भारतामध्ये या ठिकाणी लग्नासाठी मुलं आणि मुली घरोघरी जावून मागतात भीक, जाणून घ्या!

लग्नासाठी आता मुली भेटत नसल्याचं अनेकदा कानावर आलं असेल. कारण मुलींची संख्या कमी असल्यामुळे मुलांना लग्नासाठी मुली मिळत नाहीत. मात्र या ठिकाणी मुली-मुलं घरोघरी जात लग्नासाठी भीक मागतात, नेमकं असं का जाणून घ्या.

भारतामध्ये या ठिकाणी लग्नासाठी मुलं आणि मुली घरोघरी जावून मागतात भीक, जाणून घ्या!
Follow us
| Updated on: Oct 21, 2023 | 11:08 PM

भोपाळ : आपल्या देशात संस्कृतीला खूप महत्त्व आहे. प्रत्येक राज्याची वेगवेगळी संस्कृती आहे आणि तेथील लोक देखील त्यांची संस्कृती अगदी नित्य नियमाने पाळताना दिसतात. मग प्रत्येक राज्यात वेगवेगळे सण अगदी उत्साहात साजरे केले जातात. आता दिवाळीचा सण जवळ आला आहे. जसा दिवाळीचा सण जवळ आला आहे तसंच बाजारात सगळीकडे टेसू दिसू लागली आहे. टेसू पौर्णिमा ही चंबळ प्रदेशात साजरी केली जाते. टेसू पौर्णिमा हा एक सण आहे जो अगदी उत्साहात साजरा केला जातो.

दिवाळी सुरू होण्यापूर्वी संबळ प्रदेशात टेसू हा सण मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. या सणाची तयारी नवमीपासून सुरू केली जाते. तर टेसू पौर्णिमा ही शरद पौर्णिमेला मोठ्या थाटामाटा साजरी केली जाते. ज्या दिवशी दसरा असतो त्या दिवसापासून ते पौर्णिमेपर्यंत मुलांचे टोळके टेसू घेऊन भीक मागतात. तर मुली घरोघरी जातात आणि घंटा वाजवतात, गाणी गातात तसेच भिक देखील मागतात. यानंतर मुले- मुली लग्न करतात. तेथूनच लग्नाला सुरुवात होते. परंपरेप्रमाणे टेसू आणि सांझी हे सगळ्यात पहिले लग्न करतात.

तीन काड्या जोडून बनवलेल्या स्टॅन्डपासून टेसूच्या मुख्य आकृतीची रचना तयार केली जाते. ज्यामध्ये मध्यभागी दिवा ठेवण्यासाठी एक जागा केली जाते. तर टेसूचे डोके बनवण्यासाठी चुना, पिवळी गेरू माती आणि काजळचा वापर केला जातो. तसंच काही ठिकाणी टेसूचा चेहरा हा भयंकर राक्षससारखा केला जातो. तर काही ठिकाणी तो सामान्य माणसासारखा केला जातो.

या सणाच्या सुरुवातीबाबत एक दंतकथा प्रचलित आहे. तर कुंती ही अविवाहित होती त्यावेळी तिला दोन पुत्र झाले होते. त्यामधील पहिला बब्बरावाहन हा मुलगा होता. ज्याला कुंतीने जंगलात सोडले होते. बब्बरावाहन हा मुलगा अतिशय हुशार होता. तो जन्माला येताच सामान्य मुलाच्या दुप्पट वेगाने वाढू लागला होता.

काही वर्षांनी बब्बरावाहन उपद्रव निर्माण करू लागला. त्यामुळे पांडव त्याच्यावर नाराज होऊ लागले. त्यानंतर सुभद्राच्या विनंतीवरून भगवान श्रीकृष्णांनी आपल्या सुदर्शन चक्राने बब्बरावाहनाची मान कापली होती. पण बब्बरावाहन हा अमर होता. मग कृष्णाने आपल्या सांझी निर्माण केली आणि तिचे टेसुशी लग्न केले. तसेच तिला कोणताही त्रास न देण्याचे वचन घेतले. तेव्हापासून टेसू सणाला सुरुवात झाली.

Non Stop LIVE Update
राहुल गांधींची ट्रेन कशी? त्याला फक्त इंजिन अन् डब्बे..फडणवीसांची टीका
राहुल गांधींची ट्रेन कशी? त्याला फक्त इंजिन अन् डब्बे..फडणवीसांची टीका.
कोल्हेंचं अजित दादांच्या टीकेला प्रत्युत्तर, कार्यसम्राट की नटसम्राट..
कोल्हेंचं अजित दादांच्या टीकेला प्रत्युत्तर, कार्यसम्राट की नटसम्राट...
शरद पवार महायुतीत येणार? 4 जूननंतर... प्रफुल्ल पटेलांचं मोठं वक्तव्य
शरद पवार महायुतीत येणार? 4 जूननंतर... प्रफुल्ल पटेलांचं मोठं वक्तव्य.
नारायण राणे वेडा माणूस, त्याचा चेहरा..., ठाकरे गटाच्या नेत्याची टीका
नारायण राणे वेडा माणूस, त्याचा चेहरा..., ठाकरे गटाच्या नेत्याची टीका.
... हा नारायण राणेंचा अपमान नाही का? वैभव नाईक यांचा उपरोधीक टोला
... हा नारायण राणेंचा अपमान नाही का? वैभव नाईक यांचा उपरोधीक टोला.
73 वर्षीय तरूण उमेदवार लोकसभेच्या रिंगणात, मी निवडून आलो तर...
73 वर्षीय तरूण उमेदवार लोकसभेच्या रिंगणात, मी निवडून आलो तर....
जरांगे पाटील 4 जूनपासून उपोषणाला बसणार? मराठा आरक्षणासाठी दिली डेडलाईन
जरांगे पाटील 4 जूनपासून उपोषणाला बसणार? मराठा आरक्षणासाठी दिली डेडलाईन.
तुम्हाला कार्यसम्राट खासदार पाहिजे की नटसम्राट..दादांची कोल्हेंवर टीका
तुम्हाला कार्यसम्राट खासदार पाहिजे की नटसम्राट..दादांची कोल्हेंवर टीका.
किडनीत शिंदे गट, लिव्हरमध्ये...निंबाळकरांचा मल्हार पाटलांना खोचक टोला
किडनीत शिंदे गट, लिव्हरमध्ये...निंबाळकरांचा मल्हार पाटलांना खोचक टोला.
दोन दिवस प्रतीक्षा, नाहीतर सांगलीतून विशाल पाटील अपक्ष म्हणून लढणार?
दोन दिवस प्रतीक्षा, नाहीतर सांगलीतून विशाल पाटील अपक्ष म्हणून लढणार?.