भारतातील हा कोट्यधीश भिकारी, पुणे-मुंबईत बंगला, मुले कॉन्‍वेंट शाळेत

India Richest Beggar | भारतातील सर्वात श्रीमंत भिकारी मुंबईत राहतो. हा भिकारी कोट्यधीश आहे. त्याचे पुणे आणि मुंबईत फ्लॅट आहेत. त्याची मुले इंग्रजी शाळेत शिकतात. त्याच्या घरात सर्व सुखसुविधा आहेत. हे सर्व असून भीक मागण्याचा व्यवसाय तो बंद करत नाही.

भारतातील हा कोट्यधीश भिकारी, पुणे-मुंबईत बंगला, मुले कॉन्‍वेंट शाळेत
beggar
| Updated on: Nov 26, 2023 | 10:30 AM

मुंबई, दि. 26 नोव्हेंबर 2023 | रेल्वे स्टेशन, बस स्थानक किंवा सिग्नलवर भीक मागणारे अनेक जण आपणास दिसतात. या भिकारींना दोन वेळचे जेवणही अवघड असते. परंतु काही भिकारी मात्र चांगलेच श्रीमंत आहे. त्यांनी गडगंज संपत्ती भीक मागवून कमवली आहे. मुंबईतील एक भिकारीचे पुणे आणि मुंबईत प्लॅट आहेत. त्याची मुले इंग्रजी माध्यमांच्या शाळेत शिक्षण घेत आहे. त्याच्या घरात सर्व प्रकारच्या सुखसुविधा आहेत. चांगले कुटुंब आहे. या कोट्यधीश भिकारीचे नाव भरत जैन आहे. एकूण सात कोटीची संपत्ती त्याची आहे. तो मुंबईत परळमध्ये स्वत:च्या प्लॅटमध्ये राहतो. भारतातील सर्वात श्रीमंत भिकारी त्याला म्हटले जाते. भीक मागून त्याला महिन्याला 75 हजार रुपये मिळतात. वार्षिक कामाई नऊ लाख  रुपये आहे.

सीएसटीएम आणि आझाद मैदानात भीक मागण्याचे काम

मुंबईतअनेक ठिकाणी भिकारी दिसतात. भरत जैनसुद्धा मुंबईत भीक मागण्याचे काम करत आहे. त्यांचे लग्न झाले आहे. त्यांच्या परिवारात पत्नी, दोन मुले एक भाऊ आणि वडील आहेत. त्यांचा परिवार स्टेशनरी स्टोर चालवतो. थोडक्यात परिवार सधन असतानाही भरत जैन छत्रपती शिवाजी टर्मिनस आणि आझाद मैदानात येथे भीक मागण्याचे काम करतात. भीक मागण्यातून महिन्याला त्यांची कमाई 75 हजार रुपयांपर्यंत जाते. वर्षीत उत्पन्न नऊ लाखांपर्यंत आहे. रोज त्यांना भिकेतून अडीच हजार रुपये मिळतात.

भरत जैन यांच्याकडे दोन फ्लॅट आणि दुकान

भरत जैन यांच्याकडे दोन फ्लॅट आहे. मुंबईतील परळमध्ये त्यांचा स्वत:चा  2BHK फ्लॅट आहे. ठाण्यात त्यांचे दुकान आहे. त्यातून 30000 रुपये महिन्याला उत्पन्न त्यांना मिळत आहे. पुणे शहरात त्यांची संपत्ती आहे. त्याची मुले कन्वेंट शाळेत शिक्षण घेत आहेत. परिवारातील सदस्य त्यांना भीक मागू नको, असा खूप आग्रह करतात. परंतु ते आपला भीक मागण्याचे काम सोडण्यास तयार नाही. कारण यामाध्यमातून ते कोट्यधीश झाले आहेत. त्यांना भारतातील सर्वात श्रीमंत भिकारी म्हटले जाते.