AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

आधी ट्रेनमध्ये हनीमूनची तयारी, आता तर चालत्या गाडीतच… प्रवाशाचे प्रताप पाहून नेटीजन्स अवाक्, Video व्हायरल

ट्रेनचा एक कोच हनीमूनसाठी सजवल्याचा प्रकार समोर आल्यावर खळबळ माजली होती, त्यानंतर आता आणखी एक व्हिडीओ समोर आला असून चालू ट्रेनमध्येच एका प्रवाशाने पूजा सुरू केली. त्यात काय विशेष असं तुम्हाला वाटेल, पण ती पूजा करतानाच, त्याने पुढे जे केलं ते पाहून सगळ्यांचे प्राण कंठाशी आले. असं काय घडलं? जाणून घ्या सविस्तर..

आधी ट्रेनमध्ये हनीमूनची तयारी, आता तर चालत्या गाडीतच...  प्रवाशाचे प्रताप पाहून नेटीजन्स अवाक्, Video व्हायरल
धावत्या ट्रेनमध्ये प्रवाशाचे प्रताप
| Updated on: Jul 28, 2026 | 2:01 PM
Share

चालत्या ट्रेनमध्येच एक कूपे हा हनीमूनसाठी सजवण्यात आल्याची बातमी आणि फोटो सोशल मीडियावर काही दिवसांपूर्वी व्हायरल झाले होते. ट्रेनच्या फर्स्ट एसी मधील हनीमूनची बरीच चर्चा रंगली होती. त्यासाठी खास तयारी करण्यात आली होती. ज्या घटनेचा व्हिडीओ मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला, आणि त्यावरून बराच गदारोळही झाला. धावत्या ट्रेनमध्ये असे प्रकार करण्यास मनाई असल्याचे स्पष्ट करण्यात आलं. त्यानंतर संबंधित कर्मचाऱ्यांवर कारवाई देखील झाली. मात्र आता त्यानंतर सोशल मीडियावर आणखी एक व्हिडीओ व्हायरल झालाय, त्यातील दृश्य पाहून तर सगळेच हैराण झालेत. हा व्हिडीो वाऱ्याच्या वेगाने सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. हा प्रकार रेल्वेच्या थर्ड एसी (3AC) डब्यात घडला. एका प्रवाशाने एकदम वरच्या बर्थवर बसून केवळ पूजा-अर्चाच केली नाही, तर धावत्या रेल्वेत उघडपणे तेलाचा दिवाही पेटवला. ही कृती पाहून इतर सहप्रवासी हादरले. त्या प्रवाशांनी त्याला दिवा लावण्यास विरोध करत बरंच समजावण्याचा प्रयत्न केला. मात्र तो प्रवासी काहीच ऐकायला तयार नव्हता, तो त्याच्या हट्टावर कायम होता. काहीह न बोलता त्याने निरांजन लावून पूजा सुरूच ठेवली.

ट्रेनमध्ये अग्नि पेटवण्यास, ज्वलनशील पदार्थांस बंदी

हा व्हिडिओ समोर आल्यानंतर इंटरनेटवर मोठी चर्चा सुरू झाली आहे. लोकांमध्ये प्राथमिक सुरक्षेची थोडीशी देखील जाणीवही उरलेली नाही का, असा प्रश्न अनेक नेटकऱ्यांनी उपस्थित केला. रेल्वेच्या नियमांनुसार, ट्रेनच्या डब्याच्या आत माचिस, लायटर किंवा कोणत्याही प्रकारची उघडी आग लावणं, अग्नि पेटवणं यास सक्त मनाई आहे. रेल्वेतील बर्थ, चादरी, ब्लँकेट आणि पडदे अशा गोष्टी असतात, ज्या अतिशय लवकर पेट घेऊ शकतात. त्यामुळे धावत्या रेल्वेत दिवा लावणं म्हणजे मोठ्या दुर्घटनेला आमंत्रण देण्यासारखं आहे.

प्रवाशंनी समजावूनही त्याने ऐकलंच नाही

व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये वरच्या बर्थवर बसलेला एक प्रवासी दिवा लावून पूजा करताना स्पष्ट दिसत आहे. असं करू नकोस, लावलेला दिव विझव, ते निरांजन पेटतं ठेवू नकोस, असं आजूबाजूचे प्रवासी त्याला वारंवार समजावत होते. नाहीतर लगेच फायर अलार्म वाजेल, असंही काही लोकांनी त्याला सांगितलं. उदबत्ती तर शांत केली आहे, आता तो दिवाही विझवा, असे एका प्रवाशाने त्या इसमाला सांगितलं. मात्र तो ढिम्म होता, इतरांचं सांगणं, काहीही न ऐकता त्याने दिवा लावूनच त्याची पूजा कायम ठेवली. त्याने कोणाचही ऐकण्यास नकार दिला.

ही संपूर्ण घटना X (पूर्वीचे ट्विटर) वरील @JharkhandRail या हँडलवरून शेअर करण्यात आली आहे. हा मेसेज कोणत्याही धर्म किंवा श्रद्धेविरुद्ध नसून, सार्वजनिक सुरक्षेची जाणीव करून देण्यासाठी आहे, असंही या पोस्टमध्ये स्पष्टपणे नमूद करण्यात आलं आहे.

इथे पहा व्हायरल व्हिडीओ

सोशल मीडियावर नेटकी भडकले

हा व्हिडिओ समोर आल्यानंतर सोशल मीडियावर अनेक नेटकरी संतापले असून त्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. “देवा रे! अशा लोकांवर रेल्वेने प्रवास करण्यास बंदी घालायला हवी” असं एका युजरने लिहिलं. “आधी मोठा दंड ठोठवा याला, त्यानंतर त्याला तुरुंगात पाठवा” अशी मागणीही दुसऱ्याने केली. ” देशाचा नागरिक, प्रवासी म्हणून जबाबदारी आणि शिस्त पूर्णपणे विसरला तो”अशी कमेंट आणखी एकाने केली असून या व्हिडोओवर लोक प्रचंड संतापले आहेत.

Follow Us
माधुरी हत्तीणीने स्विमिंग टँकमध्ये उतरताच मनसोक्त लुटला पोहण्याचा आनंद
Madhuri Elephant | माधुरी हत्तीणीने स्विमिंग टँकमध्ये उतरताच मनसोक्त लुटला पोहण्याचा आनंद; दृश्यांनी जिंकली सर्वांची मनं
शेतकऱ्यांसाठी बातमी! दुष्काळसदृश स्थितीचा सरकार घेणार ग्राऊंड रिपोर्ट
शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी! दुष्काळसदृश स्थितीचा सरकार घेणार ग्राऊंड रिपोर्ट; पालकमंत्री जिल्ह्याजिल्ह्यात दौरा करणार
पहाटे 4 वाजेपर्यंत खलबतं अन् अखेर BRICSमध्ये सहमती! सर्व सदस्य देशांचं
BRICS Summit 2026 | पहाटे 4 वाजेपर्यंत खलबतं अन् अखेर BRICSमध्ये सहमती! सर्व सदस्य देशांचं संयुक्त निवेदन मंजूर
माझा भाऊ शांततेनेच काम करेल अशी अपेक्षा! अमृता फडणवीसांचं मोठं वक्तव्य
Amruta Fadnavis on Manoj Jarange | माझा भाऊ शांततेनेच काम करेल अशी अपेक्षा! मनोज जरांगे पाटलांच्या आंदोलनावर अमृता फडणवीसांचं मोठं वक्तव्य, पुढे म्हणाल्या...
हुकूमशाही आणि दडपशाहीने बुलढाणा चालणार नाही! संजय गायकवाडांच्या टीकेवर
Shweta Mahale on Sanjay Gaikwad | हुकूमशाही आणि दडपशाहीने बुलढाणा चालणार नाही! संजय गायकवाडांच्या टीकेवर श्वेता महालेंचा जोरदार पलटवार
ठाकरे सरकारच्या नाकर्तेपणामुळे मराठा आरक्षण टिकले नाही!
Navnath Ban | ठाकरे सरकारच्या नाकर्तेपणामुळे मराठा आरक्षण टिकले नाही! जरांगे आंदोलनावरून महायुतीचा ठाकरे गटावर घणाघात
पावसाने शेतकऱ्यांचं कंबरडं मोडलं! सोयाबीन-कापूस पिकं उद्ध्वस्त
Washim | वाशिममध्ये पावसाने शेतकऱ्यांचं कंबरडं मोडलं! सोयाबीन-तूर-कापूस पिकं उद्ध्वस्त, महिला शेतकरी व्यथा मांडताना ढसाढसा रडली
ब्रिक्स परिषदेत मोदींचे मोठे विधान; जागतिक निर्णय प्रक्रियेत सर्व...
ब्रिक्स परिषदेत मोदींचे मोठे विधान; जागतिक निर्णय प्रक्रियेत सर्व देशांना सहभाग घेण्याचं आवाहन
पुण्यात गणेशोत्सवातील ध्वनी प्रदूषणावरून कायदेशीर दणका; विद्यानंद...
पुण्यात गणेशोत्सवातील ध्वनी प्रदूषणावरून कायदेशीर दणका; विद्यानंद बापट यांची मोठी मोहीम
मुंबई दौऱ्यासाठी मनोज जरांगे पाटील सज्ज! अखेर तारीख ठरली
Maratha Reservation | मुंबई दौऱ्यासाठी मनोज जरांगे पाटील सज्ज! 15 सप्टेंबर तारीख जाहीर; आझाद मैदानावर आमरण उपोषण करणार