“संजय राऊतांनीही अनेकदा पक्षप्रवेशासाठी एकनाथ शिंदेंकडे याचना केल्या”; भाजप नेत्याचा मोठा गौप्यस्फोट…

| Updated on: Jun 18, 2023 | 6:59 PM

जर आमच्या नेत्यांबरोबर सुषमा अंधारे यांचा जवळचा संबंध असेल तर आमच्या नेत्यांच्या माहितीच्या आधारे त्या वागत असतील तर सुषमा अंधारे कधीही त्या ठिकाणी धोका देऊ शकतात अशी शक्यताही त्यांनी यावेळी वर्तवली आहे.

संजय राऊतांनीही अनेकदा पक्षप्रवेशासाठी एकनाथ शिंदेंकडे याचना केल्या; भाजप नेत्याचा मोठा गौप्यस्फोट...
Follow us on

मुंबई : राज्यातील राजकारणात सध्या मोठ मोठ्या घटना घडामोडी घडत आहेत. त्यावरूनच आता ठाकरे गट आणि शिवसेना-भाजप यांच्यामध्ये द्वंद्ध सुरु आहे. ठाकरे गटाच्या आमदार मनिषा कायंदे यांचा आज शिवसेनेत प्रवेश होत असल्यामुळे त्यावरूनही आणि राजकारण तापले आहे.आरोप प्रत्यारोपांचे राजकारण चालू असतानाच आता भाजपचे नेते प्रवीण दरेकर यांनी संजय राऊत यांच्यावरून ठाकरे गटावर जोरदार हल्लाबोल केला आहे. ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांच्याविषयी बोलताना प्रवीण दरेकर यांनी त्यांच्यावर सडकून टीका केली आहे.

ईडीच प्रेम त्यांचं वाढलंय त्यातच सरकार जे आहे ते एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांचे आहे. त्यामुळे एकनाथ ई आणि देवेंद्र डी या दोन शब्दाच्या नावामुळे त्यांना झोप लागत नाही. आणि त्यांच्यामुळे ते भ्रमिष्ट झाले आहेत असा टोला त्यांनी ठाकरे गटाला लगावला आहे.

दिवा जसा विझताना…

ज्या प्रमाणे दिवा जसा विझताना मोठमोठ्याने फडफड करत असतो त्याप्रमाणे ठाकरे गटाच्या नेत्यांची अवस्था झाली आहे असा टोलाही त्यांनी लगावला आहे. खासदार संजय राऊत यांच्याकडून बेताल वक्तव्य, आणि वारेमाफ राऊतांकडून बोलले जाते. त्यांना बोलताना कोणत्याही परिस्थितीची भान अथवा भविष्याविषयीही त्यांना कोणतेही भान नसते असं मतही त्यांनी यावेळी व्यक्त केले.

‘या’ गोष्टी भविष्यकाळात समोर येतील

ज्या प्रमाणे आमदार मनिषा कायंदे या शिवसेनेत गेल्या आहेत. त्याच प्रमाणे आता पुढील काळातही कोण कुठल्या पक्षात येतो हे येणाऱ्या काळात त्या ठिकाणी समजून येईल असा खोचक टोलाही त्यांनी संजय राऊत यांना लगावला आहे. यावेळी ते म्हणाले की, खासदार संजय राऊतही अनेकदा पक्षप्रवेशासाठी एकनाथ शिंदे यांच्याकडे पक्षात येण्यासाठी याचना केल्या आहेत आणि या गोष्टी भविष्यकाळात समोर येतील असंही त्यांनी यावेळी सांगितले.

उद्धव ठाकरेंनी सावध व्हावं

ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांच्याविषयी बोलतानाही त्यांनी म्हटले की, मला वाटतं सुषमा अंधारे यांचा भाजपच्या नेत्यांशी घनिष्ठ संबंध असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे आता भाजपच्या वरिष्ठ नेत्यांबरोबरही त्या बोलत असतील तर उद्धव ठाकरेंनी आता सावध व्हायला पाहिजे असा टोला त्यांनी सुषमा अंधारे यांना लगावला आहे.

जर आमच्या नेत्यांबरोबर सुषमा अंधारे यांचा जवळचा संबंध असेल तर आमच्या नेत्यांच्या माहितीच्या आधारे त्या वागत असतील तर सुषमा अंधारे कधीही त्या ठिकाणी धोका देऊ शकतात अशी शक्यताही त्यांनी यावेळी वर्तवली आहे.