AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

कांदा, कलिंगड किती रुपयांनी स्वस्त? आवक वाढल्याने दर कोसळले, अमेरिका–इस्रायल–इराण युद्धाचा मोठा फटका

इरण, इस्त्रायल आणि अमेरिका युद्धाच्या तणावाचे पडसाद आता थेट शेतकऱ्यांवर उमटताना दिसत आहेत. अमेरिका इराण संघर्षामुळे निर्यात मार्गांवर परिणाम झाल्याने मोठ्या प्रमाणात शेतमाल देशांतर्गत बाजारात येत असून त्याचा फटका शेतकऱ्यांना बसत आहे. कल्याण मधील कृषी उत्पन्न बाजार समिती परिसरात भाज्या, फळे आणि इतर शेतमालाची मोठ्या प्रमाणात आवक झाल्याने दर कोसळले असून शेतकरी आणि व्यापारी दोघेही चिंतेत आहेत.

| Updated on: Mar 11, 2026 | 1:13 PM
Share
मध्यपूर्वेत सुरू असलेल्या संघर्षाचा परिणाम आता कृषी क्षेत्रावरही दिसू लागला आहे. इरण, इस्त्रायल आणि अमेरिका युद्धाचा  या तणावामुळे आंतरराष्ट्रीय निर्यातीवर परिणाम झाल्याचे सांगितले जात आहे. निर्यात मार्गांमध्ये अडथळे निर्माण झाल्याने शेतकऱ्यांचा माल परदेशात न जाता देशांतर्गत बाजारात मोठ्या प्रमाणात येऊ लागला आहे.

1 / 6
याचा थेट परिणाम कल्याण मधील कृषी उत्पन्न बाजार समिती येथे दिसून येत आहे. बाजार समितीत भाज्या, फळे, फुले, कांदे आणि बटाट्यांची मोठ्या प्रमाणात आवक होत आहे. मात्र आवक वाढल्याने दर कोसळले असून शेतकऱ्यांना योग्य भाव मिळत नाही.

2 / 6
कालपर्यंत सुमारे 20 रुपयांना विकला जाणारा कांदा आता 10 ते 12 रुपयांवर आला आहे. तर 40 रुपयांना विकले जाणारे कलिंगड 12 रुपयांपर्यंत घसरल्याचे व्यापाऱ्यांनी सांगितले. शेतमालाला योग्य भाव मिळत नसल्याने शेतकरी आर्थिक अडचणीत सापडले आहेत.

3 / 6
दुसरीकडे बाजारात मालाचा साठा वाढल्याने ग्राहक कमी पडत आहेत. त्यामुळे काही व्यापाऱ्यांचा माल विकला न गेल्याने दुसऱ्या दिवशी तो सडण्याची वेळ येत आहे. परिणामी पालेभाज्या, फळे आणि फुलांचा मोठा साठा बाजार समितीतच पडून राहत असल्याने शेतकऱ्यांसह व्यापाऱ्यांनाही मोठे नुकसान सहन करावे लागत आहे.

4 / 6
 कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती रवींद्र घोडगे यांनी सांगितले की, निर्यात बंद झाल्यामुळे बाजारात शेतमालाची आवक वाढली असून ग्राहक कमी असल्याने मोठ्या प्रमाणात माल सडत आहे. त्यामुळे शेतकरी आणि व्यापारी दोघेही अडचणीत आले आहेत.

5 / 6
दरम्यान, बाजारात मोठ्या प्रमाणात माल येत असला तरी विक्री होत नसल्याने व्यापाऱ्यांसमोरही मोठे संकट उभे राहिले आहे. त्यातच हॉटेल व्यवसायात कमर्शियल गॅसचा तुटवडा असल्याने हॉटेलमध्ये होणारी भाजीपाला विक्रीही कमी होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. त्यामुळे परिस्थिती अशीच राहिली तर शेतकरी आणि व्यापाऱ्यांवर मोठे आर्थिक संकट ओढवण्याची भीती व्यक्त केली जात आहे.

6 / 6
Follow Us
सोलापूरमध्ये लक्ष्मण हाके यांच्याशी तरुणांची झटापट, तिघांविरोधात...
सोलापूरमध्ये लक्ष्मण हाके यांच्याशी तरुणांची झटापट, तिघांविरोधात तक्रार
कितीही केलं तरी तुम्ही तरुण होणार नाही, ज्येष्ठच... गुलाबराव पाटील
कितीही केलं तरी तुम्ही तरुण होणार नाही, ज्येष्ठ... गुलाबराव पाटील अन् महाजनांमध्ये वेगळीचं जुगलबंदी
मुंबईतील साखळी बॉम्बस्फोट प्रकरणी मोठी अपडेट, विशेष मकोका न्यायालय...
मुंबईतील साखळी बॉम्बस्फोट प्रकरणी मोठी अपडेट, विशेष मकोका न्यायालयाचा मोठा निर्णय
दिल्लीत हालचालींना वेग; तब्बल 7 वर्षांनंतर शी जिनपिंग यांचा हा भारत...
दिल्लीत हालचालींना वेग; तब्बल 7 वर्षांनंतर शी जिनपिंग यांचा हा भारत दौरा, CM फडणवीस देखील ब्रिक्स परिषदेसाठी रवाना
माधुरी हत्तीण नांदणी मठात परतली, हजारो नागरिकांनी उत्साहात केले...
माधुरी हत्तीण नांदणी मठात परतली, हजारो नागरिकांनी उत्साहात केले स्वागत
मोठी बातमी! काँग्रेसचे माजी प्रवक्ते रत्नाकर महाजन यांचे निधन
मोठी बातमी! काँग्रेसचे माजी प्रवक्ते रत्नाकर महाजन यांचे निधन; आणीबाणीच्या काळात...
मुंबईतील मराठा आंदोलनाबाबत मोठी अपडेट; मनोज जरांगेंना कोर्टाचा दणका

पुण्यात गणेशोत्सवात 12 दिवस Dry Day का? हायकोर्टाने काय निकाल दिला?
Pune Dry Day : पुण्यात गणेशोत्सवात 12 दिवस Dry Day का? हायकोर्टाने काय निकाल दिला?
मला चांगली मराठी येते, भावना दुखावल्या असतील तर... संजय दत्तला उपरती
Sanjay Dutt | मला चांगली मराठी येते, कुणाच्या भावना दुखावल्या असतील तर... संजय दत्तला उपरती
ही शान कोणाची? लालबागच्या राजाची, राजाच्या प्रथम दर्शनाचा व्हिडिओ बघाच
Lalbaugcha Raja First Look 2026 | ही शान कोणाची? लालबागच्या राजाची, राजाच्या प्रथम दर्शनाचा संपूर्ण व्हिडिओ बघाच