AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Pravin Tarde: प्रवीण तरडेंनी सर्वांसमोर मला कानाखाली मारली… कुशल बद्रिकेचा मोठा खुलासा

Pravin Tarde: अभिनेते आणि दिग्दर्शक प्रविण तरडे हे गेल्या काही दिवसांपासून सतत चर्चेत आहेत. त्यांचा देऊळ बंद 2 हा सिनेमा सुपरहिट ठरला. दरम्यान, अभिनेता कुशल बद्रिकेने नुकताच प्रवीण तरडेंबाबत मोठा खुलासा केला आहे.

| Updated on: Jul 28, 2026 | 12:24 PM
Share
अभिनेते प्रवीण तरडे यांचा ‘देऊळ बंद २’ अलीकडेच प्रेक्षकांच्या भेटीला आला आणि या चित्रपटाने १०० कोटींहून अधिक कमाई केली. जवळपास देशभरात या चित्रपटाने धुमाकूळ घातला. हा चित्रपट सर्वाधिक कमाई करणारा दुसरा मराठी सिनेमा ठरला आहे. नुकाताच अभिनेता कुशल बद्रिकेने प्रवीण तरडेंबाबत धक्कादायक खुलासा केला आहे. तो नेमकं काय म्हणाला? जाणून घ्या...

1 / 5
‘देऊळ बंद २’च्या शूटिंगदरम्यान प्रवीण तरडे यांच्या शिस्तीच्या वागणुकीचे, तापटपणाचे आणि ओरडण्याचे अनेक किस्से ऐकायला मिळाले. या सगळ्या गोष्टी त्यांनी स्वतःच कबूल केल्या आहेत. दरम्यान, एका मुलाखतीत अभिनेता कुशल बद्रिकेने सांगितले की, प्रवीण तरडेने त्यांना सणसणीत कानाखाली मारली होती. हे सगळे चालू सीनदरम्यानच घडले असल्याचेही त्याने सांगितले आहे.

2 / 5
कुशल बद्रिकेचा ‘मामाच्या गोव्याला जाऊया’ हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. या सिनेमात कुशल बद्रिके, संतोष जुवेकर, अंकुश चौधरी आणि अभिजीत चव्हाण यांच्या प्रमुख भूमिका आहेत. प्रवीण तरडे देखील या चित्रपटात आहेत. प्रवीण तरडे आणि कुशल बद्रिके यांचे काही एकत्र सीन्स आहेत. एका सीनमध्ये प्रवीण तरडे कुशलला कानाखाली मारताना दिसत आहेत. मात्र हा सीन शूट करताना प्रवीण तरडे यांनी खरोखरच कुशलला कानाखाली मारली होती.

3 / 5
इट्स मज्जाला दिलेल्या मुलाखतीत कुशल बद्रिकेने हा किस्सा सांगितला. तो म्हणाला, “प्रवीण तरडेंनी टिचकी मारली तरी उडून जाईल असा माझा देह. त्याने मला सणसणीत कानाखाली मारलीये. हे सगळं विजू माने यांच्यामुळे झालं. ते आधी खूप सावरून-सावरून करत होते. पण प्रवीण म्हणाले की, ते रिअल वाटत नाही. त्या रिअलपणाच्या नादात प्रवीणने मला चांगलीच वाजवली.”

4 / 5
पुढे कुशलने प्रवीण तरडे यांची मिमिक्रीही केली. तो म्हणाला, “ए कुश्या, तू घाबरू नको. मी बरोबर करतो. हात बाजूने जाईल, असं ते म्हणाले. पण हात बाजूने गेलाच नाही, तो मला भाजून गेला.” सीन संपल्यानंतर कुशल बद्रिके दोन तास गालाला हात लावून बसला होता. तो म्हणाला, “प्रवीणने त्यानंतर सँडीलाही कानाखाली मारली. मी या सिनेमात खूप मार खाल्लाय यार!” ‘मामाच्या गोव्याला जाऊया’ हा धम्माल कॉमेडी, अॅक्शन, सस्पेन्स आणि डॉनगिरीचा धमाका आहे. हा चित्रपट येत्या ३१ जुलैपासून संपूर्ण महाराष्ट्रात रिलीज होणार आहे.

5 / 5
Follow Us
कोणता पक्ष कुठे आघाडीवर, कुठे पिछाडीवर? शिक्षक, पदवीधरमध्ये कुणाचा...
MLC Election Results 2026: कोणता पक्ष कुठे आघाडीवर, कुठे पिछाडीवर? शिक्षक, पदवीधरमध्ये कुणाचा डंका; पाहा A टू Z
मीनाक्षी शिंदेंची तीन तासांहून अधिक SIT चौकशी; नेमकं काय काय घडलं?
Pradip Purnekar Case: मीनाक्षी शिंदेंची तीन तासांहून अधिक SIT चौकशी; नेमकं काय काय घडलं?
मोठी बातमी! छत्रपती संभाजीनगरमध्ये प्रतापसिंह पाटील यांची मोठी आघाडी,
मोठी बातमी! छत्रपती संभाजीनगरमध्ये प्रतापसिंह पाटील यांची मोठी आघाडी, सतीश चव्हाण पिछाडीवर
शिवसेना अपात्रता प्रकरणी कोर्टात लढत, सुनावणी आधीच शिंदे गटातील बड्या
शिवसेना अपात्रता प्रकरणी कोर्टात लढत, सुनावणी आधीच शिंदे गटातील बड्या नेत्याचं विधान
राजकीय मतभेद बाजूला! फडणवीस आणि ठाकरे बंधू एकाच मंचावर येणार?
राजकीय मतभेद बाजूला! CM फडणवीस आणि ठाकरे बंधू एकाच मंचावर येणार? महाराष्ट्राच्या राजकारणात चर्चांना उधाण
NCP शरद पवार गटाची धाकधुक वाढली, मराठवाडा पदवीधर मतदारसंघातून मोठी...
MLC Election Result 2026 Updates : NCP शरद पवार गटाची धाकधुक वाढली, मराठवाडा पदवीधर मतदारसंघातून मोठी अपडेट समोर
पुन्हा शिंदेंच्या बंडखोरीने भाजपचं टेन्शन वाढवलं? ऐनवेळीच...
Breaking Updates : पुन्हा शिंदेंच्या बंडखोरीने भाजपचं टेन्शन वाढवलं? ऐनवेळीच... अमरावती मतदारसंघात मोठा उलटफेर
अमरावती पाठोपाठ मराठवाड्यातही महायुतीचे उमदेवार आघाडीवर, Latest...
Marathwada MLC Constituency Election 2026 : अमरावती पाठोपाठ मराठवाड्यातही महायुतीचे उमदेवार आघाडीवर, Latest अपडेट काय?
महाराष्ट्र शासनाचा मोठा निर्णय! 391 कोटींचा निधी मंजूर, ST महामंडळ...
महाराष्ट्र शासनाचा मोठा निर्णय! 391 कोटींचा निधी मंजूर, एसटी महामंडळ कर्मचाऱ्यांची दिवाळी गोड
प्रदीप पुर्णेकर प्रकरणी मीनाक्षी शिंदेंची पहिल्यांदाच चौकशी, ठाणे...
प्रदीप पुर्णेकर प्रकरणी मीनाक्षी शिंदेंची पहिल्यांदाच चौकशी, ठाणे गुन्हे शाखेच्या खंडणी विरोधी पथकासमोर...