 150 टन घरगुती गॅस येत असतो आणि तिथे रिप्लिंग होत असतो, त्यामुळे साठा पुरेसा पाच – सहा दिवसाचा आहे. IOC, BPCL आणि HPCL या तिन्ही कंपनीकडे पाच ते सहा दिवसाचा स्टॉक उपलब्ध असल्यामुळे नाशिक डेपो मधून जो पुरवठा होतो गॅसचा तो व्यवस्थितपणे चालू आहे. त्यामुळे कुठल्याही नागरिकांनी घाबरून जाण्याची आवश्यकता नाही. आता बुकिंग 5 दिवसाचे केल्यामुळे 25 दिवसानंतरच नागरिकांनी आता गॅसची बुकिंग करावी जेणेकरून गॅस एजन्सीवर गर्दी होणार नाही. कुठे साठेबाजी होत असेल काळ्या बाजारात गॅसची विक्री होत असेल तर नागरिकांनी तक्रार करावी त्यावर योग्य ती कारवाई करू, असे आश्वासन फुलारी यांनी दिले.

विशेष पथकाची नेमणूक केले आहे का?

तालुकास्तरावर सुद्धा पथक आहे आणि जिल्हास्तरावर सुद्धा पथक आहेत, एजन्सीच्या तपासण्या करण्यासाठी आम्ही निर्देश दिले आहेत.लेखीमध्ये अजून कोणत्याही तक्रार प्राप्त झाली नाही फोनवर तक्रारी होत्या आम्ही त्याचवेळी त्या निरसन केल्या आहेत. नागरिकांना असं वाटतं की भविष्यात याचा गॅसचा तुटवडा होईल त्यामुळे घाबरून जाऊन लोक गर्दी करत आहेत. मागच्या महिन्यातला आपण आवरेज बघितलं तर दिवसाकडे 700 ते 1000 सिलेंडरची विक्री होती आता जवळपास दररोज दोन हजार सिलेंडरची विक्री झाली याचा अर्थ नागरिक थोडेसे पॅनिक झाले आहेत. जिल्हा प्रशासन खबरदारी घेत आहे त्यांनी तिन्ही कंपन्यांसोबत आमचा टायप आहे, अशी माहिती फुलारी यांनी दिली.

इंडस्ट्रियल गॅसविषयी सूचना नाही

सध्या तरी त्यांना काही दिलासा नाही, तीन कंपन्यांच्या उच्चस्तरीय लोकांची कमिटी स्थापन झाली आहे पूर्णपणे घरगुती गॅसवरच त्यांनी कळवले आहे. इंडस्ट्रीयल गॅसविषयी काही सूचना नसल्याचे त्यांनी कळवले. आम्ही आमच्या पथकाला निर्देश दिले आहेत की जर घरगुती गॅसचा हॉटेलमध्ये वापर होत असेल तर त्यावर लक्ष ठेवून कारवाई करावी. घरगुती गॅसचा वापर इतर कुठे होणार नाही याची दक्षता घेतली जाणार आहे असे पुरवठा अधिकाऱ्यांनी सांगितले.

तालुकास्तरीय भरारी पथकाची नजर

अमेरिका आणि इराण मध्ये सध्या युद्ध परिस्थिती सुरू आहे.याच पार्श्वभूमीवरती सिंधुदुर्ग प्रशासन देखील अलर्ट मोडवर आलेले आहे. घरगुती एलपीजी गॅसचा अवैध वापर आणि गॅसचा काळाबाजार रोखण्यासाठी जिल्ह्यात तालुकास्तरीय भरारी दक्षता पथक स्थापन करण्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले आहेत. सध्या जागतिक परिस्थितीचा विचार करता इंधनाबाबत तुटवडा निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही. या परिस्थितीमध्ये गॅस इंधनाचे दर वाढण्याची, घरगुती गॅसचा अवैध वापर, काळाबाजार होण्याची शक्यता नाकारता येत नाही. जिल्ह्यामध्ये पथक तैनात केले आहेत.या पथकांमार्फत घरगुती गॅसचे सुरक्षित वितरण होत आहे का याची तपासणी करण्यात येणार आहे. तसेच गॅसचा अवैध वापर, काळाबाजार रोखणे, गॅस वाहतूक गाडी अडविणे आणि प्राप्त तक्रारींची चौकशी करणे अशी जबाबदारी या पथकावर सोपविण्यात आली आहे.

Follow Us
राज ठाकरे अ‍ॅक्शन मोडमध्ये, पदाधिकाऱ्यांची बोलावली तातडीने बैठक
राज ठाकरे अ‍ॅक्शन मोडमध्ये, पदाधिकाऱ्यांची बोलावली तातडीने बैठक.
पिस्ता, काजू, खजूर खाणं आवाक्या बाहेर... युद्धामुळे महागाई वाढली
पिस्ता, काजू, खजूर खाणं आवाक्या बाहेर... युद्धामुळे महागाई वाढली.
रिलायन्स इंडस्ट्रीची अमेरिकेत गुंतवणूक, संजय राऊत यांचा हल्लाबोल
रिलायन्स इंडस्ट्रीची अमेरिकेत गुंतवणूक, संजय राऊत यांचा हल्लाबोल.
व्यावसायिक गॅस सिलेंडरचा तुटवडा; हॉटेल व्यवसाय आणि उद्योग अडचणीत
व्यावसायिक गॅस सिलेंडरचा तुटवडा; हॉटेल व्यवसाय आणि उद्योग अडचणीत.
मिठी नदीच्या नाल्यातून गॅस निर्मितीचा प्रकल्प उभारा, उद्घाटनाला...
मिठी नदीच्या नाल्यातून गॅस निर्मितीचा प्रकल्प उभारा, उद्घाटनाला....
मध्यपूर्वेतील युद्धाचा इंधन पुरवठ्यावर परिणाम; ESMA कायदा लागू
मध्यपूर्वेतील युद्धाचा इंधन पुरवठ्यावर परिणाम; ESMA कायदा लागू.
ठाकरेंना विधानपरिषद हवी असेल तर...नरेश म्हस्केंच्या त्या विधानाने...
ठाकरेंना विधानपरिषद हवी असेल तर...नरेश म्हस्केंच्या त्या विधानाने....
महाराष्ट्राचे नवे राज्यपाल जिष्णू देव वर्मा यांचा शपथविधी
महाराष्ट्राचे नवे राज्यपाल जिष्णू देव वर्मा यांचा शपथविधी.
आखाती युद्धाचा भारतावर परिणाम; देशात ESMA कायदा लागू
आखाती युद्धाचा भारतावर परिणाम; देशात ESMA कायदा लागू.
मुंबईनंतर आता ठाण्यातही इलेक्ट्रिक डबल डेकर बस धावणार
मुंबईनंतर आता ठाण्यातही इलेक्ट्रिक डबल डेकर बस धावणार.