Anjali Damania: जयंत पाटील तुम्ही सुद्धा! खरातच्या दरबारात कुणा कुणाची हजेरी, अंजली दमानियांनी कुंडलीच बाहेर काढली, त्या नावांनी एकच धक्का

Anjali Damania on Jayant Patil: काल जाहीर केल्याप्रमाणे आज सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी खरातला कॉल करणाऱ्या राजकारण्यांची नावं, पीए आणि बड्या अधिकाऱ्यांची नाव उघड केली. त्यातील काहींनी तर त्याच्या दरबारात हजेरी लावली आहे. तर काहींचे त्याच्याशी फोनवरून बोलणे झाले आहे.

Anjali Damania: जयंत पाटील तुम्ही सुद्धा! खरातच्या दरबारात कुणा कुणाची हजेरी, अंजली दमानियांनी कुंडलीच बाहेर काढली, त्या नावांनी एकच धक्का
अंजली दमानिया, जयंत पाटील, भोंदू अशोक खरात
Image Credit source: टीव्ही ९ मराठी
| Updated on: Apr 15, 2026 | 12:02 PM

Anjali Damania on Jayant Patil: सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी भोंदूबाबा अशोक खरातच्या संपर्कात असलेल्या राजकारण्यांची, पीए, उच्च पदस्थ अधिकाऱ्यांची नावंच जाहीर केली. भोंदू अशोक खरात राजकीय पाठबळ मिळाल्यानेच निर्ढावल्याचा आरोपही त्यांनी केला. दमानिया यांनी कालच राजकारण्यांची नावं समोर आणणार असल्याचे म्हटले होते. तहसीलदार, उपजिल्हाधिकारी, पीआय आणि एपीआय असे सात अधिकारी, दोन आरटीओ त्यात निमसे नावाचा व्यक्ती आहे. हे लोक का खरातांना फोन करायचे. शेकडो कॉल का केले, असा सवालही त्यांनी विचारला.

राजकारणी, अधिकाऱ्यांच्या सिडिंकेटमुळे खरात मोठा

खरात मोठा कसा झाला. त्याला मोठं करणारे राजकारणी, अधिकारी होते. त्याच्या दिमतीला सर्व होते. त्यातील काही राजकारणी नुसतंच भविष्य विचारायला गेले असतील. कुणी सांगितलं म्हणून गेले असतील. काही राजकारणी संधी साधूपणा करायला काही साध्य करायला गेले असतील. मी राजकारण्याची यादी जाहीर करत आहेत. त्यांचा सहभाग आहे, त्यांचा त्या विकृत कृत्यात सहभाग आहे किंवा पाठिंबा आहे, असं माझं म्हणणं नाही. त्याच्या काळ्या कृत्यात हे लोक नसतील. पण हे लोक खरातच्या संपर्कात होते. त्याला फोन करत होते. फोन करण्याची कारणे वेगळी असू शकतात, असे अंजली दमानिया म्हणाल्या.

राष्ट्रवादीच्या जयंत पाटलांचे नाव वाचून धक्का

नाशिकचे आमदार नितीन पवार, चंद्रकांत पाटील, चंद्रकांत पाटलांचे पीए मंगेश देशपांडे, उदय सांगळे सिन्नरहून उभे होते. पराभूत झाले. तेही भेटले. विधान परिषद आमदार शिवाजी शहाणे, पद्मश्री पोपटराव पवार, रामदास खेडकर (दादा भूसेंचे पीए), दीपक केसरकर यांचा आधीचा नंबर सापडला नाही. ट्रू कॉलर्सवरून नंबर शोधल्यावर केसरकरांचा नंबर मिळाला. त्यावरून १९ फोन झाले होते. राहुल कोतडे ओएसडी विखे पाटलांचं, प्रभाकर काळे, राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे आणि राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे ही कॉल डिटेल्स त्यांनी समोर आणले.

तर या यदीत नवीन नाव म्हणजे राष्ट्रवादीचे नेते जयंत पाटील यांचे आहे. हे नाव वाचून मला दुख झालं. त्यांच्याकडून अशी अपेक्षा नव्हती. अशा बाबांकडे भविष्य विचारायला कोण घेऊन गेले माहीत नाही. कदाचित मी राँग असेल. मला ती व्यक्ती आतापर्यंत चांगली वाटायचे, असे अंजली दमानिया म्हणाल्या.

Follow Us