AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

LPG Cylinder: राज्यात ग्राहक ‘गॅस’वर, सिलेंडरसाठी भर उन्हात लांबच लांब रांगा, मायबाप सरकारला दया येईल का?

LPG Cylinder Que in Maharashtra: आखाती युद्धाच्या राज्यातील अनेक जिल्ह्यात बसल्या. अनेक गॅस एजन्सीसमोर भर उन्हात ग्राहकांच्या लांबच लांब रांगा लागल्या आहेत. हॉटेल व्यावसायिकच नाही तर सर्वसामान्य ग्राहक सुद्धा गॅसवर आहेत. उद्या गॅस संपला तर जेवण तरी कसं करणार आणि बाहेर जेवायला हॉटेलचे दर कसे परवडणार असा सवाल नागरिकांकडून करण्यात येत आहे.

LPG Cylinder: राज्यात ग्राहक 'गॅस'वर, सिलेंडरसाठी भर उन्हात लांबच लांब रांगा, मायबाप सरकारला दया येईल का?
ग्राहक गॅसवरImage Credit source: टीव्ही ९ मराठी
| Edited By: | Updated on: Mar 11, 2026 | 11:45 AM
Share

LPG Cylinder Que in Maharashtra: इराण-इस्त्रायल अमेरिका युद्धामुळे अवघे जग वेठीस धरले आहे. नैसर्गिक गॅस पासून ते इंधन पुरवठ्यावर मोठा परिणाम झाला आहे. त्याचे चटके आता भारताला बसला आहे. राज्यातील अनेक जिल्ह्यात गॅस सिलेंडरसाठी सर्वसामान्य नागरिकाला भर उन्हात रांगेत उभं राहावं लागत आहे. अनेक शहरातील गॅस एजन्सीसमोर ग्राहकांनी ठिय्या मांडला आहे. लांबच लांब रांगा लागल्या आहेत. वेळेवर सिलेंडर येत नसल्याने कुणी ऑफिसला दांडी मारली आहे. तर कुणी घरातील काम बाजूला सारून रांगेत लागले आहे. घरातील अबालवृद्धापासून अनेक जण गॅस सिलेंडरसाठी रांगेत उभे ठाकले आहे. याप्रकरणी राज्य सरकारने तातडीने उपाय योजना करावी आणि गॅस तुटवड्यावर मार्ग काढण्याची मागणी नागरिकांकडून करण्यात येत आहे.

छत्रपती संभाजीनगरमध्ये गॅस एजन्सीबाहेर मोठी गर्दी

छत्रपती संभाजीनगरमध्ये घरगुती गॅस साठी एजन्सीवर ग्राहकांची मोठी गर्दी झाली आहे. सिडको बस स्टॅन्ड परिसर असलेल्या भारत गॅसवर नागरिकांची मोठी गर्दी केली आहे. गॅस सिलेंडर एप्लीकेशनवर बुकिंग होत नसल्याची नागरिकांची तक्रार आहे. गॅस एजन्सीवर ऑनलाइन गॅस बुकिंग करण्यासाठी नागरिकांची झुंबड उडाली आहे. तर अनेक ठिकाणी गॅस सिलेंडर संपण्याच्या अफवांचे पेव फुटल्याने सुद्धा ग्राहकांनी एकच गर्दी केली आहे.

सोलापूरात गॅससाठी लांबच लांब रांगा

सोलापुरात घरगुती गॅस घेण्यासाठी लोकांच्या लांबच लांब रांगा लागल्या आहेत. सोलापुरातील रामवाडी परिसरातील गॅस गोडाऊनवर गॅस घेण्यासाठी लोकांची भली मोठी रांग दिसून आली. इराण-इस्त्राईल युद्धच्या पार्श्वभूमीवर गॅस तुटवाड्याची भीती लोकांच्या मनात आहे. पुढे गॅस मिळेल की नाही या भीतीने ग्राहकांची मोठी गर्दी उसळली आहे. आम्ही चार दिवसापूर्वी बुकिंग केले होते त्यानंतर आज आमचा नंबर आलाय, असे ग्राहकांनी यावेळी सांगितले. काही लोकांना ऑनलाईन बुकिंग नसल्याने घरी पाठवले जात आहे. काही ग्राहक दोन तासापासून रांगेत थांबलेले होते. तरीही त्यांचा अजून नंबर आलेला नाही. ऑनलाईन बुकिंग केले तरी तें होत नाही त्यामुळे आम्ही गॅस टाकी घेऊन इथे आल्याची तक्रार नागरिकांनी केली आहे. गॅस टाक्या उपलब्ध आहेत, त्यामुळे नागरिकांनी गर्दी करू नये असे आवाहन एजन्सीकडून करण्यात आले आहे. तरीही नागरिक गॅस टाक्या घेऊन थेट ऑफिसमध्ये येत आहेत.

जळगावमध्ये ग्राहकांचा मोठा आरोप

जळगावात बी.जे मार्केट भारत गॅस एजन्सीच्या केंद्रावर नागरिकांची मोठी गर्दी झाली आहे. ऑनलाइन बुकिंग होत नाही तसेच बुकिंग करूनही सिलेंडर मिळत नसल्याची तक्रार नागरिकांनी केली आहे. महिनाभरापूर्वी बुकिंग केलेले देखील सिलेंडर मिळत नसल्याचा नागरिकांचा आरोप केला आहे.तक्रार करण्यासाठी आल्यावर एजन्सी मधील कर्मचारी दाद देत नसल्याचा देखील आरोप नागरिकांनी केला आहे. युद्ध सुरू असल्यामुळे भविष्यात सिलेंडर मिळेल की नाही या भीतीने नागरिकांची भारत गॅस एजन्सीच्या केंद्रावर गर्दी केली आहे. महिनाभरापूर्वी बुकिंग करून देखील सिलेंडर मिळणार नसेल तर घरात स्वयंपाक व इतर काम कशी करायची? असा सवाल नागरिकांबरोबरच महिलांनी उपस्थित केला आहे.

३० दिवसांनीच पुढील गॅस बुकिंग

आखाती देशातील तणावाचा परिणाम नंदुरबार जिल्ह्यात गॅस पुरवठ्यावर खबरदारी घेतली जात आहे. सिलेंडर घेतल्यानंतर ३० दिवसांनीच पुढील गॅस बुकिंग नवीन नियम लागू करण्यात आला आहे. घरगुती गॅस सिलेंडरच्या दरात ६० रुपयांची वाढ करण्यात आलेली आहे. संभाव्य तुटवडा टाळण्यासाठी गॅस वितरकांकडून उपाय योजना करण्यात येत आहे. व्यवसाय सिलेंडर कंपनीकडून पुरवठा बंद करण्यात आलेला आहे.सिलेंडर बुकिंग केल्यास एक दोन दिवसात घरपोच येत आहे.

अमरावतीत सिलेंडर घेण्यासाठी ग्राहकांची गर्दी

अमरावती शहरातील रुक्मिणी नगर मधील गॅस एजन्सीवर सिलेंडर घेण्यासाठी ग्राहकांची गर्दी झाली आहे. कॉलवर सिलेंडर बुकिंग होत नसल्याच्या अनेक ग्राहकांच्या तक्रारी आहेत.व्हॉट्सॲपवर बुकिंग करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. परंतु कंपन्यांचे व्हॉट्सॲप नंबरच ग्राहकांकडे नाही. एजन्सी मध्ये आल्यानंतर व्हाट्सअपवर बुकिंग केली जाते आणि नंतरच सिलेंडर दिले जाते, असा दावा करण्यात येत आहे. पेंडिंग बुकिंगवाल्यांना आधी सिलेंडर प्राधान्य देण्यात येत आहे. ज्यांच्याकडे व्हॉट्सॲप नंबर नाही त्यांना सिलेंडर मिळत नसल्याचे समोर येत आहे.

जालन्यात व्यावसायिक गॅस सिलेंडर चा पुरवठा ठप्प

आखाती देशांमध्ये सुरू असलेल्या युद्धसदृश्य परिस्थितीमुळे जगभरात अनेक ठिकाणी त्याचे परिणाम पाहायला मिळत आहे.प्रामुख्याने गॅस पुरवठ्यावर त्याचा परिणाम अधिकच झाल्याने अनेक ठिकाणी व्यावसायिक गॅसचा पुरवठा ठप्प झाला आहे. जालन्यात व्यावसायिक गॅसचा पुरवठा ठप्प झाल्याने हॉटेल चालक,छोट्या-मोठ्या खानावळी यांच्यावर देखील त्याचा परिणाम झाला आहे. पुढील एक ते दोन दिवस पुरेल इतकाच गॅसचा साठा शिल्लक असल्याने त्यानंतर मात्र आपला व्यवसाय चालवायचा कसा असा मोठा प्रश्न हॉटेल सह इतर छोट्या मोठ्या व्यावसायिकांना पडला असून त्यांची चिंता अधिकच वाढली आहे.

हॉटेल व्यवसायिकांना मोठ्या अडचणींचा सामना

एलपीजी गॅसच्या तुटवड्यामुळे पुणे जिल्ह्याच्या ग्रामीण भागातील हॉटेल व्यवसायिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. व्यावसायिक गॅस सिलेंडरच्या दरात आधीच सुमारे 115 रुपयांनी वाढ झाली आहे. त्यातच सिलेंडरचा पुरवठा वेळेवर होत नसल्याने हॉटेल व्यवसायावर गंभीर परिणाम होत आहे. दुसरीकडे खाद्यतेलाच्या किमतीतही वाढ झाल्याने खर्चात मोठी वाढ झाली आहे. गॅस वेळेवर उपलब्ध न झाल्यास अनेक हॉटेल्सना भविष्यात बंद ठेवण्याची वेळ येऊ शकते, अशी चिंता हॉटेल व्यवसायिक व्यक्त करत आहेत

पंचम पुरीवाला सुद्धा हैराण

पंचम पुरीवाला या मुंबईतील प्रसिद्ध आणि ऐतिहासिक हॉटेललाही इराण अमेरिका युद्धाचा मोठा फटका बसला आहे. गॅस पुरवठा खंडीत झाल्याने इथे सर्व मेनू हे आत्ता ऊपलब्ध नसल्याचा बोर्डच लावण्यात आला आहे. हे हॉटेल मुंबईच्या छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (CSMT) परिसरात असून ते १८४८ पासून कार्यरत आहे.युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत झाल्याने कमर्शियल गॅसचा पुरवठा खंडीत झालाय… त्यामुळे हॉटेलच्या खर्चातही मोठी वाढ झाली आहे.

Follow Us
प्रदीप पूर्णेकर प्रकरणात तपासला वेग; अल्टो कार जप्त, गाडीत सापडला...
Pradeep Purnekar : प्रदीप पूर्णेकर प्रकरणात तपासला वेग; पप्पू शिंदेने दिलेली अल्टो कार जप्त, गाडीत सापडला...
दुष्काळाची झळ! छत्रपती संभाजीनगरातील 150 वीटभट्ट्या बंद, हजारो मजुर...
दुष्काळाची झळ! छत्रपती संभाजीनगरातील 150 वीटभट्ट्या बंद, हजारो मजुरांवर उपासमारीची वेळ
माझी नार्को टेस्ट करा, तुम्हाला सगळं...; शिवराज मोरे असं का म्हणाले?
Shivraj More : माझी नार्को टेस्ट करा, तुम्हाला सगळं...; शिवराज मोरे असं का म्हणाले?
धाराशिवमध्ये चाऱ्याचा प्रश्न गंभीर, दूध उत्पादन निम्म्यावर; शेतकरी...
धाराशिवमध्ये चाऱ्याचा प्रश्न गंभीर, दूध उत्पादन निम्म्यावर; शेतकरी संकटात
80 तास झाले, तरी मला अडकवण्याचे प्रयत्न सुरूच; शिवराज मोरे....
Shivraj More : 80 तास झाले, तरी मला अडकवण्याचे प्रयत्न सुरूच; MPSC कार्यकर्ता शिवराज मोरे यांचा खळबळजनक दावा
MPSC आंदोलनात नेमकं काय घडतंय? नाईट लाईफ राडा, मद्यपान अन्... नवनाथ बन
MPSC आंदोलनात नेमकं काय घडतंय? नाईट लाईफ राडा, मद्यपान अन्... नवनाथ बन यांचा आरोपांनी खळबळ
याला गुंडगिरी म्हणत असाल तर...; नवनाथ बन यांच्या आरोपांवर शिवराज मोरे
Shivraj More : MPSC Students Protest : याला गुंडगिरी म्हणत असाल तर...; नवनाथ बन यांच्या आरोपांवर शिवराज मोरे यांचा पलटवार, नेमकं प्रकरण काय?
दोन तास विद्यार्थ्यांना ताटकळत ठेवलं, अखेर परीक्षा रद्द, रोहित पवार...
दोन तास विद्यार्थ्यांना ताटकळत ठेवलं, अखेर परीक्षा रद्द, रोहित पवार म्हणाले...
महाज्योती परीक्षा केंद्रावर मोठा गोंधळ, संगणकच नाहीत...
महाज्योती परीक्षा केंद्रावर मोठा गोंधळ, संगणकच नाहीत... विद्यार्थिनींच्या संतापानंतर परिक्षाच रद्द
MPSC विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला वेगळं वळण; रोहित पवारांनी केले गंभीर
MPSC विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला वेगळं वळण; रोहित पवारांनी केले गंभीर आरोप